Mahila Sashkthikaran Mahasamelan was organized by Mahila Patanjali Yog Samiti Mumbai in the presence of Acharya Dr. Sadhvi Devpriya

आचार्य डॉक्टर साध्वी देवप्रिया यांच्या उपस्थितीत महिला पतंजली योग समिती मुंबईद्वारे महिला सशक्तिकरण महासंमेलन आयोजन संपन्न

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील समस्त मातृशक्तीला जागृत करत त्यांना सेवाकार्यासाठी प्रेरित करणे हेतू महिला पतंजली योग समिती मुंबईद्वारे आयोजित केलेलं "महिला सशक्तिकरण महासंमेलन" दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी योगी सभागृह बी पी एस स्वामीनारायण मंदिर दादर इथे संपन्न झालं. साधारण तीन हजार लोकांच्या सहभागामुळे यशस्वी झालेल्या भव्य अशा या महासंमेलनात 2000 हुन अधिक महिलांची उपस्थिती होती.

योगऋषी स्वामी रामदेव यांच्या शिष्या आचार्य डॉक्टर साध्वी देवप्रिया दीदीजी, ज्या पतंजली योग समिती हरिद्वार येथील मुख्य केंद्रीय प्रभारी व दिल्ली पतंजली विश्वविद्यालय दर्शन शास्त्र विभागाच्या अध्यक्षाही आहेत यांनी दैवी जीवनाचे रहस्य पंचभूतांकडून जाणून घ्या अशा महत्त्वाच्या विषयाची माहिती देत उपस्थिताना मार्गदर्शन केलं. त्यांनी आपल्या प्रभोधनात प्रामुख्याने महिलांचे आरोग्य आणि त्यायोगे परिवाराचे आरोग्य, महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग आणि महिलांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार ह्या वर भर दिला.

मुंबई महिला राज्यप्रभारी काश्मीरा वैद्यजींच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊला चालू झालेल्या चार तासांच्या या संमेलनात आचार्य बाळकृष्णजींची प्रत्यक्ष उपस्थिती आणि स्वामी रामदेवजींच्या वर्च्युअल उपस्थितीमुळे रंगत आली.

हे संमेलन यशस्वी करण्यात श्रीमती सुधा मोरे महाराष्ट्र वरिष्ठ राज्य प्रभारी, श्रीमती शोभा आणि श्री सुरेश यादव मुंबई राज्य प्रभारी भारत स्वाभिमान यांनीही सहभाग दिला.


Comments