लक्ष्मी मल्हारच्या नव्या नात्याची सुरुवात !

मुंबई: कलर्स मराठीवरील "लक्ष्मी सदैव मंगलम्" मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि मल्हारच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत आहेत. मल्हार आणि लक्ष्मीच्या लग्नानंतर अचानकच लक्ष्मी गायब झाली. मल्हारने तिला शोधण्याचा बराच प्रयत्न देखील केला पण, त्या दोघांची भेट झाली नाही. दुसरीकडे मल्हार आणि आर्वीच्या घरामध्ये त्या दोघांच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. या साखरपुड्या मध्ये लक्ष्मी देखील सहभागी होणार आहे जे मल्हारला माहिती नाही. सजावट, बाकीच्या कामामध्ये लक्ष्मीचा हातभार असणार आहे. साखरपुड्यासाठी मल्हार आणि आर्वी तसेच लक्ष्मी खूपच सुंदरप्रकारे तयार झाले आहेत. साखरपुड्याच्या वेळेस सगळ्यांनी खूप छान फोटोज काढले आणि सेटवर बरीच मज्जा देखील केली. जी लवकरच प्रेक्षकांना मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. परंतु या घटनेनंतर या तिघांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे. लक्ष्मी आणि मल्हारच्या नव्या नात्याची कशी सुरुवात होणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मी सदैव मंगलम् संध्या ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लक्ष्मी नक्की कुठे आहे ? लक्ष्मी आणि आर्वीची भेट कशी आणि कधी झाली ? लक्ष्मीने आर्वीला तिचे नाव  लच्छी असे सांगितले आहे याची कल्पना मल्हारला नाहीये. तसेच लच्छीचे खरे नाव लक्ष्मी आहे... लक्ष्मी आणि मल्हारचे लग्न झाले आहे... हे लग्न कोणत्या परीस्थित झाले याची कल्पना आर्वीला नाहीये. परंतु मल्हारची होणारी बायको आर्वी आहे हे मात्र लक्ष्मीला कळाले आहे आणि म्हणूनच ती मल्हारच्या समोर येण्यास नकार देत आहे. लक्ष्मी आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेणार आहे. परंतु नियतीने काय वाढून ठेवले आहे हे तिला माहिती नाही. लक्ष्मी आणि आर्वी या चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. त्यामुळे तिच्या साखरपुड्याला लक्ष्मीला जाणे भागच आहे. हा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल का ?

आता मल्हार, आर्वी आणि लक्ष्मी हे तिघे नियतीने एकमेकांशी बांधले गेले आहेत. आणि यामध्ये त्या तिघांचाही दोष नाही. तिघही त्यांच्यापरीने त्यांच्या माणसांवर निस्वार्थी प्रेम करत आहेत. तेंव्हा आता नक्की पुढे काय होईल ? लक्ष्मीने मोठ्या मनाने हे स्वीकारले आहे पण, लक्ष्मी मल्हारच्या आणि तिच्या लग्नाचे सत्य आर्वीला सांगेल का ? पुढे काय होईल ? नियती कोणता नवा खेळ खेळेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांन मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मी सदैव मंगलम् संध्या ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Comments