“Godrej Interio” signs three agreements for Bangalore, Mumbai, and Kochi Metro projects, big lead in B-2-B business

"गोदरेज इंटिरीओ"ने बंगळुरू, मुंबई व कोची मेट्रो प्रकल्पांसाठी केले तीन करार, ‘बी-2-बी’ व्यवसायात मोठी आघाडी...

मुंबई: “गोदरेज इंटिरीओ या भारतातील आघाडीच्या फर्निचर सोल्यूशनमधील ब्रँडला बंगळुरू, मुंबई आणि कोची येथील मेट्रो प्रकल्पांसाठी 250 कोटी रुपयांची कंत्राटे नुकतीच मिळाली. यातून, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांतील अग्रगण्य कंत्राटदार म्हणून आपले स्थान या कंपनीने आणखी बळकट केले आहे. या मेट्रो प्रकल्पांमध्ये कंपनीकडे सिव्हिल फिनिश, क्लॅडिंग, ब्लॉकची कामे, फेकेड ग्लेझिंग, मेटल सीलिंग, अ‍ॅल्युमिनियम लुव्र, स्ट्रक्चरल स्टीलची कामे, प्लंबिंग, रेलिंग, फलोत्पादन अशी कामे सोपविण्यात आली आहेत

या मेट्रो प्रकल्पांच्या मुख्य सल्लागारांमध्ये मुंबईसाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (डीएमआरसीएल), बंगळुरूसाठी बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (बीएमआरसीएल) आणि कोची प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड’ (केएमआरएल) यांचा समावेश आहे.

गोदरेज इंटिरीओने आतापर्यंत 1500 टर्नकी प्रकल्प वितरीत केले आहेत. यामध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत भारताचा पहिला ग्रीनफील्ड विमानतळ, कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. आता गोदरेज इंटरिओ कोलकाता, बंगळुरू, मुंबई आणि कोची यांसह देशभरातील चार मेट्रो रेल प्रकल्पांचाही एक भाग झाला आहे.

गोदरेज इंटिरीओला मिळालेल्या कंत्राटांमध्ये, मुंबई मेट्रोतील दहीसरपासून कामराजनगर परिसर या दरम्यानलाईन वरील नऊ स्थानके आहेत. तसेच, बंगळुरू येथील एचएसआर नगर ते बोम्मसान्द्रा यांना जोडणाऱ्यारीच 2’ रीच 5’ वरील 12 स्थानके आणि कोची मेट्रो मार्गासाठी 2 स्थानके समाविष्ट आहेत

या प्रकल्पावर भाष्य करताना, गोदरेज इंटिरीओचे सीओओ अनिल सैन माथुर म्हणाले, मेक इन इंडिया मोहिमेच्या अनुषंगाने गोदरेज इंटिरीओ कंपनी देश घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यास नेहमीच अग्रणी राहिली आहे. आमच्या टर्नकी प्रकल्प विभागासाठी बंगळुरू, मुंबई कोची हे मेट्रो प्रकल्प मिळाले, याचा आम्हाला आनंद झाला आहे. देशभरात मजबूत सार्वजनिक वाहतूक नेटवर्क तयार करण्याच्या भारताच्या योजनेमध्ये, टर्नकी सोल्यूशन्स वितरीत करून एकंदरीतच सहभागी होऊन आमच्या कौशल्याच्या माध्यमातून प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी, संबंधित मेट्रो रेल कॉर्पोरेशन्सबरोबर आम्ही काम करीत आहोत. आम्हाला खात्री आहे की, या अभिनव डिझाइन सोल्यूशन्समुळे आमचे भागीदार असलेल्या बंगळुरू, मुंबई आणि कोची मेट्रो प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि समकालीन स्वरूप आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने उच्च मापदंडांची पूर्तता होईल. आमच्या बी-2-बी विभागातील उलाढालीमध्ये हे टर्नकी प्रकल्प 50 टक्क्यांपर्यंत योगदान देतील, अशी आमची अपेक्षा आहे.”

डिझाईन ते अंमलबजावणीपर्यंत एंड-टू-एंड सोल्यूशन देऊन बाजारपेठेतील आपली स्थिती मजबूत करण्यासाठी गोदरेज इंटिरीओ कटिबद्ध आहे. आर्किटेक्ट, इंटिरियर डिझाइनर्स आणि प्रोजेक्ट मॅनेजर्स यांसह अनुभवी अवकाश नियोजन व्यावसायिकांची या कंपनीची टीम सुरळीत अनुभव सुनिश्चित करते. सर्वसाधारण कंत्राटी कामे करणे, डिझाईन, तसेच नागरी कामे, इंटिरियर, एमईपी, सुरक्षा पाळत ठेवणे, ग्रीन कन्सल्टन्सी आणि एव्ही सोल्युशन्स अशा सर्व कामांची अंमलबजावणी अशी आमच्या कामाची व्याप्ती आहे.

Comments