मुंबई येथे पार पडलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2018 या पुरस्कार सोहोळयात संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कर्यक्रमाबद्दल सांगताना म्हणाले की, "हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, लता मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, अविनाश प्रभावळकर रवी जोशी यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांना यजमानपद मिळवून दिले."
या वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर २०१८ हा प्रतिष्टीत पुरस्कार सरोद वादक 'उस्ताद अमजद अली खान' यांना देण्यात आला असून, मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराने आशा भोसले यांना गौरविण्यात आले. अनुपम खेर यांना त्यांच्या भारतीय थिएटर आणि चित्रपटातील कामगिरीबद्दल, शेखर सेन यांना त्यांच्या थिएटरमधील योगदानाबद्दल, धनंजय दातार यांना त्यांच्या सामाजिक उद्योजकतेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे साहित्यिक कवी योगेश गौर यांना वाग्विलासिनी पुरस्कार तर राजीव खांडेकर यांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल श्रीराम गोगटे पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून अनन्या या नाटकाला मोहन वाघ पुरस्कार बहाल करून गौरविण्यात आले असून सेंट्रल सोसायटी ऑफ एजुकेशनच्या अध्यक्षा माननीय मेरी बेल्लीहोंजी यांना बधिरांसाठीच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि सामान्य लोकांमधील बधिरांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कामगिरीबद्दल आशा भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उस्ताद अमजद अली खान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार २०१८ घोषित झाल्यापासून ते खूपच उत्साही होते. हा पुरस्कार स्वीकरताना ते म्हणतात की. हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप भाग्यशाली आणि विनयशील वाटत आहे. भारतीय संगीतकारांसाठी आणि विशेषतः माझ्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहे. मास्टर दीनानाथजी यांनी आदरणीय लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि श्रीमंत हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या उत्तोमोत्तम गायकांना घडवलं. आणि म्हणूनच आज या सन्मानासाठी मी खूप-खूप आभारी आहे.
आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्या बद्दल त्या व्यक्त होताना म्हणतात की, "हा पुरस्कार खरोखर माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझे वडील श्री. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. पण त्याहूनही अधिक संगीत उद्योगातील अनेक दिग्गजांना हा पुरस्कार वर्षानुवर्षे देण्यात आला आहे आणि यावर्षी ह्या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले आहे, याबद्दल मी खूप धन्य आहे. त्याचप्रमाणे यावर्षी दीनानाथजींच्या 76 व्या वर्धापनदिनी आणि पंडित बिरजू महाराज, उस्ताद अमजद अली खान आणि अजय चक्रवर्तीसारखे प्रख्यात सहभागी होणार आहेत. याबद्दल मला आनंद वाटतो आहे."
प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल सांगताना धनंजय दातार म्हणतात की, "आजवर मंगेशकर कुटुंबाने त्यांच्यापरीने सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ असे सर्वकाही महाराष्ट्राला अर्पण केलेले आहे. मंगेशकर कुटुंब आजवर आपल्या मधुर स्वरांनी वेळोवेळी समाजाचे मनोरंजन करीत आले आहेत त्याचप्रमाणे सामाजिक सेवा व कार्यात केलेलं योगदान आणि आपल्या समृद्ध अशा संस्कृतीचं केलेलं जतन हे खरंच वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे हे उत्कृष्ट परोपकारी गुण इतरांना अनुकरणासाठी एक अद्वितीय उदाहरण आहे . म्हणूनच म्हणूनच हा पुरस्कार मिळवणं माझ्याकरता एक आशीर्वाद आहे. दुसरे म्हणजे, मला स्वत:ला पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांच्याकडून भरपूर प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते, जेव्हा मी आखाती देशांत नम्रतेने भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीचा प्रचार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या पाठीवर पडलेल्या कौतुकास्पद थापेने या दिशेने पुढे जाण्यासाठी माझा उत्साह वाढवला."
दीनानाथजीं बद्दल व्यक्त होताना पंडित अजय चक्रवर्ती सांगतात की, "दीनानाथजी हे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट संगीतकार आणि ट्रेंडसेटर होते. महाराष्ट्रातील राग संगीत हे नाट्य संगीताने प्रसिद्ध होते, आणि या संगीतशैलीचे ते राजा होते. त्यांच्या आठवणी आजवर आदरणीय लताजी, आशाजी, उषाजी आणि हृदयनाथजी जातं करीत आहेत. मला असं वाटतं की दीनानाथजींच्या वर्धापणदिनानिमित्त येथे जमून त्यांच्या आठवणींना उजाळा देणं ही येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी हि एक सुवर्णसंधी आहे. चार वर्षांपूर्वी मला मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार मिळाला होता आणि यावेळी मी बिरजू महाराज यांच्या सोबत येथे ठुमरी सादर केली असून हा माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव ठरला आहे."
१९८८ सालापासून म्हणजेच गेल्या ७५ वर्षांपासून मंगेशकर परिवार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जयंती सार्वजनिक रित्या साजरी करत आले असून या वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहोळ्यानंतर शास्रीय संगीतावर आधारित 'स्वर नृत्य भाव दर्शन' या कार्यक्रमांतर्गत पंडित बिरजू महाराज आणि सास्वती सेन यांनी कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. पंडित अजय चक्रवर्ती ठुमरीचे वेगवेगळे प्रकार सादर केले असून,अनिंदो चॅटर्जी यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली. त्याचप्रमाणे अनिंदो चॅटर्जी यांचे तबला वादन, पंडित अजय चक्रवर्ती यांची ठुमरी आणि पंडित बिरजू महाराजांच्या भावविष्काराने कार्यक्रमाची सांगता झाली.
"मास्टर दीनानाथजींच्या स्मरणार्थ गायक, संगीतकार आणि स्टेज कलाकार म्हणून ज्यांचे भव्य योगदान महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना प्रेरणादायी ठरले आहे, अशांना मंगेशकर घराण्याने मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जनतेचे आपल्याला लाभलेले इतके प्रेम आणि पाठिंबा पाहून आम्हाला आनंद होत आहे." - पंडित हृदयनाथ मंगेशकर.
मंगेशकर यांच्या 76 व्या पुण्यतिथीनिमित्त मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान व हृदयेश आर्ट्सद्वारे या सोहोळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

Comments
Post a Comment