'फाईट' चित्रपटाचा अॅक्शनपॅक टीजर प्रदर्शित....

बॉलीवूड आणि हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये अॅक्शन नेहमीच पाहायला मिळते पण आता मराठीत देखील असाच एक अॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फ्युचर एक्स प्रोडक्शन निर्मित आगामी 'फाईट' या चित्रपटाद्वारे सिनेरसिकांना जबरदस्त अॅक्शनपट  पहायला मिळणार  आहे. जिमी मोरे दिग्दर्शित 'फाईट' चित्रपटाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईट वर टीजर प्रदर्शित करण्यात आला. 'फाईट' या चित्रपटाची निर्मिती ललित ओसवाल यांनी केली असून, या टीजर मध्ये आपल्या जबरदस्त फाईट दृश्यांसोबत जीत आणि सायली जोशी हे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. तसेच या चित्रपटामधील अनेक दृश्यांसाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे, हे सुद्धा या टीजर मधून दिसून येते.

Teaser Link - https://www.youtube.com/watch?v=8Og5b2wxW4M

Comments