शेमारू स्पीकर्स 'रक्षाबंधन' साठी एक उत्तम भेट
मुंबई: या वर्षी रक्षाबंधनासाठी, शेमारूने 'प्री-लोडेड स्पीकर्स'च्या स्वरूपात एक अद्भुत भेटवस्तूचा पर्याय सादर केला आहे. या भेटवस्तूच्या माध्यमातून भावंडे एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी व्यक्त करू शकतात. अशा प्रसंगी "शेमारू स्पीकर्स" ही एक परिपूर्ण भेटवस्तू ठरते; कारण या भेटीमुळे त्यांच्या जीवनात शांतता व समाधान यांची प्राप्ती होऊ शकते. शेमारू स्पीकर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, त्यांची विस्तृत श्रेणी सादर करण्यात आली आहे. यामध्ये ‘शेमारू भगवत गीता’, ‘शेमारू हिंदू भजन स्पीकर’, ‘शेमारू अमृतबाणी’ आणि ‘शेमारू भक्ती मलाई’ यांचा समावेश आहे.मोहक रचना आणि विस्तृत संकलना व्यतिरिक्त, हे स्पीकर्स एका विशेष संदेशासह एक्सप्रेस डिलिव्हरीतून मिळतात, त्यामुळे ते भेट देण्यासाठी अगदी आदर्श ठरतात. शिवाय, ग्राहक सर्व खरेदीवर ‘RAKHI20’ हा कोड वापरून 20 टक्के सूटदेखील घेऊ शकतात.
सौंदर्यशाली डिझाइन असलेल्या या 'शेमारू ब्लूटूथ स्पीकर्स'सोबत रिमोट कंट्रोल देण्यात आला आहे. त्यातून ग्राहकांना सुलभ व जलद रितीने आपल्याला हवे ते संगीत निवडता येते. १०वॅटचे स्पीकर्स आणि १० तास चालणारी बॅटरी यांचा या उत्पादनामध्ये समावेश करण्यात आला आहे. हे स्पीकर्स ‘डिव्हाईसेस डॉट शेमारू डॉट कॉम’ या वेबसाईटवर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत किंवा क्रोमा, रिलायन्स डिजिटल, रिटेलमध्ये खरेदी करु शकता.
तुमच्या भावंडांवर कल्याण, अध्यात्म व भक्ती यांची शिंपण करण्यासाठी आताच ऑर्डर करा आणि भावंडांवरील दृढ प्रेम व अतूट बंध साजरे करा.
Comments
Post a Comment