“Godrej aer” launches ‘Godrej aer power pocket’ with advanced power gel technology and a fresh set of fragrances

"गोदरेज एयर"ने आणले नवे 'गोदरेज एयर पॉवर पॉकेट' आधुनिक पॉवर जेल तंत्रज्ञान आणि ताज्या सुगंधांनी परिपूर्ण

मुंबई: घर, कार आणि स्नानगृहात उपयुक्त सुगंधांचा भारतातील आघाडीचा ब्रँड गोदरेज एयरने 'गोदरेज एयर पॉवर पॉकेट' ही नवी श्रेणी बाजारपेठेत दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. स्नानगृहात उपयोगात आणण्यासाठीच्या सुगंधाची अतिशय प्रभावी अशी ही श्रेणी आधीच्या एयर पॉकेट श्रेणीच्या जागी आणली जात आहे. नव्या पॉवर पॉकेटमध्ये सुगंधाचा संपूर्णपणे नवा सेट असून याचा सुवास ३० दिवसांपर्यंत स्नानगृहात दरवळत राहतो. गोदरेज एयर पॉवर पॉकेटमध्ये आधुनिक पॉवर जेल तंत्रज्ञान आहे जे प्रभावी आणि दीर्घकाळ टिकून राहणारा सुगंध देते. नव्या श्रेणीमध्ये सी ब्रीझ, फ्रेश ब्लॉसम, बेरी रश, लॅवेंडर ब्लूम आणि फ्लोरल डिलाईट हे सुगंध उपलब्ध आहेत.

२०१६ साली गोदरेज एयरने क्रांतिकारी 'गोदरेज एयर पॉकेट' सादर करून स्नानगृहांमधील सुगंधांचा नवा उत्पादन विभाग बाजारपेठेत निर्माण केला. हे गोदरेज एयरच्या सर्वाधिक यशस्वी उत्पादनांपैकी एक आहे. आता या ब्रॅंडने यामध्ये नव्या सुधारणा घडवून आणून एयर पॉवर पॉकेटच्या रूपात नवीन सुगंध सादर केले आहेत जे अधिक जास्त प्रभावी आणि दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात. यामध्ये अनोखे, आधुनिक पॉवर जेल तंत्रज्ञान असून त्यामुळे यातील सुगंध ३० दिवसांपर्यंत स्नानगृहाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून दरवळत राहतो.

गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत आणि सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील कटारिया यांनी सांगितले, "२०१६ साली जेव्हा गोदरेज एयर पॉकेट पहिल्यांदा बाजारपेठेत आणले गेले तेव्हा या उत्पादनाने स्नानगृहातील सुगंध उत्पादनांची नवी व्याख्या निर्माण केली. नावीन्यपूर्णतेवर सातत्याने भर देणाऱ्या आमच्या ब्रॅंडने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किफायतशीर किमतींमध्ये उत्कृष्ट दर्जाची उत्पादने पुरवण्याचा संकल्प केला आहे. नवे गोदरेज एयर पॉवर पॉकेट हे या विभागातील क्रांतिकारी उत्पादन आहे ज्यामध्ये आधुनिक पॉवर जेल तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये आम्ही सुगंधांचे पाच नवे आणि अनोखे पर्याय देत आहोत ज्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या खास आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी पुरेपूर वाव मिळणार आहे." 

नवी पॉवर पॉकेट श्रेणी ही सध्याच्या एयर पॉकेटच्या जागी आणली जात असली तरी किंमत मात्र बदललेली नाही. गोदरेज एयर पॉवर पॉकेटच्या एका युनिटची (सुंगंध कोणताही असो) किंमत फक्त ५५ रुपये आहे.

पॉवर पॉकेटच्या एक-एक स्वतंत्र युनिट्सच्या बरोबरीने ब्रॅंडने पॉवर पॉकेट सुगंधांचा कॉम्बो पॅक देखील आणला असून त्याची किंमत १६५ रुपये आहे (तीन युनिट्स) आणि च्या कॉम्बो पॅकची किंमत २७५ रुपये  (पाच युनिट्स) आहे. नवीन एयर पॉवर पॉकेट हे सर्व जनरल स्टोर्स, सुपरमार्केट्स आणि -कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. पॉवर पॉकेटच्या लॉन्चच्या निमित्ताने गोदरेज एयरने एक मास मीडिया कॅम्पेन देखील सुरु केले असून यामध्ये नवीन टीव्हीसीचाही समावेश आहे.

Comments