सैराट साकारायला आवडेल - अभिनेता सुमित कांत कौल

लहानपणी मराठी बोलायचं म्हणून रांगेत मागे उभं राहून पुढील लोकांना "पुढे चला, पुढे चला... ", "अजून किती वेळ?", "बस, बस..." यांसारखे शब्दप्रयोग करून मराठी शिकण्याचा आणि आत्मसात करण्याचा आवर्जून प्रयत्न करणारा अभिनेता सुमित कांत कौल याला मराठीसैराट सारखाच माईलस्टोन चित्रपट अभिनित करण्याची ईच्छा आहे.

'पाखी' या आगामी हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने ठसा उमठवणारा अभिनेता सुमित कांत कौल म्हणजेच  देव आनंद, प्राण यांसारख्या दिग्गज कलावंतांच्या चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी कारणीभूत असणारे नामवंत निर्माते दिग्दर्शक यशवंत पेठकर यांचा नातू होय. यशवंत पेठकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान पाहून प्रभावित झालेला सुमित आजोबांकडून मिळालेला वारसा जपत त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मराठी भाषेच्या ओढीने मराठी चित्रपट सृष्टीत येण्यास इच्छुक आहे.

प्रख्यात निर्माते दिग्दर्शक यशवंत पेठकर यांचा नातू असून देखील स्वमेहनतीने चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव बनविणारा अभिनेता सुमित कांत कौल याचा 'पाखी' हा हिंदी चित्रपट येत्या १० ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार असून सुमित लवकरचं मराठी चित्रपटातही झळकेल यात काही शंका नाही.

Comments