मंगेशकर कुटुंबियांकडून २०१९ चे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विजेते घोषित...

गेल्या 30 वर्षांत आपली आगळी-वेगळी  ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था "मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान"द्वारे यावेळी  संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जात आहे. प्रतिष्ठित मंगेशकर कुटूंबीयांकडून प्रत्येक वर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वेळी बुधवारी, म्हणजेच २४ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई येथील षणमुखानंद हॉल येथे पार पडतील. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असतील आणि यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख माननीय श्री मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.

तसेच यावर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव श्री. सलीम खान यांना प्रदान करण्यात येईल, भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी श्री. मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येईल. श्रीमती हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले जाईल, साहित्य क्षेत्रात श्री. वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले जाईल. भद्रकाली प्रॉडक्शनचे 'सोयारे सकाळ' हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात येईल, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सीआरपीएफ  डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार  यांना गृहमंत्रालया अंतर्गत भारताच्या जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था 'भारत के वीर' साठी सम्मानित केले जाईल. आमच्या प्रतिष्ठानाने या वेळी हा पुरस्कार जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शाहिद ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमात शहीदाना श्रद्धांजली स्वरूप लतादीदी, त्यांच्या पिता मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत, एक कोटी रुपये दान म्हणून देतील.

या पुरस्कारांची घोषणा करताना, हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी सांगितले, "एक गायक, संगीतकार आणि मंच कलाकार म्हणून मास्टर दीनानाथचे अमूल्य योगदान स्मृती मंगेशकर कुटुंब प्रत्येक वर्षी "मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार" आयोजित करतो ज्याद्वारे विशिष्ट व्यक्तींना सन्मानित केले जाते. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की, हे आमच्या या अव्दितीय कार्यात सगळ्याच लोकांकडून भरपूर मदत मिळत राहिली आहे."

Comments