महाराष्ट्र पोलिस आय.जी. फारूख कैसर यांच्या हस्ते "ब्राउन अख्खा" म्युझिक अल्बम अनावरण....

नुकतेच मुंबई येथील फिनिक्स मार्केटसिटी मधील 'डब्लिन स्क्वेयर' येथे संगीतकार हुमायूं कबीर आणी अहमदाबाद येथील नावाजलेली मॉडल सोनिया सिंग यांचा "ब्राऊन अख्खा" हा म्युझिक अल्बम महाराष्ट्राचे पोलीस आई. जी. श्री कैसर खालिद यांचा हस्ते रिलीज करण्यात आले.

असं म्हटलं जातं की संगीताला कोणतीही भाषा व कुठलीही सीमारेषा बंदिस्त करून ठरू शकत नाही. तसंच स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिली तर नियती ती पूर्ण करण्यासाठी मदत करते. याची अनुभूती घेतली एका पारंपरिक नेमस्त कुटुंबात वाढलेल्या सोनिया सिंग हिने. गुजरातमधील अहमदाबादस्थित लहानाची मोठी झालेल्या सोनियाला लहापणापासूनच नृत्याचा विलक्षण शौक. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं त्याप्रमाणे सोनियालाही मुंबईत येऊन आपल्या टॅलेंटला आजमावायचं होतं. परंतु घरातून परवानगी मिळाल्यानंतरच. सुरुवातीला साशंक असणारे तिचे आई-वडील तिची नृत्यप्रती निष्ठा बघून राजी झाले व त्यांनी तिला मुंबईत करियर करण्याची परवानगी दिली.

हर्षभरित झालेल्या सोनिया सिंगला मात्र माहित होते की मायानगरी मुंबईत पोहोचल्यावर मेहनत खूप करावी लागणार. मनोरंजनसृष्टीत शिफारशींशिवाय तग धरणं मुश्किल असतं असा समज आहे परंतु इथे टॅलेंटची कदर केली जाते हेही तितकाच खरं आहे. म्हणूनच सोनियाने 'स्ट्रगल' करत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जोमाने प्रयत्न सुरु केले. या काळात तिची भेट हुमायूं कबीर सोबत झाली. हुमायूंने बऱ्याच मोठ्या दिग्दर्शकांकडे सहाय्यकाचं काम केलं आहे. अभिनयाचीही त्याला विचारण्यात आलं व त्याने काही जाहिरातपटांत काम केलं. हुमायूं आणि सोनिया यांच्या मैत्रीपूर्ण गप्पांत ओघाने असं समजले की तो एका उत्तम गायक आहे व तेवढाच प्रतिभाशाली संगीतकार. सोनियासाठी हा सुखदः आश्चर्याचा धक्का होता. फारच कमी जणांना माहित असलेली गोष्ट होती ती व त्याने अनेक जाहिरातपटांच्या 'जिंगल्स' देखील बनविल्या होत्या. सोनियाला मनोरंजनसृष्टीत आपलं असं खास करायचाच होतं आणी एका दिवशी सोनियाला अचानकच संगीतकार हुमायूं चा फोन येतो की ते एक 'म्युझिक अल्बम' ची निर्मिती करत आहे जर तुला माझ हे म्युझिक एल्बम करायचा असेल तर मला माझ्या ऑफिस मध्ये लवकर येवुन भेट हुमायूं हा म्युझिक एल्बम ज्याचं नाव आहे 'ब्राउन अख्खा'.

'ब्राउन अख्खा' ह्या म्युझिक एल्बमची निर्मिती माईंड पॉवर सिकर्स स्टार्स एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली निर्मिती असलेला म्युझिक अल्बम चे संगीत स्वतः  हुमायूं कबीरच तैयार करीत आहे 'ब्राउन अख्खा'  यातील तीन गाण्यांना स्वरसाज दिलाय तोचि रैना, शाहवेझ आलम आणि कुणाल गांजावाला यांनी. गाण्याचे बोल उतरले आहेत अराफत मेहमूद, गुरप्रीत सॅम बी व शाहराम सरमाडी, जे ताझाकिस्तानच्या भारतीय दूतावासातील सेकंड सेक्रेटरी आहेत, यांच्या लेखणीतून. यातील दोन गाणी महाबळेश्वर इथे तर तिसरं गाणं मुंबईतील मढ आयलंडवर चित्रित करण्यात आले ह्या म्युझिक मध्ये तीन गाणी आहेत  आणी तिन्ही गाण्यात सोनिया सींग बॉलीवुडच्या तीन मोठ्या मॉडेल्स बरोबर काम करीत आहे. आर्यन चौहान, सलमान शेख आणि साहिल कोहली यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलंय शबीना खान हिने.

'ब्राउन अख्खा' मधील सर्व गाण्यांचे व्हिडीओज तयार असून लवकरच सोनिया सिंग आपल्या स्वप्नपूर्तीची अनुभूती घेणार आहेत. अनुभवी पीआरओ राजू कारीया या म्युझिक अल्बम च्या प्रचारकाचे काम सांभाळत आहेत.

Comments