कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हर्षदा खानविलकर यांची एन्ट्री !

मुंबई: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधील प्रत्येक सदस्य पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे मनं जिंकत असून, आता बिग बॉस मराठीचा प्रत्येक सदस्य प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. रोज या घरामध्ये सदस्यांबरोबर काय होते, कोणते टास्क दिले जातात, कोण कॅप्टन होणार तर कोण एलिमनेट होणार याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनामध्ये दर आठवड्याला असते. अल्पावधीतच बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशिष्ट स्थान मिळवले आहे. मग मेघाची बिग बॉस जिंकण्याची जिद्द असो वा, सई – पुष्करची मैत्री असो. आता या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची भरती झाली आहे. अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणजेच हर्षदा ताई घरामध्ये गेली आहे. हर्षदा खानविलकर यांना महाराष्ट्राने प्रत्येक भूमिकेमध्ये स्वीकारले आणि प्रेम दिले आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्यानंतर प्रेक्षक आणि रहिवाशी त्यांना स्वीकारणार? त्या कसे सगळ्यांचे मनं जिंकणार? कोणते धोरण आत्मसात करणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “बिग बॉस मराठी” सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.
Harshada Khanvilkar
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दाखल होण्याआधी हर्षदा ताईनी कलर्स मराठीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तुम्ही जाणार आहात कसे वाटते आहे ?
उत्तर : मी खुपचं उत्सुक आहे. घरामध्ये माझे मित्र आहेत आणि त्यांची वेगवेगळी रूपं मला पहायला मिळाली आहेत. मला तिथे माझी भूमिका दाखवायची आहे. माझ्यासाठी खुपचं सोपं आहे, “मला फक्त जिंकायचं आहे माझं हेच ध्येय आहे”. घरामध्ये मित्र आहेत, पण हा एक गेम शो आहे आणि इथे प्रत्येकाचे एकचं ध्येय आहे. शेवट पर्यंत पोहचून जिंकून बाहेर पडायचं. आतमध्ये जायचं धम्माल – मज्जा करायची, जिंकून बाहेर पडायचं.

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हर्षदा खानविलकर कशी असेल ?
 उत्तर : मी जशी आहे तशीच घरामध्ये देखील राहेन. माझी कोणाशीच दुष्मनी नाही, वैर नाही... जे वाटेत येतील त्यांना दूर करावच लागेल. त्यामुळे कोणीच मनाला लावून घेण्याची गरज नाही, बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यावर मी मम्मा, ताई असणारच आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्यावर सगळ्यांशी संपर्क तुटणार, कुठली गोष्ट मिस करशील ?
उत्तर : तशा तर मी खूप गोष्टी मिस करेन. पण, आई, माझा भाचा, माझे वाहनचालक “गुलाम भाई” आणि त्यांनी बनवलेली कॉफी खूप मिस करेन. आणि हो संजय जाधव यांना देखील मिस करेन.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्यावर काय धोरण असेल ?
उत्तर :
Strategy अशी काही नाही. मी गेल्यावर त्यांना कळलं पाहिजे “छोटा बॉस” घरामध्ये आलेला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामधील बऱ्याच सदस्यांना तुम्ही पहिल्या पासून ओळखता, ईथे काही दिवसांमध्ये लोकांचे मुखवटे बाजूला येऊन खरा चेहरा दिसतो... तुम्हाला काही भीती वाटते का ?
उत्तर :
भीती नक्कीच वाटते आहे. काही सदस्यांचे खरे चेहरे मला नुकतेच कळाले आहेत, मला लोकांच्या काही गोष्टी पटतात काही पटत नाहीत. वेळ आली तर मी खोट बोलणार नाही. जे आहे ते मी त्यांना सरळसोट पणे सांगणार कारण, मला सरळ बोलायची सवय आहे आणि सरळ ऐकायची सवय आहे. त्यामुळे वाकड्यात शिरायचं काही कारणच नाही.

नवरा असावा तर असा या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांची आठवण येईल का ?
उत्तर :
मी जिंकून बाहेर येईपर्यंतचे सगळे भाग शूट करूनच आले आहे, त्यामुळे मिस करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे नवरा असावा तर असा बघायचा आणि कलर्स मराठीवर लगेचच बिग बॉस मराठी मध्ये पुन्हा मी भेटणारच आहे त्यांना.

Comments