वेगाने विकसित होत असलेले व्यवसाय आणि गुंतवणुकदारांच्या संकल्पना आणि संवादाचे एकत्रीकरण "BEYOND"

मुंबई: "बियाँड" हा एका अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आश्वासन देतोय ज्यात मान्यवर अनुभवी गुंतवणूकदार, उदयोन्मुख उद्योजक, नवे गुंतवणूकदार, साहसी भांडवलदार, कॉर्पोरेट आणि ग्राहक एकत्र येऊन त्यांच्या बरोबरीच्यांना भेटतील शिवाय पुढील दशकासाठी संपत्तीनिर्मितीस चालना देणाऱ्या घटकांबद्दल बोलतीस आणि त्यांच्यासाठी आतापर्यंत काय यशस्वी ठरेल काय नाही या माहितीची देवाणघेवाणही करतील, हा कार्यक्रम इंडियन चेंबर ऑफ कॉर्मस आणि मुंबई एंजल्स नेटवर्क यांनी तयार केलेल्या या कार्यक्रमाबद्दल यंत्रणेतील विविघ भागधारकांनी प्रचंड उत्सुकता दर्शवली आहेत.

ठळक वैशिष्ट्ये:

हा एक बहुपेडी कार्यक्रम असून त्यामध्ये एकाच वेळेस तीन गोष्टी समांतरपणे सुरू राहातील.

-  पहिल्या पातळीवर आघाडीचे गुंवणूकदार, विचारवंत आणि संपत्ती निर्माते सर्वांच्याच मनात अग्रभागी असलेल्या विषयावर म्हणजेच पुढील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला कशाचे सामर्थ्य लाभणार, पुढील युनिकॉर्नची उभारणी कशी करायची आणि व्यापकता महत्त्वाची की टिकाऊपणा यावर पॅनेल चर्चा होईल.
-  दुसऱ्या समांतर पातळीवर वेगवेगळ्या विषयांवर मास्टरक्लास होतील आणि त्यात कायद्याच्या भुलभुलैय्यातून मार्ग काढताना निधी उभारणीसाठी पर्यायी मार्ग, सीमेपलीकडे स्टार्ट अपचा विस्तार करताना यांचा समावेश असेल.
-  तिसऱ्या समांतर पातळीवर आश्वासक स्टार्ट अप्स गुंतवणुकदार मिळवण्याचा प्रयत्न करतील, हा ट्रॅक केवळ गुंतवणूकदार पास घेतलेल्या गुंतवणुकादारांसाठीच उपलब्ध असेल.

श्री.  अमेवे शर्मा - अध्यक्ष, आयसीसी वेस्टर्न इंडियाए अध्यक्ष. बैद्यनाथ आर्युर्वेदा प्राव्हेट लिमिटेड म्हणाले: उद्योगक्षेत्राला जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या आघाडीवर आयसीसीने कायम लढा दिला असून वेगान विकसित होत असलेल्या स्टार्ट अप यंत्रणेला उद्योगाचा दर्जा मिळणे नैसर्गिक होते आणि त्याला राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत उदयोन्मुख योगदान देणाऱ्यांची योग्य जागा मिळाली आहेण् बियांड आणि आयसीसीला आशा वाटतेए की हा उपक्रम एकंदरीत यंत्रणेला पुढील दशकाचे संपत्ती निर्माते ओळखण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आवश्यक विचार व कृती करण्यासाठी चालना देतील.

श्रीमती नंदिनी मनसिंघका - मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मुंबई एंजल्स नेटवर्क म्हणाले: आपण कार्यक्रमाकडे नजीकच्या दृष्टीकोनातून पाहात आहोत मात्र त्यापलीकडे जाऊन आज स्टार्ट अप यंत्रणेमध्ये काय घडत आहे हे पाहाण्याची आणि पुढील दशकाचे संपत्ती निर्मितीसाठी चालना देणारे घटक समजून घेण्याची वेळ आली आहे.  बियाँड हा कार्यक्रम सध्याच्या संपत्ती निर्मात्यांना आव्हान देण्याचे आणि भारताला स्टार्ट अप राष्ट्र म्हणून आणखी उज्जवल भविष्य मिळवून देण्यासाठी उत्तरे शोधण्याचे आश्वासन देतो.

Comments