"Sur Nawa Dhyas Nawa - Asha Udyachi" soon on Colors Marathi

सूर नवा ध्यास नवाआशा उद्याचीलवकरच कलर्स मराठीवर!

मुंबई: महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे, त्या मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा कलर्स मराठी वाहिनीवरचा सूर नवा ध्यास नवा” हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच येत आहे..... सूर नवा ध्यास नवाआशा उद्याची” हे नवं कोरं पर्व घेऊन!! या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते १५ ते ३० वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे. 

या नव्या पर्वाच्या ऑडिशन्सची पहिली फेरी १८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वूटच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या पर्वात ऑडिशन्स देऊ इच्छिणाऱ्या १५ ते ३० वयोगटातील मुलींनी आपल्या आवाजातील मराठी (अत्यावश्यक) हिंदी गाण्यांचा व्हिडियो वूटवर पाठवायचा आहे. वूट वेबसाईटवर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. यातून निवडल्या जाणाऱ्या निवडक गायिकांबरोबर रंगणार सुरांचं हे अद्वितीय पर्व... आणि यातूनच मिळणार महाराष्ट्राची एक नवी आशा उद्याची!!!

या अनोख्या पर्वात गायक मुलींना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन लाडके परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायक, संगीतकार नि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे. संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत सूर नवा ध्यास नवाच्या या पर्वातून शोध घेतील, महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा.... महाराष्ट्राच्या नव्या गायिकेचा !! या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी. 

तर सज्ज व्हा, सुरांच्या या नव्या कोऱ्या सुमधूर मैफलीसाठी... सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची!!


 

Comments