A joint initiative by DKMS BMST Foundation India and Kokilaben Hospital to create awareness about the importance of stem cell donation on the occasion of World Marrow Donor Day
'वर्ल्ड मॅरो डोनर डे' या दिवसाच्या औचित्याने स्टेम सेल डोनेशनच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया आणि कोकिलाबेन हॉस्पिटल यांनी राबविला संयुक्त उपक्रम
मुंबई: सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी "वर्ल्ड मॅरो डोनर डे" पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने 'डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया'ने 'कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल' यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांनी भारतात रक्ताच्या कर्करोगावरील उपचार करताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठ्या आव्हानाविषयी सांगितले. 'अनुरुप स्टेम सेल' (मूळ पेशी) दात्यांची कमतरता ही एक मोठी समस्या आहे. अनेकांच्या जीवाचा प्रश्न असल्याने रक्ताच्या मूलपेशींचे प्रत्यारोपण हा गरजूंसाठी एक महत्त्वाचा उपचार आहे. या कार्यक्रमात डीकेएमएस-बीएमएसटी यांच्यातर्फे समर्थ, प्रांजल व शशांक या तिघांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी अलीकडेच त्यांच्या रक्तातील मूळ पेशी दान केल्या आणि ते जीवनदाते झाले.
मूळ पेशी प्रत्यारोपणात सुदृढ दात्याच्या मूळ पेशी रक्ताचा कर्करोग वा थॅलेसेमिया, अप्लास्टिक किंवा सिकल सेल ॲनेमिया यांसारखे रक्तदोष असलेल्या रुग्णाच्या शरीरात ट्रान्सफ्जुयन प्रक्रियेने सोडण्यात येतात.
भारतात, मूळ पेशी प्रत्यारोपणाच्या माध्यमातून उपचार घेताना रक्ताचा कर्करोग झालेल्या रुग्णांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या उपचारपद्धतीमध्ये प्रचंड क्षमता असली तरी एचएलए (ऊतीचा प्रकार) जुळणाऱ्या दात्यांची कमतरता असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते. या रोगामुळे मृत्यू ओढविण्याआधी वेळेत एखादा दाता मिळावा यासाठी त्यांची काळाशी स्पर्धा सुरू असते. म्हणूनच भारतात सार्वजनिक पातळीवर आणि वैद्यकीय क्षेत्राकडून रक्तपेशी प्रत्यारोपणासंदर्भात वाढीव जागरुकता व सहाय्याची तातडीची गरज आहे.
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील पीडियाट्रिक हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी व स्टेम सेल प्रत्यारोपण विभागाचे सल्लागार डॉ. शंतनु सेन म्हणाले, "दर पाच मिनिटाला भारतात रक्ताचा कर्करोग झालेला किंवा थॅलेसेमिया व अप्लास्टिक ॲनेमिया असलेला रुग्ण आढळतो. यापैकी अनेक रुग्णांना जगण्यासाठी ब्लड स्टेम सेल (रक्तातील मूळ पेशी) प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. यशस्वी मूळ पेशी प्रत्यारोपणासाठी एचएलए (ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन) जुळणारा दाता आवश्यक असतो. पण क्वचितच काही रुग्णांना त्यांच्या कुटुंबात एचलए-मॅच्ड (एचएलए जुळणारा) दाता मिळतो. इतर 70-80% रुग्णांना नात्यात नसणारा दाता शोधावा लागतो. दर वर्षी जगभरात 'नात्यात नसणारा' दात्याचा 65,000 जणांकडून शोध घेतला जातो. पण मॅचिंग दाता नसल्याने भारतात हे शोधण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी प्रत्यारोपण मात्र होत नाही. डीकेएमएस-बीएमएसटी यांसारख्या संस्थांकडून संकलित करण्यात येत असलेल्या दात्यांच्या यादीमध्ये भारतातील विविध जाती-धर्मांचे लोक समाविष्ट झाले तरच ही दरी भरून काढता येईल."
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आयपीएस अधिकारी रजनीश सेठ म्हणाले, "महाराष्ट्रात आपली संस्कृती व वारसा ही आपली बलस्थाने आहेतच, त्याचप्रमाणे आपली सहानुभूतीयुक्त वृत्ती ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. डीकेएमएस-बीएमएसटी यासारख्या संस्थांना सहाय्य करण्यासाठी आपण एकत्र येतो तेव्हा आपण जिवित संपत्ती होतो. कारण आपण रक्तातील मूलपेशींचे दान करून जीव वाचवत असतो. एक समुदाय, सकारात्मकतेचे पाईक म्हणून आपण एकत्र येऊ या आणि खऱ्या अर्थाने बदल घडवू या."
डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया सीईओ पॅट्रिक पॉल म्हणाले, "वर्ल्ड मॅरो डोनर असोसिएशनच्या आकडेवारीनुसार जगभरात 41 मिलियन दात्यांनी नोंदणी केलेली आहे. भारतात, मॅचिंग डोनरकडून मिळालेल्या मूळ पेशी प्रत्यारोपणाच्या शोधात असलेल्या रुग्णांबाबत विचार करता मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत आहे. जीव वाचविणाऱ्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय रुग्णांसाठी मॅचिंग रक्त मूळ पेशी दाता मिळणे ही अजूनही एक मोठी समस्या आहे. यासाठी भक्कम डेटाबेस तयार करणे हे रुग्ण व संभाव्य दाते यांच्यातील दरी बुजविण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे. अधिकाधिक लोकांनी समोर यावे आणि त्यांचा स्वॅब नमुना द्यावा यासाठी आवाहन करत आहोत. असे केल्याने ते जीव वाचवू शकतात. प्रत्येक नव्या नोंदणीनंतर मूळ पेशी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येकाची आशा निश्चितच पल्लवीत होईल."
आतापर्यंत डीकेएमएस-बीएमएसटीच्या महाराष्ट्रातील डोनर स्टेम सेल रजिस्ट्रीमध्ये 13,000 हून अधिक व्यक्तींनी नोंदणी केलेली आहे आणि भारतभरात 90,000 व्यक्तींची नोंदणी झालेली आहे. या व्यतिरिक्त गेल्या चार वर्षांत या संस्थेतर्फे देशभरातील 100 हून अधिक ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपणांसाठी मदत करण्यात आलेली आहे. शक्य तेवढ्या रुग्णांना नवसंजीवनी मिळावी यासाठी भारतात व जगभरात अधिकाधिक नोंदणी करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
कोकिलाबेन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, "वर्ल्ड मॅरो डोनर डे या दिवसाच्या औचित्याने भारतात रक्ताचा कर्करोग व रक्तदोषांशी लढा देण्यासाठी मूळ पेशी प्रत्यारोपणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी डीकेएमएस-बीएमएसटीसोबत सहयोग करणे हा आमचा बहुमान आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्वात मोठ्या व अत्याधुनिक बीएमटी युनिटसह, स्टेम सेल थेरपी अधिक प्रगत करण्याप्रती आमचा निर्धार, थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी स्टेम सेल प्रत्यारोपण उपलब्ध करून देण्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. आम्ही 250 हून अधिक रुग्णांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे. यात अनेक वंचित रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर कमी खर्चात उपचार करण्यात आले आहेत आणि त्यांना थॅलेसेमियापासून मुक्त आयुष्य जगण्यास सक्षम करून गुंतागुंतीपासून मुक्त केले आहे. प्रत्येक यशोगाथेगणिक आयुष्य परिवर्तीत करण्यात आमचे अग्रणी स्थान अधिक पक्के होत आहे."
मुंबईतील समर्थ हा 26 वर्षीय दाता म्हणाला, "मला एक जीव वाचविण्याची संधी मिळणे ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. डीकेएमएस-बीएमएसटी कडून कॉल येण्यापासून ते प्रत्यक्ष डोनेशनपर्यंतची प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली. प्रत्येक टप्प्यावर मला संपूर्ण माहिती व मार्गदर्शन मिळाले आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देण्यात आली. ज्या व्यक्तीला माझ्यामुळे मदत झाली, त्या व्यक्तीला भेटण्यास मी उत्सुक आहे. हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी समाधानकारक होता."
आजच्या घडीला 4 कोटी 10 लाखांहून अधिक 'नात्यात नसलेल्या' संभाव्य दात्यांची जगभरातील स्टेम सेल डोनर सेंटर व रजिस्ट्रींमध्ये नोंदणी झालेली आहे. त्यापैकी फक्त 0.04% भारतीय दाते आहेत. भारतात अधिकाधिक संभाव्य ब्लड स्टेम सेल डोनरची नोंदणी करून ही परिस्थिती बदलता येऊ शकते. फक्त 5 मिनिटांत ही नोंदणी होऊ शकते. तुमचे वय 18 ते 55 दरम्यान असेल आणि तुमची प्रकृती सामान्य असेल तर या www.dkms-bmst.org/register वेबसाइटवर जाऊन तुमचे होम स्वॅब किट मागवून ब्लड स्टेम सेल दाता होण्यासाठीचे पहिले पाऊल टाका.

Comments
Post a Comment