मुंबई: "कलर्स मराठी" येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येणार आहे.
"नवरा असावा तर असा" आणि
"बाळूमामाच्या नावनं चांगभलं" मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. रविवारी म्हणजेच ३१ मार्च रोजी दु. १२ आणि संध्या. ७.०० वा.
'नवरा असावा तर असा' या कार्यक्रमामध्ये बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमधील
सुंदरा म्हणजेच अंकिता पनवेलकर त्याच्या पतीसोबत आणि रोहित देशमुख त्यांच्या पत्नीसोबत कार्यक्रमा मध्ये येणार आहे. तर
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग दु. १ आणि रात्री ८.०० वा. प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये बाळू त्याच्या भक्ताला मदत करताना दिसणार आहे. कशी बाळू त्यांच्या भक्ताला मदत करणार ? कसा त्याला मार्ग दाखवणार आणि कसा त्याचा उध्दार करणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा कलर्स मराठीवर मनोरंजनाचा महारविवार – 'नवरा असावा तर असा' आणि 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' येत्या रविवारी म्हणजेच ३१ मार्च रोजी फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
"बाळूमामाच्या नावानं चांगभलं" मालिकेमध्ये आजवर बाळूने अनेकांना काही कळू न देता मदत केली आहे, कठीण प्रसंग आणि संकटातून मार्ग दाखवला आहे, यावेळेस देखील बाळू पंचाच्या भावाला त्यांच्या न कळत मदत करणार आहे. पंच सख्या भावाला त्याचा मुलीच्या लग्नासाठी मदत नाकारतो... त्याचवेळी मलप्पा म्हणजेच पंचाचा भावाला बाळूच्या दिव्य अवताराची प्रचीती येते आणि तो बाळूचा भक्त बनतो. शिवाची मल्लपाने केलेली पूजा आणि अभिषेक बाळूपर्यंत पोचतो. दुसरीकडे मल्लपाची बायको आणि मुलगी मात्र त्याचा देवभक्तीने त्रासले आहेत… आता बाळू त्याच्या ह्या भक्ताला कसा मार्ग दाखवणार? लग्न कसे पार पडणार? सगळी व्यवस्था कशी होणार? बाळू भक्ताचा उध्दार कसा करणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
|
बाळूमामाच्या नावानं चांगभलं |
"नवरा असावा तर असा" या कार्यक्रमाच्या विशेष भागामध्ये बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमधील
सुंदराची भूमिका साकारणारी अंकिता पनवेलकर तिच्या पतीसोबत तर
मयप्पाची भूमिका साकारणारे रोहित देशमुख सहपत्नी कार्यक्रमामध्ये येणार आहेत. अंकिताने त्यांची लव्ह स्टोरी आणि बऱ्याच गंमती सांगितल्या तर अंकिताच्या नवऱ्याने तिच्या काही सवयींचा खुलासा केला जसे कि, अंकिताला रात्री झोपेमध्ये बोलण्याची सवय आहे. तसेच अंकिता शूट निमित्ताने मुंबईमध्ये असते मग मुलीला कसा वेळ देते आणि मुलीचं आणि त्यांचे नाते कसे आहे हे सांगितले. याचबरोबर अंकिता आणि ओंकारसोबत (तिच्या नवऱ्यासोबत) सारी के लिये सॉरी हा गेम खेळण्यात आला. तसेच रोहित आणि अश्विनी (त्यांची पत्नी) यांनी देखील ते कसे भेटले, कोणी कोणाला लग्नासाठी मागणी घातली, काही आठवणी, खऱ्या आयुष्यात मध्ये रोहित कसा आहे? हे सांगितले. त्यांच्यासोबत ५ का पंच हा गेम रंगला. अंकिता पनवेलकर आणि अश्विनी दोघींनी “नवरा असावा तर असा” त्या का म्हणतील हे देखील सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी एक खेळ खेळण्यात आला ज्यामध्ये नथ आणि मंगळसूत्र देण्यात आले... तेंव्हा नक्की बघा येत्या रविवारी नवरा असावा तर असाचा विशेष भाग तुमच्या आवडत्या कलाकारांसोबत.
|
नवरा असावा तर असा |
कलर्स मराठीवर मनोरंजनाचा महारविवार – नवरा असावा तर असा ३१ मार्च रोजी दु. १२ आणि संध्या. ७.०० वाजता आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं दु. १ आणि रात्री ८.०० फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
Comments
Post a Comment