"Godrej Interio" releases ‘Work From Home’ Guide

"गोदरेज इंटेरियो"तर्फे ‘वर्क फ्रॉम होम’ गाइड प्रकाशित
मुंबई: फर्निचर क्षेत्रातील भारतातील आघाडीचा ब्रँड असलेल्या "गोदरेज इंटेरियो"ने आज "स्टे हेल्दी. बी प्रॉडक्टिव्ह – अ वर्क फ्रॉम होम गाइड" या खास गाइडचे अनावरण केल्याचे जाहीर केले. या गाइडमध्ये आधुनिक होम- ऑफिस सेटअपमधील आव्हाने आणि त्यावरच्या उपाययोजना देण्यात आल्या आहेत.

"कोविड- 19" च्या उद्रेकामुळे सर्व भारतीय शहरांतील नोकरदार लोकसंख्येला अनपेक्षितपणे 'वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच)' करावे लागत असून बहुतेक व्यावसायिकांना याची सवय नसली आणि दरम्यान तंत्रज्ञान व मूलभूत सुविधांशी संबंधित आव्हाने येत असली, तरी त्यांना ही पद्धत आकर्षक वाटत आहे. गोदरेज इंटेरियोने आज विविध क्षेत्रांतील कंपन्यांसाठी डब्ल्यूएफएचचा पर्याय अनिश्चित काळासाठी व्यवहार्य व्हावा यासाठी मदत करणारे गाइड प्रकाशित केले आहे.

हे गाइड व्यावसायिकांना आरामदायीपणे काम करून अनावश्यक ताण व दुखापत टाळून त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत करेल. घरी काम करण्यासाठी योग्य वातावरण असल्यास चुकीच्या पद्धतीने बसणे- उभे राहाणे टाळले जाऊन एमएसडीजला (मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर) प्रतिबंध करता येईल.

गोदरेज इंटेरियोचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी अनिल माथुर म्हणाले, ‘आधुनिक ऑफिसच्या कामाचे स्वरुप बैठे असल्यामुळे तसेच घरून काम करताना कित्येक तास बसून राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. अत्यानुधिक तंत्रज्ञानामुळे कुठूनही काम करणे शक्य झाले असले, तरी घरून काम करताना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या तयार होऊ शकतात. लोक सोफा, बीन बॅगवर, पाय एकमेकांवर टाकून जमिनीवर बसून किंवा अगदी आडवे पडून काम करू शकतात. यामुळे त्यांच्या स्नायू यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आम्ही वर्क फ्रॉम गाइड तयार केले आहे, ज्यात होम- ऑफिस सेटअपसाठी योग्य कार्यपद्धती (अर्गोनॉमिक्स) असण्याचे महत्त्व नमूद केले आहे. आजच्या आधुनिक कर्मचाऱ्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि होम- ऑफिस सेटअपमधअये त्यांना सतत गुंतून ठेवणारे वातावरण तयार करणे आवश्यक आहे. घरी योग्य प्रकारच्या आसनाचा वापर केल्यास कामातून विश्रांती घेतल्यानंतर त्यांना थकवा, आखडलेले स्नायू आणि स्नायूंमध्ये गोळे येणे यांसारखे प्रकार टाळता येतात हे लक्षात येईल. यामुळे त्यांना जास्त कार्यक्षम व उत्पादनक्षम राहाण्यास मदत होईल.’

नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ गाइडमध्ये आधुनिक कर्मचाऱ्यांसाठी पुढील टिप्स देण्यात आल्या आहेत -

·   योग्य टेबल आणि खुर्ची – अर्गोनॉमिक खुर्ची आणि टेबलामध्ये पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारे बसताना मदत होते. ज्या खुर्चीमध्ये पैसे गुंतवणार आहात, ती जास्तीत जास्त आराम देणारी हवी आणि त्यासाठी त्यात अडजस्टेबल सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाठ ताठ व सरळ राहावी यासाठीही आवश्यक त्या अडजस्टेबल सुविधा असणे गरजेचे आहे. टेबल योग्य उंचीचे असायला हवे. टायपिंग करतानाची सर्वात आदर्श स्थिती म्हणजे, हाताचे कोपर 90 अंशात असणे.

