"गोदरेज अप्लायन्सेस"ने, यंदाच्या 'जागतिक ओझोन दिना'निमित्त, सादर केले हरीत तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आणखी एक कारण
मुंबई: 'सोच के बनाया है' किंवा ‘विचारपूर्वक बनविलेली उपकरणे’ या ब्रँड तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, ‘आर२९०’ हे ‘हायड्रोकार्बन रेफ्रिजरंट’ वापरून भारतातील सर्वात पर्यावरणपूरक एअर कंडिशनर्स बनविणारा "गोदरेज अप्लायन्सेस" हा देशातील पहिला ब्रॅंड ठरला आहे, अशी माहिती गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, "गोदरेज अँड बॉइस"तर्फे देण्यात आली आहे. 'गोदरेज अप्लायन्सेस'हा 'गोदरेज अँड बॉइस'चा घरगुती उपकरणांच्या क्षेत्रातील अग्रगण्य असा उद्योग आहे. या एअर कंडिशनर्समधील ओझोनचा क्षय करण्याची शून्य क्षमता (ओझोन डिप्लीशन पोटेन्शिअल - ओडिपी) आणि जागतिक तपमान वाढविण्याची कमीतकमी क्षमता (ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल - जीडब्ल्यूपी) यांचे मूल्य केवळ ३ इतकेच आहे. यंदाच्या ‘जागतिक ओझोन दिना’निमित्त, या ब्रँडने ग्राहकांना एक अनोखी 'एक्सचेंज ऑफर' सादर करून हरीत तंत्रज्ञानासाठीची आपली कटिबद्धता कायम ठेवली आहे. या ऑफरअंतर्गत, ग्राहकांना आपला जुना, ‘आर२२ रेफ्रिजरंट’ असलेला एअर कंडिशनर एक्सचेंज करून त्या बदल्यात नवीन एअर कंडिशनर घेता येईल. ब्रॅंडतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व ऑफर्सबरोबरच २ हजार रुपयांचे एक्सचेंज मूल्यही त्यांना मिळेल. देशभरातील "गोदरेज"ची सर्व 'एक्सक्युजिव्ह ब्रॅंड आऊटलेट्स', 'ग्रीन एसी हब्स' आणि 'प्रेफर्ड ब्रॅंड आऊटलेट्स' येथे ही ऑफर केवळ १६ सप्टेंबर २०२१ या दिवशी उपलब्ध असणार आहे.
'ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी'च्या निकषांनुसार, चांगल्या दर्जाच्या 'ग्रीन रेफ्रिजरंट्स'च्या प्रमुख घटकांमध्ये जागतिक तपमान वाढविण्याची क्षमता (जीडब्ल्यूपी) आणि ओझोनचा क्षय करण्याची क्षमता (ओडिपी) यांचा समावेश होतो. ‘गोदरेज एअर कंडिशनर्स’मध्ये, शून्य ओडिपी व नगण्य प्रमाणातील ३ इतके मूल्य असलेली ‘जीडब्ल्यूपी’, तसेच ‘आर३२ रेफ्रिजरंट’साठीचे सर्वोत्तम असे ६७५ मूल्य, अशा बाजारात उपलब्ध असणाऱ्या सर्वाधिक हरीत अशा घटकांचा वापर करण्यात येतो. यातून ओझोनच्या थरावर शून्य परिणाम होतो आणि पृथ्वीचे व तिच्याभोवतालच्या वातावरणाचे सूर्याच्या हानिकारक अशा अतिनील किरणांपासून संरक्षण होते.
हवामान बदलांविषयीच्या आंतरसरकारी पॅनेलने (आयपीसीसी) अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला. ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन हे जागतिक हवामान बदलाचे प्रमुख कारण असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या विश्लेषणानुसार, येत्या दोन दशकांमध्ये जागतिक तपमान सुमारे 1.5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ओझोनचा थर घटविणाऱ्या पदार्थांचे नियमन करीत ओझोन थराचे संरक्षण करून, ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ने वनस्पतींचे आणि वातावरणातील कार्बन खेचण्याच्या त्यांच्या क्षमतेचे संरक्षण करण्यास मदतच केली आहे, तसेच हवामानातील बदल लक्षणीय पातळीवर रोखले आहेत.
