कुकिंग बिझनेसचा विस्तार करण्यासाठी व्हर्लपूल इंडियाकडून एलिकासोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा...


मुंबई: व्हर्लपूल इंडियाकरिता धोरणात्मक प्राधान्य लक्षात घेत कुकिंग आणि बिल्ट-इन अप्लायन्सेस पोर्टफोलियो विस्तारत आज 'व्हर्लपूल इंडिया' बोर्डाने आज एलिकासोबत संयुक्त भागीदारीत प्रवेश करण्याचे मान्य केले आणि 'एलिका पीबी इंडिया प्रा. लि.' मध्ये 49% वाटा संपादित केला. संयुक्त भागीदारीचा भाग म्हणून एलिका पीबी इंडिया भारतात व्हर्लपूल ब्रँड अंतर्गत कुकिंग आणि बिल्ट-इन अप्लायन्सेसची निर्मिती आणि वितरण करणार आहे. एलिका पीबी इंडिया ही एलिका एसपीए इटलीची शाखा असून भारतात 2010 पासून कार्यरत आहे. 2018 च्या मध्यावर दोन्ही पक्ष व्यवहार बंधनात अडकतील.

व्हर्लपूल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसुझा म्हणाले की, “ग्राहकांच्या वाढत्या मागणीवर आधारित भारतातील कुकिंग आणि बिल्ट-इन अप्लायन्सेसची स्थिती अत्यंत गतीशील आहे. ग्राहकाची अंतर्दृष्टी, डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रात एलिकाची प्रभावी क्षमता असलेल्या नवीन उत्पादनांचा पोर्टफोलिओचा विस्तार करणे आणि त्याचे वितरण विस्तारित करणे हा व्हर्लपूलचा उद्देश आहे. ही भागीदारी अद्वितीय उत्पादन प्रवर्तन आणेल आणि आमच्या ग्राहकांच्या स्वयंपाकघरात अधिक पर्याय खुले करून देईल.”

या भागीदारीविषयी बोलताना एलिका पीबी इंडियाचे सीईओ म्हणाले की, “एलिकाने आपल्या ब्रँडसाठी अतिशय बळकट पोर्टफोलियो आणि वितरण नेटवर्क उभारले आहे. व्हर्लपूल उत्पादनांचा समावेश करून आम्ही दोन आकर्षक उपकरण ब्रँड भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून देऊ. आम्ही हे दोन्ही ब्रँड उच्चतम उंचीवर घेऊन जाऊ याविषयी आत्मविश्वास बाळगून आहोत.”

व्हर्लपूल इंडियाविषयी:

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्यालय गुरूग्राम येथे आहे, हे नाव आजच्या घडीला देशातील अग्रेसर निर्माते आणि बाजारकर्त्यांपैकी एक आहे. व्हर्लपूलने जागतिक विस्तार धोरणाअंतर्गत 1980 च्या उत्तरार्धात भारतात प्रवेश केला आणि कंपनीची फरीदाबाद, पॉंडीचेरी आणि पुणे अशा तीन ठिकाणी अत्याधुनिक निर्मिती सुविधा केंद्रे आहेत. प्रत्येक निर्मिती केंद्रात व्हर्लपूलची ग्राहकांप्रती असलेली कटीबद्धता जपण्यासाठी पर्याय तयार करण्यावर भर असतो. कंपनीची अधिक माहिती ट्वीटर आणि फेसबुकवर पाहता येईल @whirlpool_india

एलिका पीबी इंडिया विषयी:

एलिका एसपीएने 2010 मध्ये एलिका पीबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त भागीदारीची स्थापना केली. भारतातील निर्मिती युनिट हे महाराष्ट्रातील पुण्यात आहे. हा सर्व सोयी-सुविधांनी युक्त प्रकल्प उपकरण, स्वयंचलित असेंब्ली लाईन्सनी सुसज्ज असून साहित्य इटलीमधून आयात केले जाते. निर्मितीच्या प्रत्येक प्रक्रियेला तांत्रिक साह्य इटलीतून मिळते. 15 हून अधिक मॉडेल आणि 50 आवृत्यांहून अधिक किचन हूड निर्माण करण्याची निर्मिती क्षमता आहे, तसेच 15 हून जास्त प्रकारचे बिल्ट-इन हॉब्ज व कुकटॉप मॉडेल्स तयार केले जातात.

Comments