"Bisleri" is launching India's first clean plastic sorting and collection center to combat plastic pollution

"बिस्लेरी" प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सुरू करत आहे भारतातील पहिले स्वच्छ प्लास्टिक वर्गीकरण व संकलन केंद्र

मुंबई: भारतात प्लास्टिक प्रदूषण हे मोठे आव्हान आहे. याचा विचार करा: भारतात २०१९-२०२० या वर्षात २६,००० टन प्लास्टिक कचरा गोळा झाला, यापैकी केवळ ६० टक्के रिसायकल करता येण्याजोगे प्लास्टिक होते. उर्वरित ४० टक्के प्लास्टिक भरावक्षेत्रांत टाकले गेले किंवा तलाव अथवा जलाशयांमध्ये प्रदूषक म्हणून सोडले गेले. (स्रोत: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ). याचे एकच कारण म्हणजे घाणेरड्या अवस्थेत विल्हेवाट लावलेले प्लास्टिक रिसायकलिंगसाठी उचलले जात नाही आणि ते आजूबाजूला पडून राहते. या जागतिक पर्यावरण दिनी, "बिस्लेरी" (Bisleri) या भारतातील बाटलीबंद पाण्याच्या सर्वांत विश्वासाच्या ब्रॅण्डने मुंबईतील मरोळ येथे भारतातील पहिले स्वच्छ प्लास्टिक वर्गीकरण व संकलन केंद्र सुरू केले आहे. "बिस्लेरी" हा ब्रॅण्ड कायमच अधिक स्वच्छ व अधिक हरित पर्यावरणाच्या दिशेने काम करत आला आहे.

'बिस्लेरी शोकेस सेंटर' हा कंपनीच्या 'बॉटल्स फॉर चेंज' (Bottles for Change) या २०१७ मध्ये सुरू झालेल्या कार्यक्रमाचा भाग आहे आणि ग्राहकांमध्ये प्लास्टिक प्रदूषण तसेच प्लास्टिक कचरा विल्हेवाटीच्या योग्य पद्धती यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट या केंद्रापुढे आहे. बिस्लेरीने स्थापनेपासून ६,५०० टनांहून अधिक प्लास्टिक रिसायकल केले आहे. त्याचप्रमाणे 'बॉटल्स फॉर चेंज' कार्यक्रमाचा भाग म्हणून जागरूकता निर्माण करण्यासाठी स्थानिक सरकारी यंत्रणांसोबत काम केले आहे.

अधिक स्वच्छ पर्यावरणासाठी असलेल्या आपल्या बांधिलकीची पुन्हा एकदा ग्वाही देत, कंपनीने भविष्यकाळातील वर्गीकरण या संकल्पनेतून मरोळ येथील केंद्राची स्थापना केली आहे. २५ टन वापरलेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याची मासिक क्षमता असलेले हे केंद्र एमसीजीएमच्या (बृहन्मुंबई महानगर पालिका) के-पूर्व प्रभागाने दिलेल्या २,४०० चौरस फुटांच्या भूखंडावर बांधण्यात आले आहे. या आस्थापनाचे वेगळेपण म्हणजे प्लास्टिकच्या वर्गीकरण व विल्हेवाटीची योग्य पद्धत प्रदूषणाची समस्या हाताळण्यात कशी उपयुक्त ठरू शकते याचे प्रात्यक्षिक येथे दाखवले जाते. या आस्थापनाच्या अंतर्गत रचनेत (इंटिरिअर्स) १,५०,००० एमएलपी (बहुस्तरीय प्लास्टिक) रिसायकल्ड बॅग्जपासून (बिस्किट, चिप्स व चॉकोलेट रॅपर्स) तयार केलेल्या पार्टिशन्सचा वापर करण्यात आला आहे. १०० चौरस फूट क्षेत्रात १०० किलो रिसायकल्ड कठीण प्लास्टिक ब्लॉक्सपासून (कठीण प्लास्टिक म्हणजे ज्युसचे कंटेनर्स, फूड कंटेनर्स, खेळणी, शॅम्पू व कंडिशनरच्या बाटल्या आदी) प्रवेशाची जागा (एण्ट्रन्स रॅम्प) तयार करण्यात आली आहे. हा रॅम्प ३० टनांपर्यंत वाहनांचे वजन पेलू शकेल एवढा भक्कम आहे.

