"फ्लिकर" या नविन मराठी  चित्रपटाचा मुहूर्त कोल्हापूर येथे जल्लोषात संपन्न

मेहेक फिल्म्स आणि सरला चित्र प्रस्तुत, राज सरकार व हरीश पाटील निर्मित, संजय सुर्वे सह-निर्मित तसेच अमोल पाडावे लिखित आणि दिग्दर्शित व इलयाराजा म्युझिकल "फ्लिकर" या मराठी चित्रपटाचा मुहूर्त कोल्हापूर येथे दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमास मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे यांनी उपस्थिती दर्शविली. या चित्रपटाचा मुख्य नायक राजवीर सरकार आणि अभिनेत्री प्रतीक्षा शिर्के यांनी बहारदार नृत्य सादर करून मान्यवरांची मने जिंकली.
 
या चित्रपटातील सहकलाकार सनील जाधव, आकाश पोवार, सिद्धेश अहिर, वर्षाराणी यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. रांगड्या तरुणाची रांगडी प्रेमकहाणी असणारा मराठी चित्रपट फ्लिकर लवकरच येत असून हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालेल असा दिग्दर्शक व निर्माते यांचा मानस आहे.

या मराठी चित्रपटाचा मुहूर्त कोल्हापूर येथील महा सैनिक दरबार हॉल मध्ये 28 फेब्रुवारी रोजी पार पडला.

Comments