Godrej introduced a series of dark edition refrigerators to bring elegance and beauty to the kitchen interior

स्वयंपाकघराच्या इंटीरियरमध्ये उत्कृष्टता आणि सौंदर्य यांचा मिलाफ घडविण्यासाठी गोदरेजने डार्क एडिशन रेफ्रिजरेटर्सची मालिका सादर केली

मुंबई: "गोदरेज अप्लायन्सेस"ने 'मॅट ब्लॅक', 'ग्लास ब्लॅक', 'ओनिक्स ब्लॅक', 'आइस ब्लॅक' आणि 'फॉसिल स्टील' सारख्या रंगांमध्ये 19 SKU वैशिष्ट्यीकृत डार्क एडिशन रेफ्रिजरेटर्सची मालिका सादर केली आहे. या श्रेणीमध्ये आकर्षक डिझाइन वैशिष्ट्ये आहेत, क्लासिक प्रीमियम फिनिशसह ठळक गडद रंगाचे बाह्य भाग आहेत. यामुळे आधुनिक स्वयंपाकघराला एक अत्याधुनिक, नजाकत असलेल्या ग्लॅमरची जोड मिळते. त्याबरोबर जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केलेले अंतर्भाग असून तो प्रगत शीतकरण तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे.


काळा रंग सौंदर्य दर्शवितो, खोलीला एक आधुनिक रूप देतो आणि खरेदीदारांसाठी न्यू कूल (एकदम छान) मानला जातो. भारतातील अनेक प्रदेशांमध्ये, गडद रंगांच्या गृहोपयोगी वस्तूंची  मागणी वाढली आहे आणि ती शॉप फ्लोअरवरही दिसून येत आहे. हा प्रवाह समजून घेऊन, गोदरेज अप्लायन्सेसने 'एऑन वेलवेट', 'एनएक्सडब्ल्यू ऑरा', 'एऑन व्हेलोर कन्व्हर्टीबल', 'एऑन व्हाईब कन्व्हर्टीबल', 'एऑन व्हेलोर', 'एऑन क्रिस्टल', 'एज जाझ' सारख्या गडद फॅशिया रेफ्रिजरेटर्सची विस्तृत श्रेणी विकसित केली. उत्कृष्ट दिसण्यासोबतच, या रेफ्रिजरेटर्स मध्ये इन पूर्ण कन्व्हर्टीबल मोड, नॅनो शील्ड तंत्रज्ञान (पेटंट लागू) सारखे अनेक प्रगत कूलिंग तंत्रज्ञान भरलेले आहे. जोडीला ९५%हून अधिक अन्न पृष्ठभाग निर्जंतुकीकरण, ३० दिवसांपर्यंत राहणारा ताजेपणा, व्यवस्थित गार होण्यासाठी कूल बॅलन्स तंत्रज्ञान, जलद बॉटल आणि आईस कुलिंगसाठी टर्बो कूलिंग तंत्रज्ञान आहे.


या सादरीकरणावर भाष्य करताना गोदरेज अप्लायन्सेसच्या रेफ्रिजरेटर्सचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, “लोक सर्व छटांमधील काळ्या रंगाला पसंत करत आहेत त्यामुळे ही मालिका  विविध विभाग आणि उत्पादनांमधील ग्राहकांच्या प्रभावाने प्रेरित आहे. काळ्या रंगाच्या शेड्समधील गडद फॅशिया रेफ्रिजरेटर्ससाठी आम्ही ४४% हून जास्त वाढ पाहिली आहे. स्वयंपाकघरातील जागेचे नूतनीकरण करणाऱ्या किंवा त्याच्या आतील भागात कालातीत अत्याधुनिकतेचा स्पर्श हव्या असलेल्या ग्राहकांसाठी, अनेक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानासह असलेल्या गोदरेज डार्क एडिशन रेफ्रिजरेटर्सची ही श्रेणी विचारात घेण्यासाठी योग्य पर्याय आहे."

 

हे रेफ्रिजरेटर्स स्टोअरमध्ये तसेच ऑनलाइन खरेदीसाठी १९२ लीटर- ५६४ लीटर मध्ये सिंगल डोअर, डबल डोअर, बॉटम माउंट आणि साइड-बाय साइड रेफ्रिजरेटर्स मध्ये २४,००० रुपयांपासून ९०,००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

 

अधिक माहितीसाठी संपर्क: https://www.godrej.com/appliances/dark-edition-refrigerators


Comments