जॉय पर्सनल केअरच्या हनी अल्मन्ड लोशनच्या जाहिरातीसाठी अभिनेत्री क्रिती सननची निवड

मुंबई: हिवाळ्याची चाहूल लागणे सुरु झाल्यामुळे त्यादृष्टीने त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आघाडीचा स्किनकेअर ब्रँड जॉयने आपली ब्रँड एन्डोर्सर म्हणून अभिनेत्री क्रिती सननला निवडले आहे. हिवाळ्यात त्वचेची पुरेपूर काळजी घेण्यासाठी नावाजल्या जाणाऱ्या जॉय पर्सनल केअरच्या हनी अल्मन्ड लोशनच्या संपूर्ण मार्केटिंग कॅम्पेनमध्ये तसेच टीव्हीसाठी खास तयार करण्यात आलेल्या नवीन जाहिरातीत क्रिती सनन सहभागी होणार आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना आरएसएच ग्लोबलचे चेअरमन श्री. सुनील अगरवाल यांनी सांगितले, "त्वचेची काळजी घेण्यासाठीची उत्पादने बनविणाऱ्या प्रत्येक कंपनीसाठी हिवाळा ऋतू सर्वाधिक महत्वाचा असतो. आमचे प्रमुख उत्पादन हनी अँड अल्मन्ड बॉडी लोशन हे हिवाळ्यात त्वचेची सर्वोत्तम निगा राखली जावी यासाठी अतिशय योग्य आहे. या लोशनच्या प्रसिद्धीसाठी क्रिती सननची निवड करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला पक्का विश्वास आहे की ही भागीदारी आमच्या ब्रॅण्डसाठी तसेच क्रिती सननसाठी देखील खूप लाभकारी ठरेल. आमच्या परिवारात क्रितीचे स्वागत आहे".

यानिमित्ताने खास तयार करण्यात येत असलेल्या प्रॉडक्ट कॅम्पेनबद्दल आरएसएच ग्लोबलच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर श्रीमती पौलोमी रॉय यांनी सांगितले, "निसर्गतःच सुंदर - "ब्युटीफुल बाय नेचर" हे जॉयचे ब्रँड तत्त्व हनी अँड अल्मन्ड बॉडी लोशनच्या कॅम्पेनची मुख्य संकल्पना आहे. "ग्राहकांच्या इच्छा-आकांक्षा, आवडीनिवडी बदलत आहेत" ही प्रमुख बाब डोळ्यासमोर ठेऊन आम्ही हे कॅम्पेन तयार केले आहे. आजचे ग्राहक कोणतेही उत्पादन आयुष्यभराची सवय म्हणून, डोळे झाकून खरेदी करत नाहीत, तर उत्पादनाची वैशिष्ट्ये आणि लाभ यांचा सर्वंकष विचार करतात."

"या सर्व बाबी लक्षात घेऊन या कॅम्पेनच्या कथेमध्ये क्रिती ही एक आधुनिक स्त्री म्हणून दाखविली गेली आहे जी स्किन केअर उत्पादनाची जाहिरात करताना कोणतेही अवास्तव दावे आणि अतिरंजित वर्णन करत नाही. या जाहिरातीत क्रिती ही तथाकथित "पारंपरिक चांगले रूप" असलेली तरुण स्त्री आहे. स्किन केअर उत्पादने विकली जावीत यासाठी आजवर ज्या प्रकारच्या जाहिराती केल्या गेल्या, जे नेहमीचे दावे केले गेले ते सर्व कसे पोकळ आहेत हे ती दाखवून देते."

ब्रॅण्डसोबत या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेत्री क्रिती सननने सांगितले, "जॉयच्या हनी अँड अल्मन्ड बॉडी लोशनसाठी काम करताना मी खूप खुश आहे. मध आणि बदाम त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहेत. या कॅम्पेनमध्ये या दोन्हींचे गुण अगदी स्पष्ट आणि सहजपणे तरीही मनोरंजक पद्धतीने सांगितले गेले आहेत.  ही टीव्ही जाहिरात पाहताना तुम्हाला नक्कीच मजा येईल."

टीव्ही जाहिरात पाहण्यासाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=xWAZOrvseKg

Comments