"फेडएक्स एक्सप्रेस" सर्वेक्षणाचा निष्कर्ष, भारत भविष्यासाठी सज्ज आहे.
भारत: "फेडएक्स कॉर्प." (NYSE: FDX) ची सहायक कंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी, फेडएक्स एक्सप्रेसने आज आपल्या "फ्यूचर इज नाउ" सर्वेक्षणाच्या निष्कर्षांची घोषणा केली, ज्यामध्ये भविष्य स्वीकारण्याबाबत भारताच्या सज्जतेची सखोल ओळख करवून देण्यात आली आहे.
भारत परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे, महामारीमुळे देशात डिजिटल बदलांचा वेग वाढला आहे. आरोग्यसेवांपासून शिक्षणापर्यंत, बँकिंगपासून उत्पादनापर्यंत, तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात बदल घडवत आहे, प्रत्येक क्षेत्राला संधी व शक्यतांनी भरलेल्या भविष्याकडे नेत आहे. या सर्वेक्षणात १८ शहरांमधील ४००० पेक्षा जास्त लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या, त्यांच्यापैकी ७९% लोकांनी सांगितले की, भारत भविष्यासाठी सज्ज जगाच्या निर्मितीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानांना प्राधान्य देत आहे. जवळपास ८३% लोक असे मानतात की, सायन्स फिक्शन सिनेमांमध्ये दाखवली जाणारी तंत्रे एक तर आधीपासूनच त्यांच्या जीवनात आहेत किंवा पुढील काही वर्षात येतील अशी शक्यता आहे.
तंत्रज्ञानावर आधारित बदलांचे ट्रेंड्स सुरु राहण्याच्या शक्यतेसह, भविष्यातील शहरांना आकार देऊ शकतील अशा विशिष्ट उद्योगक्षेत्रांची निवड केली गेली, यामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राला ३५%, पायाभूत सोयीसुविधा आणि लॉजिस्टिक्सला २१% व बँकिंग आणि फायनान्सला १८% लोकांनी बदलांचे नेतृत्व करू शकतील असे असल्याचे मान्य केले आहे.
फेडएक्स एक्सप्रेसचे इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मोहम्मद सईघ यांनी सांगितले, "फेडएक्समध्ये आम्ही गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या नावीन्यपूर्णतेच्या वारशाचे पालन करत पुढे जात आहोत, जबाबदारीचे भान राखून आणि संसाधनपूर्ण पद्धतींनी सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने नवनवीन विचार करत असतो.
नावीन्यपूर्णता, आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने वेगवान आगेकूच यांच्यासह शाश्वततेवर ध्यान केंद्रित करत आम्ही उद्योगाचे भविष्य संचालित करण्यासाठी सज्ज आहोत. ब्लॉकचेन, आयओटी, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यामध्ये प्रगती केवळ लॉजिस्टिक्स उद्योगक्षेत्रासाठी नाही तर भविष्यात सर्वच उद्योगांचा मार्ग अधिक रुंद करेल.”
'फ्युचर इज नाउ' सर्वेक्षणात तीन प्रमुख विषय होते: गतिमान होणे, भारत प्रयोग आणि नावीन्यपूर्णतेसाठी किती खुला आहे आणि देशात शाश्वततेविषयी जागरूकता किती प्रमाणात आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवरून असे संकेत मिळतात की, भविष्यातील यश या तीन प्रमुख विचारांच्या आधारे आपले दृष्टिकोन तयार करणाऱ्या व्यवसायांवर अवलंबून असेल.
भविष्य गतिमान आहे:
उद्योग-व्यवसाय कोणताही असो, कंपन्यांना आपल्या ग्राहकांना नेमके समजून घेता आले पाहिजे, त्यांच्या गरजा काय आहेत याचे अनुमान लावता आले पाहिजे आणि त्यांच्या वेगाने वाढत असलेल्या अपेक्षांच्या एक पाऊल पुढे राहता आले पाहिजे. महामारीमुळे आयुष्याचा प्रत्येक पैलू वेगाने बदलत आहे, आपण राहतो कसे, काम कसे करतो, व्यवसाय आपल्या ग्राहकांसोबत संपर्क कसे साधतात आणि ग्राहक उत्पादने, सेवा यांची खरेदी कशी करतात या सर्व बाबतीत अनेक बदल घडून आले आहेत.
