"सूर नवा ध्यान नवा" महिला दिन विशेष 8 मार्च रोजी फक्त कलर्स मराठी वाहिनीवर
मुंबई: ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हयो संसार पेलंना’ अगदी खरे आहे... विठुरायच काय तर जगातील कुठल्याच पुरुषाला तिच्याशिवाय संसार पेलता येणार नाही... या स्त्रीच महत्व कोणत्या शब्दांत सागांव हा प्रश्नच आहे... ती जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती नाती, काम, व्यवहार सांभाळते आणि जबाबदार्या देखील पार पाडते. अनेक क्षेत्रात स्त्रीयांचा ठसा उमटलेला दिसून येतो. आपल्या आयुष्यात स्त्री अनेक रूपात आपल्याला भेटते एक लहान मुलगी, एक मैत्रीण, प्रेमिका, पत्नी आणि आई... याच स्त्रीचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त 'सूर नवा ध्यास नवा' महिला दिन विशेष कार्यक्रम कलर्स मराठीवर सादर होणार आहे... हा कार्यक्रम म्हणजे कलर्स मराठीतर्फे प्रत्येक स्त्रीला मानाचा मुजरा असणार आहे.. ‘सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाच्या तिन्ही पर्वातील स्पर्धकांनी आपल्या सूरसम्राज्ञीनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. या तिन्ही पर्वामध्ये गायिकांनी त्यांच्या सुमधुर स्वरांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले... महिला दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काही विशेष गाणी पुन्हा ऐकण्याचा आनंद मिळणार आहे... महिला दिनानिमित्त कलर्स मराठीवर रंगणार आहे सुरांची मैफिल तेंव्हा नक्की बघा ‘सूर नवा ध्यास नवा' महिला दिन विशेष कार्यक्रम ८ मार्च रोजी रात्री ८.०० वा. पासून आपल्या कलर्स मराठीवर... या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांची लाडकी स्पृहा जोशी करणार आहे.
"सूर नवा ध्यास नवा" कार्यक्रमाच्या तिन्ही पर्वातील गायिका एकत्र येऊन यावर्षीचा महिला दिन साजरा करणार आहेत... सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर पर्वाची राजगायिका स्वराली जाधव आणि तिसर्या पर्वाची राजगायिका अक्षया अय्यर यांची काही निवडक गाणी पुन्हा प्रेक्षकांना ऐकण्याचा आनंद मिळणार आहे. तर शरयू दाते, निहिरा जोशी, अंशिका चोणकर, मधुरा कुंभार, विश्वजा जाधव, जुईली जोगळेकर, सृष्टी पगारे यांची एकापेक्षा एक अश्या सुंदर गाण्याचा आनंद घेता येणार आहे...
‘सूर नवा ध्यास नवा' महिला दिन विशेष कार्यक्रम ८ मार्च रोजी रात्री ८ .०० वा. पासून आपल्या कलर्स मराठीवर...

Comments
Post a Comment