Godrej Interio launches research study: "Visual Ergonomics"

 गोदरेज इंटरिओतर्फे संशोधन अहवाल सादर : "व्हिज्युअल अर्गोनॉमिक्स"


मुंबई: "कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस)" रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी असलेल्या अर्गोनॉमिक जोखीम घटकांची सविस्तर माहिती देणारा "व्हिज्युअल अर्गोनॉमिक्स" या नावाचा एक अनन्य स्वरुपाचा नवीन संशोधन अहवाल "गोदरेज इंटिरिओ" या भारतातील आघाडीच्या फर्निचर सोल्यूशन्स ब्रँडतर्फे सादर करण्यात आला. 500हून अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण करून ही माहिती संकलित करण्यात आली तिच्या विश्लेषणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या विश्लेषणात संबंधित व्यक्तींच्या कामाचे स्वरूप, त्यांच्या गॅझेटच्या वापराचा कल आणि त्यांच्या शरीराची ठेवण या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे.

कामावर घरी संगणक किंवा मोबाईल फोनच्या डिजिटल स्क्रीनचा वापर करण्याचे प्रमाण वाढल्याने गेल्या काही वर्षांत दृष्टीदोषाचे प्रमाणही वाढत चालले आहे. संगणक मोबाईलकडे पाहण्याचा कालावधी वाढल्याने डोळ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. यामध्ये डोळे थकणे डोकेदुखी येथपासून डोळे कोरडे पडणे, अस्पष्ट दृष्टी, दुहेरी दृष्टी, डोळे खाजणे, डोळ्यांत सतत पाणी येणे अशा काही जटील समस्यांचा समावेश आहे.

दृष्टीसंबंधी बहुतांश समस्यांच्या वैज्ञानिक कारणांचा सखोल शोध या अभ्यासात घेण्यात आला आहे. या प्रत्येक कारणाचे स्पष्टीकरणही यात देण्यात आले आहे. यातून, ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या डोळ्यांची चांगली काळजी कशी घ्यावी डोळ्यांची योग्य ती स्वच्छता कशी ठेवावी, हे समजण्यास मदत होते.

गोदरेज इंटिरिओच्या मार्केटिंग (बी2बी) विभागाचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट समीर जोशी या संदर्भात म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत डिजिटायझेशनला मोठी गती प्राप्त झाली आहे आणि कामाची ठिकाणे, शैक्षणिक संस्था घरांमध्ये लॅपटॉप / संगणक यांचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. माहिती मिळवणे इतर व्यक्तींशी संवाद साधणे हे अगदी सोपे झाल्याने या गॅझेट्समुळे आपले जीवन सुलभ कार्यक्षम झाले आहे. अर्थात, या गॅझेट्सचा वापर खूप वेळ करण्याचे मोठे दुष्परिणामही असतात. अशावेळी, कार्यालयांमध्ये संगणक सतत वापरणाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य नीट राखण्यासाठी, व्यापक स्वरुपाची कर्मचारी स्वास्थ्य मार्गदर्शक तत्वे आखणे गरजेचे आहे.”

नुकत्याच सादर झालेल्या एका अभ्यासानुसार, कार्यालयीन कर्मचारी दिवसाकाठी किमान 6 तास संगणकाच्या स्क्रीनकडे पाहात असतात. 65 टक्के जणांमध्ये डोळ्यांवर ताण येणे दृष्टीदोष या समस्या असल्याचे आढळून आले, तर 47 जणांना डोकेदुखी थकवा हे त्रास होत असल्याचे त्यामध्ये नोंदण्यात आले. भारतीय नागरिक स्क्रीनकडे अति प्रमाणात पाहात असतात, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 70 टक्के कर्मचारी दिवसातील 6 ते 9 तास आपल्या गॅझेट्सच्या स्क्रीनकडे पाहात असतात, असे त्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय कार्यालयांमध्ये 68 टक्केवर्कस्टेशन्समधील संगणकांच्या स्क्रीनमधून येणारा उजेड हा अयोग्य असतो. त्यांतील 58 टक्के स्क्रीनमधील उजेड अपुरा आणि 42 टक्के स्क्रीनमधील उजेड खूपच जास्त अशा प्रमाणात असतो, असे दिसून आले आहे. प्रिंट झालेला, हाताने लिहिलेला किंवा संगणकाच्या स्क्रीनवर उमटलेला मजकूर वाचण्यासाठी योग्य स्वरुपात उजेड हवा असतो; जेणेकरून मजकूर नीट दिसू शकेल. खोलीत अति उजेड असेल किंवा अगदी कमी प्रकाश देणारी व्यवस्था असेल, मोठ्या आकाराच्या, उघड्या खिडक्या असतील किंवा छतावर लावलेली प्रकाश व्यवस्था असेल, तर डिजिटल स्क्रीनवरील मजकूर दिसण्यात अडचण येते.

