मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी "विराज प्रोफाइल्स"चा पुढाकार
महाराष्ट्र: "विराज प्रोफाइल्स" हे जागतिक पातळीवरील आघाडीचे स्टेनलेस स्टील उत्पादक असून महाराष्ट्रातील तारापूर येथे त्यांचा इंटिग्रेटेड कारखाना आहे. या कंपनीतर्फे त्यांची स्टेनलेस स्टीलची उत्पादने ९२ हून अधिक देशांमध्ये निर्यात करण्यात येतात. "कोव्हिड-१९" शी लढा देण्यासाठी आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोव्हिड योद्ध्यांना मदत करून विराज या कार्यात सक्रिय सहभागी आहे. आज विराज प्रोफोइल्सने मुंबई पोलिसांना मुंबई पोलीस मुख्यालयात ४०,००० नोझ मास्कचे वाटप केले. या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. परम बीर सिंह उपस्थित होते.
विराज प्रोफाइल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. नीरज कोचर म्हणाले, “कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य प्रशासन आणि विविध विभागांतर्फे करण्यात येणाऱ्या कामाबद्दल विराज ग्रुपतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि येथील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आघाडीवर असलेल्या मुंबई पोलीसांचे आम्ही विशेष आभार मानतो. आमचे हे सुपरहिरो सुरक्षित राहावे यासाठी आम्ही मास्कचे वाटप करीत आहोत. गेल्या वर्षी या कालावधीत आम्ही मुंबई पोलिसांसाठी रेनकोटचे वाटप केले होते.”
श्री. कोचर पुढे म्हणाले, “जागतिक पातळीवर फैलावलेल्या या साथीच्या रोगाशी लढा देण्यासाठी विराज कायम सक्रिय सहभागी राहिला आहे. या महामारीशी लढा देण्यात आघाडीवर असलेले आरोग्यसेवक, पोलीस, सरकारी अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या सख्ख्या नातेवाईकांना कंपनीतर्फे रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्यसेवा यंत्रणेला मदत करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही बोईसरमधील टीआयएमए ह़स्पिटलमध्ये ५००० नोझ मास्क्स आणि इतर साधनांचे वाटप केले. त्याचप्रमाणे बोईसरच्या आजुबाजूच्या म्हणजेच वसई, जव्हार, मोखाडा आणि पालघर भागांतील १२,००० कुटुंबांना आम्ही ५०० लिटरहून अधिक सॅनिटायझर आणि अन्नपाकिटांचे वाटप केले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी आमचे कोरोना कृती दल या सर्व उपक्रमांवर बारीक लक्ष ठेवून आहे.”
विराज प्रोफाइल्स लि. स्थानिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि आपले कर्मचारी/ कामगार/ अभ्यागत यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण सुरक्षित असावे यासाठी राज्य सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. कर्मचारी/कामगार यांच्या आरोग्याची तपासणी व चाचणी, कारखाने, प्रवासी व्यवस्था, कार्यालय यांचे निर्जंतुकीकरण, कर्मचाऱ्यांना नोझ मास्क आणि हँड सॅनिटायझरचे नियमित वाटप, शारीरिक अंतर राखणे इत्यादी पावले उचलण्यात आली आहेत. या साथीच्या रोगाशी लढा देण्यासाठी काय करावे व काय करू नये तसेच कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपले कर्मचारी/ कामगार/ अभ्यागत यांना माहिती देण्यासाठी कंपनीतर्फे नियमितपणे जागरुकता व प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येते.

Comments
Post a Comment