हे क्रांतिकारी आस्थापन नागरिकांना प्लास्टिक वर्गीकरण व रिसायकलिंगचे महत्त्व पटवून देण्याचे केंद्र म्हणूनही काम करणार आहे. या केंद्रात सवयींमधील बदल, रिसायकलिंगच्या विविध पद्धती यांबद्दलची माहिती लावण्यात आली आहे आणि रिसायकल्ड प्लास्टिक वापरून तयार करण्यात आलेली अनेकविध उत्पादनेही येथे प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडलेली आहेत. यात कोठेही सौंदर्यदृष्टीशी तडजोड केलेली नाही. या प्लाण्टमध्ये प्लास्टिक थेट रिसायकलिंगसाठी पाठवले जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बेलिंग मशिनसह कन्व्हेयर बेल्ट आहे. त्याचप्रमाणे ग्रीन प्लास्टिक एजंट्ससाठी स्वच्छ परिसर आणि आरोग्यपूर्ण कार्यस्थळाची निश्चितीही करण्यात आली आहे.

बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्केटिंग व अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाच्या संचालक श्रीमती अंजना घोष बिस्लेरी शोकेस सेंटरच्या शुभारंभप्रसंगी म्हणाल्या, "बिस्लेरी गेल्या चार वर्षांपासून प्लास्टिक व्यवस्थापनासाठी तळमळीने काम करत आहे. पुढील काही वर्षांत १०,००० मेट्रिक टन प्लास्टिक रिसायकल करण्याचे व त्याही पुढे जाण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. आम्ही मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमध्ये विविध उपक्रम सुरू केले आहेत. यात आम्ही गृहनिर्माण संस्था, कंपन्या व शाळांमध्ये शैक्षणिक कार्यशाळांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहोत. पर्यावरणातील प्रदूषण केवळ प्लास्टिकमुळे आहे हा सर्वदूर पसरलेला समज दूर करण्याचाही प्रयत्न आम्ही करत आहोत. मुळात प्लास्टिक हानीकारक नाही, तर त्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती घातक ठरत आहेत, हे जनतेला पटवून देण्याचे उद्दिष्टही आमच्यापुढे आहे. बिस्लेरी शोकेस सेंटर हा आमच्या  'बॉटल्स फॉर चेंज' चळवळीतील महत्त्वाचा टप्पा आहे आणि नागरिकांना, विशेषत: आपल्या पुढील पिढ्यांना, प्लास्टिकच्या अक्षय व अमर्याद संभाव्यता प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने त्याचे वर्गीकरण व रिसायकलिंग करण्याबाबत शिक्षित करण्याच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे."

या प्रकल्पाचे उद्दिष्ट समाजाच्या सवयीमध्ये बदल घडवून लोकांमध्ये प्लास्टिक स्वच्छ करणे, कचऱ्यातून वेगळे काढणे आणि ते रिसायकलिंगला पाठवणे या क्षमता विकसित करणे हे आहे. प्लास्टिक म्हणजे कचरा हा समाजाचा समज दूर करून त्याची विल्हेवाट जबाबदारीने लावण्यासाठी उपाय शोधणे आवश्यक आहे असे बिस्लेरीला वाटते. बिस्लेरीचे बहुनगरी जागरूकता अभियान नागरिक, कंपन्या व संस्थांपर्यंत पोहोचले आहे. कंपनी मुंबई महानगरपालिका, दक्षिण दिल्ली महानगरपालिका, पूर्व दिल्ली महानगरपालिका, उत्तर दिल्ली महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि वसई विरार महानगरपालिका यांच्यासोबत सक्रियपणे काम करत आहे.

"यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण अभियाना'चा भाग म्हणून दिल्लीने प्लास्टिक रिसायकलिंग व कचरा व्यवस्थापन शिक्षणाचे काम हाती घेतले आहे. दक्षिण, पूर्व व उत्तर दिल्ली महानगरपालिकांच्या (एसडीएमसी, ईडीएमसी आणि एनडीएमसी) माध्यमातून हे काम केले जात आहे. या यंत्रणा आमच्या  'बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, ही आमच्या प्रयत्नांना मिळालेली पावती आहे. यामुळे अन्य शहरांतील स्थानिक यंत्रणांनाही प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आम्हाला वाटते," असे श्रीमती घोष यांनी नमूद केले.

मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथील महापालिका यंत्रणाही "बॉटल्स फॉर चेंज" या कार्यक्रमात गेल्या दोन वर्षांपासून सहभाग घेत आल्या आहेत आणि प्लास्टिकचे वर्गीकरण व विल्हेवाट यांबाबत या महापालिकांच्या क्षेत्रांत सकारात्मक बदल तसेच धारणेमध्ये हळूहळू स्थित्यंतर दिसून येत आहेत. एमसीजीएमच्या के-पूर्व प्रभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपअभियंते (एई) पंकज घोंगे म्हणाले, "स्वच्छ प्लास्टिक वर्गीकरणासाठी मुलभूत प्रयत्न केल्याबद्दल आम्ही बिस्लेरीचे अभिनंदन करतो. आम्ही या कंपनीशी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून जोडलेलो आहोत आणि 'बॉटल्स फॉर चेंज' अभियानातील प्रत्यक्ष कामाबाबतच्या जाणिवेतूनच म्हणून हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. स्वच्छ प्लास्टिकचे स्रोताशीच वर्गीकरण व रिसायकलिंग हा सध्याच्या प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येवरील उपाय आहे."

नवी मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे म्हणाले, "बिस्लेरीच्या 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमाची अंमलबजावणी नवी मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. वापरलेल्या प्लास्टिकचे व्यवस्थापन आणि त्याच्या विल्हेवाटीच्या योग्य पद्धती यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची खूप मदत झाली आहे. नागरिकांनी दिलेला प्रतिसादही प्रोत्साहक आहे. खरे तर हे अभियान आपल्या आवारात राबवा असे आवाहन करणारी पत्रे आम्ही यावर्षी अनेक गृहनिर्माण संस्थांना पाठवली आहेत. वर्तनात बदल घडवून आणणे हे कठीण काम आहे आणि बिस्लेरीची टीम हे कठीण काम यशस्वीरित्या करत आहे."

ठाणे महानगरपालिकेतील प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा मदन प्रधान या उपक्रमाबद्दल म्हणाल्या, "ठाणे महानगरपालिका गेल्या दोन वर्षांपासून बिस्लेरीच्या 'बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमात काम करत आहे. उपभोक्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाने आम्हाला प्रचंड मदत केली आहे. या उपक्रमाचे प्रमुख वेगळेपणे असे की, यात नागरिकांना त्यांच्या स्तरावरच प्लास्टिकचे वर्गीकरण करण्याची व ते रिसायकलिंगसाठी पाठवण्याची सूचना केली जाते. यामुळे आमच्या संसाधनांवरील ताण कमी झाला आहे आणि आम्ही त्यामुळे नागरिकांसोबत काम करू शकत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला २०० टन प्लास्टिक, भरावक्षेत्रात टाकण्याऐवजी, रिसायकलिंगसाठी पाठवणे शक्य झाले आहे."

पनवेल महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव म्हणाले, "पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रम राबवण्यासाठी आम्ही बिस्लेरीला नुकतीच परवानगी दिली आहे. हा उपक्रम 'स्वच्छ भारत मिशन'शी सुसंगत असल्याने तो यशस्वी करण्यासाठी आमची एकमेकांच्या साथीने काम करण्याची इच्छा आहे. प्रत्येक नागरिकाने छोटी पावले उचलावीत आणि याची सुरुवात वापरानंतर प्लास्टिक स्वच्छ करण्यापासून तसेच त्याची वर्गवारी करण्यापासून करावी यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत."

'बॉटल्स फॉर चेंज' अभियानाच्या माध्यमातून बिस्लेरी ६ लाख व्यक्तींपर्यंत, ८०० गृहनिर्माण संस्थांपर्यंत, ४०० शाळा व कॉलेजांपर्यंत, ५०० हॉटेल व रेस्टोरंट्सपर्यंत, ५०० कंपन्यांपर्यंत पोहोचली आहे. आत्तापर्यंत ६०० जागरूकता सत्रे घेण्यात आली आहेत. या उपक्रमाने प्लास्टिक एजंट्सना वापरलेले पण स्वच्छ प्लास्टिक (यात हार्ड व सॉफ्ट दोन्ही प्लास्टिक येते) गोळा करण्याचे माध्यम व संधी अनेकविध संबंधितांमार्फत पुरवली आहे. रिसायकलिंगसाठी स्वच्छ प्लास्टिक जमा करण्याच्या उद्दिष्टासह या उपक्रमाने ग्रीन प्लास्टिक एजंट्सना सक्षम करण्याचे व सामाजिक बदलाला चालना देण्याचे ध्येयही ठेवले आहे.

बिस्लेरीने इंडियन ऑइल, पश्चिम रेल्वे, मुंबई विद्यापीठाचा एनएसएस विभाग, मुंबई शेअर बाजार, गोदरेज, जेपी मॉर्गन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तसेच यांसारख्या अनेक कंपन्यांसोबतही काम केले आहे. सध्या बिस्लेरी चेन्नईत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सुंदरम मेडिकल फाउंडेशन आदींसोबत काम करत आहे.
 

Comments