·   टेबल स्वच्छ ठेवा (आणि वातावरणही) – तुमच्यासाठी कामाची वेगळी जागा असणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे एकाग्रता वाढते व व्यत्यय कमी होतात. सलग काही तास काम करताना जास्तीत जास्त आरामदायीपणे बसला आहात याची खात्री करा.

·   योग्य अक्सेसरीज घ्या – स्क्रीनची उंची अयोग्य असल्यास मान आणि त्यासंदर्भातल्या समस्या वाढतात. कम्प्युटरचा पडदा वापरणाऱ्याच्या डोळ्यांच्या उंचीच्या समान रेषेत असायला हवा, म्हणजे त्याकडे पाहाण्यासाठी मान जास्त खाली किंवा वर करावी लागणार नाही. त्याशिवाय कीबोर्डवर टायपिंग करताना कम्प्युटरचा पडदा किमान एक हात दूर हवा. यासाठी दर्जेदार लॅपटॉप स्टँड, एक्स्टर्नल कीबोर्ड आणि माऊसमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले होईल, कारण त्यामुळे कोणत्याही वेळेस काम करताना शरीरावर ताण येणार नाही.

·   स्मार्ट प्रॉप्स – काम करताना थोडा वेळ सोफा किंवा बीन बॅगवर बसायला हरकत नाही, मात्र अशावेळेस लॅपटॉपखाली उशी ठेवून त्याची उंची वाढवावी तसेच पाठीला आधार म्हणून उशांचा वापर करावा. आडवे पडून काम करणे टाळा, कारण त्यामुळे पाठ व संबधित दुखण्याच्या समस्या उद्भवू शकतील.

·   फिरत राहा – खूप वेळ काम करताना अधेमधे जागेवरून उठणे फार महत्त्वाचे आहे. चहा- कॉफीसाठी ब्रेक घ्या, बाल्कनीमध्ये जा, बाहेरच्या शांततेचा आनंद घ्या, गप्पा मारण्यासाठी मित्र- मैत्रिणींना फोन करा किंवा मोबाइलमधील ईमेल्स तपासा. परत काम सुरू करण्यासाठी घरातल्या घरात फिरा. बसण्याची स्थिती योग्य असली, तरी खूप वेळ एकाच जागी बसल्यास शरीर व मनावर ताण येतो. ब्रेकमध्ये स्ट्रेचिंगसारखे सोपे व्यायाम करून रक्ताभिसरण सुधारता येईल.

·   उभे राहून काम करा – काही वेळ उभे राहून काम केल्यास पाठीचे दुखणे कमी होते, एकाग्रता वाढते आणि जलद काम करणे शक्य होते. त्यामुळे काही प्रमाणात कॅलरीजही खर्च होतात. त्याशिवाय अधेमधे थोड्या वेळासाठी ड्रेसर, इस्त्रीचे टेबल किंवा स्टोअरेज युनिट यांचा उंच वर्कस्टेशनसारखा वापर करता येईल.

·   प्रकाशयोजना काळजीपूर्वक निवडा – तुम्ही काम करत असलेल्या खोलीत पुरेसा प्रकाश असेल याची खात्री करा. त्याचबरोबर नैसर्गिक उजेड यावा म्हणून खिडक्या उघड्या ठेवा. उजेड चमकत (ग्लेयर) असल्यास पडदे लावा किंवा योग्य अँगलमधे ब्लाइंड्स लावा. रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस काम करताना टेबलावर दिवा लावा.

अधिक माहितीसाठी भेट द्या https://www.godrejinterio.com/

Comments

  1. Amazing blog on the godrej interior work and it was wonderful reading your blog
    Thank you sharing it with us
    Cherrypick offers a wide range of imported luxurios Relaxing chair in a variety of colours, styles, and fashions.

    ReplyDelete

Post a Comment