संगणकाचा मॉनिटर ठेवण्याची पद्धत - वर्कस्टेशनचे अर्गोनॉमिक्स हेदेखीलसीव्हीएसनिर्माण होण्याचे कारण असते. मॉनिटर चुकीच्या पद्धतीने ठेवलेला असेल, तर मानेची ठेवण बदलते आणि त्यातून मान, पाठीचा वरचा भाग खांदा यांची दुखणी सुरू होतात. गॅझेटच्या स्क्रीनकडे बराच वेळ पाहात राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर स्वास्थ्यावर शारिरीक मानसिक स्वरुपाचा परिणाम होतो.

कार्यालयांमध्ये संगणक सतत वापरणाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य नीट राखण्यासाठी, व्यापक स्वरुपाची कर्मचारी स्वास्थ्य मार्गदर्शक तत्वे आखणे गरजेचे आहे. कार्यालयांमध्ये काम करीत असताना कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना आराम मिळावा, या दृष्टीने मूल्यांकन, सुधारणा प्रतिबंध असे मार्ग गोदरेज इंटिरिओ मधीलवर्कस्पेस अर्गोनॉमिक्स संशोधन विभागाने सुचविले आहेत. यामध्ये डोळ्यांचे साधे व्यायाम, ‘वर्कस्पेसमधील प्रकाश व्यवस्थेत बदल करून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीच्या स्थितीचे नियमित मूल्यांकन विश्लेषण हे सुचविण्यात आले आहे.

मूल्यांकन:

कार्यालयांमधील प्रकाशाच्या तीव्रतेबद्दल कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी एकंदरीत प्रकाशयोजना तपासून पाहायला हवी. या तपासणीमुळे विविध कामांना नेमका किती उजेड हवा आहे हे लक्षात येऊन विविध जागांवर आवश्यक तेवढा उजेड निर्माण करण्याचे काम करता येईल. त्यातून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल.

·         अर्गोनॉमिक मूल्यांकनवर्कप्लेस अर्गोनॉमिक्सचे मूल्यांकन करून संगणकाचे काम वर्कस्टेशन्स यांच्यासाठी शिफारसी करणे.

·         कर्मचाऱ्यांची दृष्टी तपासणीसंगणक वापरणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या दृष्टीची तपासणी कार्यालयामध्ये नियमितपणे करून घेणे अनिवार्य असणे.

·         सीव्हीसीची वार्षिक तपासणीकर्मचाऱ्यांच्यासीव्हीसीची नियमित तपासणी आवश्यक आहे. संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करतेवेळी डोळ्यांचेही आरोग्य तपासले जात असेल, तर हीसीव्हीसीची तपासणीही त्यात करून घेता येईल.

सुधारणा:

'अर्गोनॉमिक्स' विषयक समस्या सोडविण्याकरीता जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. योग्य सवयींविषयी प्रशिक्षण देणे, ‘वर्कस्टेशन्सची व्यवस्था सुधारणे आणि कामाच्या अनुषंगाने डिजिटल स्वच्छता राखणे या गोष्टीही केल्या पाहिजेत. त्याचबरोबर, शारिरीक मानसिक ताण कमी करून फिटनेस कसा मिळवायचा, याचे प्रशिक्षण दिल्यास, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर येणारा ताण थकवा दूर करता येईल.

प्रतिबंध: 

जागरुकतेतूनच प्रतिबंध येऊ शकतो. ‘अर्गोनॉमिक्समधील संभाव्य समस्यांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. या संदर्भात संस्थांना करता येण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत

·         डोळ्यांच्या आरोग्यासहीत संपूर्ण आरोग्यासंबंधी सूचना देण्यासाठी साप्ताहिक संवाद उपक्रम राबविणे.

·         कार्यालयाच्या आवारात डोळे तपासणीची शिबिरे नियमित आयोजित करणे किंवा वार्षिक आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये डोळे तपासणीचाही समावेश करणे.

·         या संदर्भातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेणे.

·         दृष्यमानता अर्गोनॉमिक्स यांच्या व्यवस्थेची देखभाल करणे.

‘सीव्हीएसचा परिणाम किती होतो, हे तज्ज्ञ तपासत असताना, कार्यालयीन जागेचे डिझाईनदेखील शास्त्रीय पद्धतीने तपासणे त्यासंबंधी दीर्घकालीन धोरण ठरविणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम ‘अर्गोनॉमिक्स मधील इतर समस्या यातून रोखता येतील.

Comments