“यूपीएल लि.”चा ‘एस अँड पी ग्लोबल सस्टेनॅबिलिटी इयरबुक 2021’ मध्ये समावेश
मुंबई: पर्यावरण, सामाजिक व
प्रशासकीय जोखीम व्यवस्थापनात प्रभावी
कामगिरी केल्याबद्दल "यूपीएल लि." या
कंपनीला ‘एस अँड
पी ग्लोबल सस्टेनॅबिलिटी
इयरबुक 2021’मध्ये स्थान देण्यात
आले आहे, अशी
माहिती या कंपनीतर्फे
आज देण्यात आली.
“एस अँड पी
ग्लोबल” तर्फे दरवर्षी ‘द
सॅम कॉर्पोरेट सस्टेनॅबिलिटी
अॅसेसमेंट’
(सीएसए) सादर केले
जाते. या वर्षी
या प्रतिष्ठित ‘इयरबुक’
मध्ये “यूपीएल”ला स्थान
मिळालेच; त्याशिवाय एखाद्या पीक
संरक्षण क्षेत्रातील कंपनीला यात
स्थान मिळण्याची ही
जगातील पहिलीच घटना ठरली.
यामुळे ही कंपनी
या उद्योग क्षेत्रातील
अग्रभागी असल्याचे स्पष्ट झाले.
या ‘इयरबुक’मध्ये
स्थान मिळालेल्या जागतिक
पातळीवरील 633 कंपन्यांमध्ये व भारतातील
21 कंपन्यांमध्ये ‘यूपीएल लि.’ चा
समावेश झाला आहे.
विश्लेषण
केलेल्या 61 औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या
स्पर्धात्मक स्थानावर परिणाम करणारे
आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक
कल आणि घडामोडी
यांतून मिळणार्या संधी
आणि जोखमींवर ‘सॅम’तर्फे माहिती देण्यात
येत असते. सन
1999 पासून सॅम वार्षिक
कॉर्पोरेट ‘सस्टेनॅबिलिटी अॅसेसमेंट’ आयोजित करीत
आहे. ‘कॉर्पोरेट सस्टेनॅबिलिटी’वर ‘सॅम’कडे सर्वात
मोठा आणि सर्वात
व्यापक असा जागतिक
डेटाबेस संकलित आहे.
“एस अँड पी
ग्लोबल” मधील ईएसजी
रिसर्च विभागाचे जागतिक प्रमुख
मनजित जस म्हणाले,
“सस्टेनॅबिलिटी इयरबुक 2021मध्ये स्थान
मिळाल्याबद्दल आम्ही ‘यूपीएल’चे
अभिनंदन करतो. सुमारे 7 हजारांहून
अधिक कंपन्यांचे मूल्यांकन
केल्यानंतर ‘यूपीएल’ची ‘इयरबुक’मध्ये निवड करण्यात
आली. यातून या
कंपनीची ‘कॉर्पोरेट सस्टेनॅबिलिटी’ बाबतची
कार्यक्षमता दिसून येते.”
‘इयरबुक’मध्ये सूचीबद्ध होण्यासाठी
कंपन्यांनी आपल्या उद्योग क्षेत्रात
अव्वल 15 टक्क्यांमध्ये गुण मिळवणे
आवश्यक आहे. तसेच
आपल्या उद्योग क्षेत्रातील अव्वल
कामगिरी करणार्या कंपन्यांच्या
30 टक्क्यांमध्ये ‘एस अँड
पी ग्लोबल ईएसजी
स्कोअर’ साध्य करणे आवश्यक
आहे.
“यूपीएल”चे मुख्य
कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ
म्हणाले, “सस्टेनॅबिलिटी इयरबुक 2021मध्ये स्थान
मिळणे हा आमचा
गौरव आहे आणि
यातून ‘सस्टेनॅबिलिटी’ मधील आमचे
नेतृत्वही सिद्ध होत आहे.
“सस्टेनॅबिलिटी”ला अनेक
भागधारकांच्या मनात मोठे
स्थान आहे. अशा
वेळी, आमच्या कार्याचा
वेग स्थिर ठेवण्याचे
व मोठ्या कामगिरीद्वारे
स्वतःला उत्तरदायी राखण्याचे आमचे
उद्दिष्ट आहे. बदल
घडवण्याचे आणि प्रत्येक
अन्न उत्पादन अधिक
टिकाऊ बनविण्याचे आमचे
ध्येय साध्य करण्याचा
हा एक मार्ग
आहे.”
“सीएसए” मधून कंपन्यांचे सस्टेनॅबिलिटी गुणांकन काढण्याव्यतिरिक्त, ‘सॅम’च्या ‘मीडिया अँड स्टेकहोल्डर अॅनेलिसीस’च्या (एमएसए) आधारे घेण्यात येणाऱ्या गुणात्मक चाचणीवरही ‘सस्टेनॅबिलिटी इयरबुक’ मध्ये समाविष्ट होणे अवलंबून असते. माध्यमांतून मिळालेली प्रसिद्धी व ‘रेपरिस्क ईएसजी बिझनेस इंटेलिजन्स’कडून पुरविण्यात आलेली सार्वजनिक माहिती यांच्या आधारावर एमएसए हे मूल्यांकन केले जाते. वर्षभरात उद्भवणार्या गंभीर स्वरुपाच्या शाश्वतपणाच्या मुद्द्यांवर कंपनी कसा प्रतिसाद देते, याचेही मूल्यमापन करण्यात येते.
“डीजेएसआय”ने ‘यूपीएल’ला पर्यावरणीय अहवाल, पाण्याशी संबंधित जोखीम आणि सामाजिक अहवालात 100 टक्के मानांकन दिले आहे. पर्यावरणीय परिमाणांनुसार कंपनीने 37 प्रश्नांपैकी 22 प्रश्नांमध्ये 100 टक्के गुण मिळवले. याव्यतिरिक्त, ‘मॉर्निंगस्टार’चे तज्ञ युनिट आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित ईएसजी निर्देशांकांपैकी एक असलेल्या ‘सस्टेनॅलिटिक्स’ने, पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय जोखीम व्यवस्थापनात* ‘क्रमांक एकची एजीकेम कंपनी’, असे ‘यूपीएल’चे मानांकन केले आहे.
* सस्टेनॅलिटिक्स
ईएसजी रिस्क रेटिंग
सारांश अहवाल, 25 सप्टेंबर 2020.

Comments
Post a Comment