This wedding season, look like a million bucks by trying out the hottest hair trend - "Money Piece"

या लग्नसराईमध्ये, सर्वात लोकप्रिय हेअर ट्रेंड, "मनी पीस" वापरून मिळवा लाखमोलाची छटा

मुंबई: या लग्नसराईमध्ये ‘झूम’च्या माध्यमातून किंवा वास्तविक जीवनातही लाखमोलाची एखादी केसांची छटा मिळवा. किम कर्दाशियन, बियॉन्से व जेनिफल लोपेझ यांसारख्या सौंदर्यवतींचा एखादा केसांचा लोकप्रिय ट्रेंड वापरून पाहा. “गोदरेज प्रोफेशनल” या हेअर कलर, हेअर केअर, स्टायलिंग व केराटिन यांमधील उत्पादनांच्या व्यावसायिक सलून ब्रॅंडने “मनी पीस” या 2020 मधील सर्वाधिक लोकप्रिय हेअर कलर ट्रेंडचा भाग म्हणून तीन नवीन हेअर कलर लूक्स सादर केले आहेत. “हॅजेल”, “अ‍ॅश“ आणि “चेरी रेड” या त्या तीन शेड्स भारतीय व्यक्तींच्या केसांसाठी खासकरून आणण्यात आल्या आहेत. ‘गोदरेज प्रोफेशनल’च्या या नवीन “मनी पीस लूक्स” मुळे तुम्ही लाखमोलाचा छटा मिळवणार आहात. 

चेहऱ्याभोवती केसांची सुंदर चौकट हायलाईट पद्धतीने आणण्याचे ‘मनी पीस’ हे तंत्र आहे. चेहऱ्याकडे लक्ष त्वरीत आकर्षित करण्यासाठी रंगाचा एक चमकदार पोत यामध्ये केसांवर आणण्यात येतो. या तंत्रामध्ये वेळ व पैसे कमी खर्च होत असल्याने त्यास ‘मनी पीस’ असे म्हणण्यात येते. चेहऱ्याभोवती चौकट साकारणाऱ्या केसांची छटा ही उर्वरीत केसांच्या विरुद्ध रंगाची असल्याने साधा, प्रभावी, अचंबित करणारा परिणाम साधला जातो. हे एक साधे, परंतु प्रभावी तंत्र आहे आणि केसांच्या सर्व पोतांवर, प्रकारांवर ते काम करते. 2021 मध्येही ‘मनी पीस’ हाच मोठा ट्रेंड असण्याची शक्यता वर्तविली जात आहे, यात नवल ते काय? 

“गोदरेज प्रोफेशनल”च्या तज्ज्ञ असलेल्या भारतातील तीन दिग्गज हेअर स्टायलिस्ट एकत्र येऊन त्यांनी आपली स्वतःची खास स्टाईल ‘मनी पीस’ मध्ये सादर केली आहे. ‘गोदरेज प्रोफेशनल’ च्या ‘एज्युकेशन अ‍ॅम्बेसेडर’ आशा हरिहरन यांनी ‘हॅजल’ स्टाईल तयार केली. ‘गोदरेज प्रोफेशनल’च्या ‘टेक्निकल अ‍ॅम्बेसेडर’  सिल्विया चेन यांनी ‘अ‍ॅश’ हा कूल टोन्ड लूक सादर केला, तर ‘गोदरेज प्रोफेशनल’च्या ‘टेक्निकल अ‍ॅम्बेसेडर’  रायन डिरोजारिओ यांनी भारतीय त्वचेच्या टोनवर योग्य ठरेल अशा विशेष लाल रंगाचा वापर करून ‘चेरी रेड’ हा लूक आणला आहे.

“गोदरेज प्रोफेशनल”च्या नॅशनल टेक्निकल हेड हिना दळवी यांनी सांगितले, “मनी पीस ट्रेंड यावर्षी बियॉन्सीने सुरू केला होता आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. जागतिक स्तरावरील केसांचा हा सर्वाधिक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. आम्ही या ‘हेअर कलर ट्रेंड’नुसार बनवलेले खास ‘हेअर लूक्स’ सादर करण्यास उत्सुक आहोत. या तंत्राविषयी सर्वात चांगली बाब म्हणजे, ते कमी देखभालीच्या ‘बॅलेयाज’ला एक नवीन आयाम देते. तुमचे केस काळे असतील, तर त्यावर इतर कोणतीही ट्रीटमेंट न करता एखादा फिकट रंग देण्याने ते खुलू शकतात. या तंत्रामुळे केसांवर तरल, पुसट आणि तरीही चमकदार असा पोत निर्माण होतो, त्यामुळे ते आकर्षक बनतात. आमच्या तज्ज्ञांच्या पॅनेलने तयार केलेला नवीन लूक हा सध्याच्या उत्सवाच्या काळासाठी तसेच आगामी हिवाळ्यासाठीही एक आदर्श ट्रेंड ठरेल.”

Comments