मलेशियात बकेट लिस्ट च्या रोमॅटिंक गाण्याचं शूट...


तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर पोस्टर ने गोड करणा-या माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटात नेमका कोणता कलाकार तिच्यासमोर पाहायला मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. ज्याचं उत्तर नुकत्याच समोर आलेल्या फोटोमधून मिळालं आहे. होय! या कलाकाराचं नाव आहे, सुमित राघवन... हा हरहुन्नरी अभिनेता बकेट लिस्टच्या निमित्ताने धकधक गर्ल माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
या रोमॅंटिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच बकेट लिस्टची टीम मलेशियात (लंकावी) जाऊन पोहोचली आहे ज्या गाण्याचे बोल ‘तू परी’ असे आहेत. बॉलिवूड गाजवणारी ही परी ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमातून आपल्या समोर अवतरणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.

बकेट लिस्ट टीमच्या या मलेशिया सफारी निमित्ताने सुमित राघवनच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Comments