"UPL" wins 'National IP Award -2020' & 'WIPO IP Enterprises Trophy'

"यूपीएल"ने जिंकले 'राष्ट्रीय आयपी पारितोषिक २०२०' आणि 'विपो आयपी एन्टरप्राईज चषक'

नवी दिल्ली: शाश्वत कृषी उत्पादने आणि सुविधा यांची जागतिक पुरवठादार कंपनी असणाऱ्या "यूपीएल लिमिटेड"ने (NSE:UPL&BSE:512070) २०२० वर्षासाठीचे “पेटंट आणि भारतातील व्यावसायिकीकरण: उत्पादन क्षेत्र यासाठीची आघाडीची सार्वजनिक/खाजगी लिमिटेड कंपनी” या विभागातील प्रतिष्ठेचे 'राष्ट्रीय बौद्धिक स्वामित्व हक्क पारितोषिक' पटकावले असल्याचे आज जाहीर केले. राष्ट्रीय आयपी पारितोषिकांसाठी ११ विभाग होते आणि वाणिज्य व उद्योग मंत्री मा. श्री. पियुष गोयल यांच्या हस्ते १७ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
 
जोडीला, जिनिव्हा स्थित जागतिक बौद्धिक स्वामित्व हक्क संघटनेने (विपो) बौद्धिक स्वामित्व कार्यालय, भारत यांच्या वतीने यूपीएलला 'विपो आयपी एन्टरप्राईज चषक' प्रदान केला. याआधी यूपीएलने २०१९ मध्ये ‘जागतिक ब्रँड निर्मितीसाठीची आघाडीची भारतीय कंपनी’ या विभागात राष्ट्रीय बौद्धिक स्वामित्व हक्क पुरस्कार आणि ‘विपो युजर्स ट्रॉफी’ पटकावली होती.
 
पेटंट, डिझाईन, ट्रेडमार्क्स आणि भौगोलिक संदर्भ या क्षेत्रात असाधारण कामगिरी करणारे विकसक, संस्था आणि कंपन्या यांना ऑफीस ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, डिझाईन, ट्रेडमार्क्स (CGPDTM), उद्योग आणि अंतर्गत व्यापार वृद्धी विभाग (DPIIT), भारत सरकारचा वाणिज्य आणि उद्योग विभाग यांच्यातर्फे राष्ट्रीय बौद्धिक स्वामित्व हक्क (आयपी) पुरस्कार प्रदान केले जातात.
 
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल बोलताना यूपीएल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.रजनीकांत श्रॉफ म्हणाले, “यूपीएल मध्ये शेतकऱ्यांच्या गरजांना प्रथम प्राधान्य देत त्यांच्या गरजांना अनुसरून उत्पादन आणि सेवांची निर्मिती केली जाते याचा आम्हांला अभिमान आहे. नाविन्यपूर्णतेवर आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केलेले असल्यामुळे दरवर्षी नवीन उत्पादने सादर करायला आम्हांला मदत होते. यूपीएल कडे १,४०० मान्यताप्राप्त पेटंट असून वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील शेतकऱ्यांच्या गरजा भागविणाऱ्या नवनवीन शोधांसाठीचे साधारण २,९०० च्या आसपास विहित अर्ज भरलेले आहेत.”
 
प्रगतीशील नाविन्यपूर्ण मार्गांचा वापर करून भारतीय कृषी क्षेत्रात सातत्याने पर्यावरणपूरक पद्धती यूपीएलने राबविल्या आहेत. अलिकडेच सादर झालेले एनपीपी (नैसर्गिक आणि जैविक कृषी उत्पादने आणि तंत्रज्ञान यासाठीचे नवीन जागतिक व्यवसाय युनिट) आणि नर्चर.फार्म (उत्पादने, नाविन्यपूर्णता आणि यांत्रिकीकरण यांच्या पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांकरता डिजीटल व्यासपीठ) हे आमच्या शाश्वत शेतीकडे भर असणाऱ्या दृष्टिकोनाचे द्योतक आहे.

अलिकडच्या काळात, यूपीएलला क्लॅरीव्हेट पीएलसी. कडून इनोव्हेशन फोरम मध्ये कृषीविषयक व्यवसाय विभागात 'क्लॅरीव्हेट साऊथ अँड साउथ इस्ट एशिया इनोव्हेशन अ‍ॅवार्ड २०२०' मिळाले. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीनेही यूपीएलला २०१९ आणि २०२० मध्ये पेटंट मोठे व्यवसाय विभागात 'सीआयआय इंडस्ट्रीयल आयपी' पुरस्काराने आणि २०१९ मध्ये ट्रेडमार्क पेटंट मोठे व्यवसाय विभागात 'सीआयआय इंडस्ट्रीयल आयपी' पुरस्काराने गौरविले आहे.

Comments