फेडएक्सच्या सर्वेक्षणात असे लक्षात आले आहे की, व्यवसायांनी या बदलांसोबत ताळमेळ साधण्यासाठी काम करणे आधीच सुरु केले आहे, जवळपास ८७% लोकांनी सांगितले की, गेल्या एका वर्षात कंपन्यांनी 'पुढे काय आहे?' हे समजून घेण्याच्या आणि संभावित सुविधा प्रस्तुत करण्याच्या आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत.
भविष्यासाठी तयार मानसिकता हवी असेल तर प्रयोगांसाठी खुले असणे अनिवार्य आहे:
ग्लोबल इनोवेशन इंडेक्समध्ये भारताचा रँक वाढत आहे आणि आज भारत हे समृद्ध स्टार्ट-अप इकोसिस्टिमचे घर बनले आहे जे नवीन विचार आणि सुविधांसह परिवर्तनाला प्रेरणा देते.
गतिमान वातावरणात आपल्या चौकटींचा विस्तार करण्याच्या आणि प्रयोगांवर आधारित नावीन्यपूर्णतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या क्षमतेवर व्यवसायांचे यश अवलंबून असते. फेडएक्स सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या ९१% लोकांचे असे मत आहे की, ज्या संघटना, समुदाय, इतकेच नव्हे तर व्यक्ती देखील, वेगवेगळे प्रयोग करतात आणि बदलांना स्वीकारतात ते भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अधिक उत्तम प्रकारे सज्ज असतात.
पर्यावरणस्नेही, शाश्वत मानसिकता हा पर्याय नाही तर व्यवसायाच्या यशासाठी ते अनिवार्य आहे:
आजच्या काळात ग्राहक त्यांच्या निवडीचा त्यांच्या आजूबाजूच्या जगावर काय प्रभाव पडतो याबाबत अधिकाधिक जागरूक होत आहेत, ते पर्यावरणाशी संबंधित असो किंवा समुदायांशी. इतकेच नव्हे तर, त्यांच्या खरेदीच्या निर्णयांवर देखील संघटना पर्यावरणस्नेही व जबाबदारीचे भान राखणारी आहे की नाही याचा प्रभाव पडतो. फेडएक्सच्या सर्वेक्षणानुसार, ७५% लोकांनी मान्य केले आहे की, 'भविष्यवादी' दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती, समुदाय हे पर्यावरणाविषयी अधिक जागरूक असतात. ७१% लोकांचा असा दावा आहे की , भविष्यातील व्यवसायांमधील निर्णय घेणारे या नात्याने त्यांच्यासाठी शाश्वतता महत्त्वाची असेल आणि हेच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य राहील.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अगदी स्पष्ट आहे: आपल्या ग्राहकांना प्रासंगिक राहता यावे आणि पुढे दीर्घकाळपर्यंत येईल त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार राहण्यात मदत म्हणून संघटनांना त्यांच्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन आणि त्यामध्ये सुधारणा करत राहणे सुरु ठेवणे गरजेचे आहे.
जसजसे जग बदलत आहे तसतसे तंत्रज्ञान व ट्रेंड्स जीवनशैली, व्यवहार व दृष्टिकोनांमध्ये बदल घडवून आणत राहतील. ज्यामध्ये अनेक संधी व शक्यता असतील असे भविष्य स्वीकारणे, जी प्रयोगांसाठी तयार व शाश्वत असेल अशी मानसिकता ठेवणे हे व्यवसाय आणि व्यक्तींसाठी सदैव एक पाऊल पुढे राहण्यासाठी अनिवार्य आहे.
Comments
Post a Comment