"डव्ह"चे देशाला सौंदर्याच्या चाचण्या थांबवण्याचे आवाहन...
भारत: लग्न जुळवण्याच्या
प्रक्रियेत स्त्रियांना सौंदर्यावर आधारित
ठोकताळ्यांचा व नाकारले
जाण्याचा सामना कसा करावा
लागतो आणि त्याचा
त्यांच्या आत्मसन्मानावर कसा परिणाम
होतो हे दाखवणाऱ्या
कठोर आणि वास्तववादी
कथा डव्हच्या नवीन
फिल्ममध्ये आहेत.
भारतातील सौंदर्याची चाचणी:
सौंदर्याचा
शोध नेहमीच कुरूप
आणि पातळी खालावणारा
असू शकतो. ठरवून
केल्या जाणाऱ्या लग्नांमध्ये (अरेंज्ड
मॅरेजेस) सौंदर्याच्या संकुचित कल्पनांना चिकटून
राहण्याच्या तणाव व
चिंतांबाबत अस्वस्थ करणारी आकडेवारी
“इंडियाज ब्यूटी टेस्ट (२०२०)
रिपोर्ट”मधून समोर
आली आहे. लग्न
जुळवण्याच्या प्रक्रियेत रूपाच्या निकषावर
परीक्षा करून आपल्याला
नाकारण्यात आल्याचा अनुभव भारतातील
१० पैकी ९
स्त्रियांना येतो, असे यातून
पुढे आले आहे.
याशिवाय सौंदर्याच्या निकषावर नाकारण्यात आल्यामुळे
आपल्या आत्मसन्मानावर व आत्मविश्वासावर
परिणाम झाल्याचा दावा ६८
टक्के स्त्रियांनी केला
आहे.
देशभरातील
स्त्रियांशी केलेल्या संभाषणांतून डव्हची
#StopTheBeautyTest ही फिल्म तयार झाली
आहे. यामध्ये स्त्रियांना
लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत
सुंदर नसल्याच्या कारणावरून
नाकारण्यात आल्याच्या काही अपरिपक्व
परिस्थितींचे चित्रण करण्यात आले
आहे. या निष्कर्षांचा
त्यांच्या आत्मसन्मानावर तसेच आत्मविश्वासावर
कसा प्रभाव पडतो,
यावर या फिल्ममध्ये
भर देण्यात आला
आहे.
अशा परिस्थितीत सापडलेल्या स्त्रियांनीच
अभिनय केलेल्या खऱ्या
कथांच्या माध्यमातून "डव्ह" एक
प्रभावी संदेश देतो – आपण स्त्रियांना
सौंदर्याच्या या अन्याय्य
परीक्षेतून जाण्यापासून थांबवले पाहिजे.
डव्हला हे महत्त्वपूर्ण
संभाषण सुरू करायचे
आणि सुरू ठेवायचे
आहे.
पद्धतशीर बदलाची गरज:
एचयूएलच्या
कार्यकारी संचालक आणि ब्यूटी
अँड पर्सनल केअर
साउथ आशियाच्या उपाध्यक्ष
प्रिया नायर यावरील
कृतीबाबत म्हणाल्या, “६३१ दशलक्ष
स्त्रियांच्या देशात सौंदर्याच्या एका
व्याख्येला चिकटून राहण्याचा दबाव
स्त्रीवर टाकला जातो हे
दुर्दैवी आहे. देशातील
काही सर्वांत मोठ्या
सौंदर्यप्रसाधन ब्रॅण्ड्सचे मालक म्हणून
आमच्या कंपनीवर सौंदर्याची कल्पना
अधिक सकारात्मक व
समावेशी करण्याची जबाबदारी आहे.
सौंदर्य हा आत्मविश्वासाचा
स्रोत व्हायला हवा,
चिंतेचा नव्हे, यावर डव्हचा
कायम विश्वास राहिला
आहे. #StopTheBeautyTest या अभियानाच्या
माध्यमातून आम्हाला या दिशेने
पुढे जाण्याची इच्छा
आहे.”
अभियानाच्या
उद्दिष्टाला आधार देण्यासाठी
डव्ह आघाडीच्या मॅट्रिमोनियल
प्लॅटफॉर्मशी भागीदारी करत आहे.
लग्न जमवण्याची प्रक्रिया
सौंदर्यावर आधारित पूर्वग्रहांपासून मुक्त
करण्याच्या संयुक्त संकल्पनेतून या
भागीदारी केल्या जात आहेत.
"डव्ह" आणि Shaadi.com एकत्र
येऊन प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना
शरीराचा आकार, त्वचेचा रंग,
चेहऱ्यांवरील ओरखडे, केसाचा प्रकार
व लांबी यांच्या
पलीकडे विचार करण्यास तसेच
नवीन आकारमान व
सौंदर्याच्या छटा पडताळून
बघण्यास प्रोत्साहन देत आहेत.
शिवाय या दिशेने
लक्षणीय बदल घडवून
आणण्याच्या दृष्टीने सौंदर्यविषयक पूर्वग्रहांपासून
मुक्त अशा मॅट्रिमोनियल अॅड्स लिहिण्यात
डव्ह मदत करणार
आहे. माध्यमांद्वारे या
बदलाची जोपासना करण्यासाठी डव्ह
भारतातील आघाडीच्या विमेन मॅगझिन्ससोबतही
भागीदारी करणार आहे. लग्न
जुळवण्याच्या प्रक्रियेत पुरेशा सुंदर
नाहीत असा शिक्का
मारला गेलेल्या स्त्रियांचे
सौंदर्य याद्वारे साजरे केले
जाणार आहे.
युनिसेफशी
केलेल्या एका एक्स्लुजिव
सहयोगाच्या माध्यमातून सुरू करण्यात
आलेल्या डव्ह आत्मसन्मान
प्रकल्पाने २०२४ पर्यंत
शाळेत जाणाऱ्या ६.२५ दशलक्ष
मुला-मुलींपर्यंत पोहोचून
त्यांचे ज्ञान व कौशल्ये
वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले
आहे. जेणेकरून त्यांचा
आपल्या शरीराबद्दलचा आत्मविश्वास व आत्मसन्मान
वाढेल आणि शैक्षणिक
साहित्याच्या माध्यमातून भारतात त्यांना
आपली पूर्ण क्षमता
आजमावता येईल.
आपल्या सर्व ब्रॅण्ड्सच्या
पोर्टफोलिओद्वारे सौंदर्याची व्याख्या उत्क्रांत
करण्याच्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या जोरदार
प्रयत्नांचा हा एक
भाग आहे. “एचयूएल”
आणि “डव्ह” यांना
जो मोठा बदल
घडवून आणायचा आहे
त्या दिशेने टाकलेले
एक प्रागतिक पाऊल
म्हणजे हे अभियान
आहे.
ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे
#StopTheBeautyTest या अभियानात सहभागी व्हा.
अधिक जाणून घ्या
- www.dove.com/in/stop-the-beauty-test
अहवालाविषयी.
“इंडियाज ब्यूटी टेस्ट” हा डव्हचा अहवाल हन्सा रिसर्चद्वारे करण्यात आलेल्या एका स्वतंत्र सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. हे सर्वेक्षण डव्हने डिसेंबर २०२० मध्ये कमिशन केले होते. भारतातील १७ शहरांमधील १८ ते ३५ या वयोगटातील १०५७ स्त्रियांच्या एका ऑनलाइन प्रश्नावलीद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. या नमुन्यामध्ये प्रत्येक शहरातील स्त्रिया व मुलींना वय, प्रदेश व सामाजिक श्रेणीद्वारे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
Comments
Post a Comment