‘गोदरेज अप्लायन्सेस’ या ब्रॅंडने पर्यावरण रक्षणासंदर्भात आपल्या दीर्घकालीन बांधिलकीच्या अनुषंगाने, ‘सीएफसी’, ‘एचसीएफसी’ व ‘एचएफसी’ यांपासून १०० टक्के मुक्त (आर६००ए) असे रेफ्रिजरेटर २००१ मध्ये बनविले आणि ती या उत्पादनातील भारतातील पहिली व एकमेव कंपनी बनली. ओझोनचा क्षय करण्याची शून्य क्षमता आणि जागतिक तपमान वाढविण्याची कमीतकमी क्षमता असलेल्या हरीत वायूंसह एसी तयार करणारा हा भारतातील पहिला ब्रँड ठरला (आर२९०, वर्ष २०१२). उत्पादनांच्या पलीकडे जाऊन आपली कटिबद्धता जपणाऱ्या या ब्रॅंडच्या दोन्ही कारखान्यांनी (मोहाली व शिरवळ) प्रतिष्ठित सीआयआयद्वारे ‘रेटेड प्लॅटिनम प्लस ग्रीन कंपनी’ हे मानांकन मिळवले असून ते मिळविणारी ही भारतातील पहिल्या कंपन्यांपैकी एक ठरली आहे.
‘गोदरेज एसी’मध्ये इन्व्हर्टर तंत्रज्ञान आणि 10 वर्षांची कॉम्प्रेसर वॉरंटी या गोष्टी येतात. 1 टीआर, 1.5 टीआर आणि 2 टीआर या कूलिंग क्षमतेमध्ये आणि ‘थ्री-स्टार’ व ‘फाईव्ह-स्टार’ श्रेणीमध्ये हे पर्यावरण-पूरक गोदरेज एसी उपलब्ध आहेत. ‘नॅनो-कोटेड अँटी-व्हायरल फिल्टर’, शंभर टक्के कॉपरने बनलेली कंडेन्सर, इव्हॅपोरेटर व कनेक्टिंग पाईप्स ही सामग्री, ‘ट्विन रोटरी कॉम्प्रेसर’, इव्हॅपोरेटर व कंडेन्सरवरील ‘अँटी-करोसिव्ह कोटिंग’, ‘स्मार्ट डायग्नोसिस’, 52 डिग्री सेल्सियस तपमानावर ‘हेवी ड्यूटी कूलिंग’, ‘सायलेंट ऑपरेशन’, ‘अॅक्टिव्ह कार्बन फिल्टर’, ‘अँटी-बॅक्टेरियल फिल्टर’, ‘अँटी डस्ट फिल्टर’, ‘अँटी-मायक्रोबियल सेल्फ-क्लीनिंग’ अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे एसी परिपूर्ण झालेले आहेत. यांतील ‘थ्री-स्टार एसी’साठी 3.5 ते 3.95 आयएसईईआर आणि ‘फाईव्ह-स्टार एसी’साठी 4.54 आयएसईईआर आहे. हा ब्रँड आपल्या ग्राहकांसाठी सुसंगत नवकल्पनांसह विचारपूर्वक तयार केलेली उत्पादने प्रदान करतो.
‘गोदरेज अप्लायन्सेस’च्या एअर कंडिशनर्स या उत्पादनासाठीचे समूह प्रमुख संतोष सलियन म्हणाले, “कमी कार्बन फूटप्रिंटसह उत्पादने विकसीत करण्यास आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो आणि ‘आर२९० रेफ्रिजरंट’ असलेला आमचा पोर्टफोलिओ हे याचे उदाहरण आहे. ‘एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड’ने (ईईएसएल) देखील ‘सुपर-एफिशिएंट एसी’ (मार्च 2021) या विषयावरील अहवालात नुकतेच नमूद केले आहे, की ‘आर२९० रेफ्रिजरंट’ असलेले आमचे एसकेयू हे ‘6.15 आयएसईईआर’ रेटिंग आणि 36.6 टक्के अधिक कार्यक्षमता देतात. यापुढील काळात भारतातील उद्योग जागतिक उत्सर्जनाबाबतचे निकष पाळण्यासाठी आपल्या ‘रूम एअर कंडिशनर्स’च्या पोर्टफोलिओमध्ये ‘आर२९० रेफ्रिजरंट्स’चा अधिकाधिक अवलंब करतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच आम्ही ग्राहकांना त्यांचे ‘आर२२ रेफ्रिजरंट’चे एअर कंडिशनर बदलण्यास प्रोत्साहित करीत आहोत. त्याबदल्यात आम्ही त्यांना ‘गोदरेज एअर कंडिशनर्स’च्या श्रेणींमधील पर्यावरण-पूरक व ऊर्जा कार्यक्षम असे प्रकार देऊ करीत आहोत. यातून त्यांना वीजबिल कमी करण्यास मदत मिळेल. आमच्या सर्व विशेष आउटलेट्समध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.”
"गोदरेज अँड बॉइस" ही कंपनी पर्यावरणास अनुकूल उत्पादने बनविण्याखेरीज, मुंबईच्या विक्रोळी येथे खारफुटी परिसंस्थेचे संरक्षणही गेल्या काही दशकांपासून करीत आहे. ही परिसंस्था कार्बनचे लाखो प्रमाणात पृथक्करण करते. हवा शुद्ध करण्यासाठी आणि हवामानातील बदलांशी लढण्यासाठी ती फार महत्त्वाची आहे.
Comments
Post a Comment