"अधम" २८ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित....!

तुषार अनिल खांडगे व सचिन अनिल खांडगे बंधू द्वारा निर्मित "अधम" हा तरुण पिढीला आवडणारा चित्रपट २८ जून पासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अभिषेक केळकर यांच्या दिग्दर्शनात "अधम" पूर्णत्वास आला असून, या चित्रपटातील प्रमुख कलावांत संतोष जुवेकर, गौरी नलावडे, किशोर कदम, सुहास पळशीकर, सुहास शिरसाट, पद्मनाभ भिंड, उमेश जगताप ह्या  सर्वांच्या अभिनयाची जुगलबंदी बघून तमाम प्रेक्षक 'अधम'ला भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वास 'अधम' च्या टीमला आहे.

मराठीतील ही एक ब्लॉकबस्टर निर्मिती असून यात खाण माफियाचा प्रभाव, एका शिक्षकाचे सामाजिक दायित्व, एका शिक्षिकेचा त्याग, तिचे नायकावरील प्रेम आणि व्यवस्थेविरुद्ध उद्बोधन, असं सर्वच काही अधम मध्ये देण्याचा प्रयत्न निर्माते व दिग्दर्शकांनी केला आहे. 'प्रवृत्तीचा आंतरिक संघर्ष' हे कथाबीज आहे.

दिग्दर्शक अभिषेक केळकर व निर्माते तुषार अनिल खांडगे हे दोघेही कलेप्रती श्रध्दा बाळगणारे तरुण आहेत. दोघांनी थिएटर ते सिनेमा असा या निमित्ताने 'कला प्रवास' करून, 'अधम'ला साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
"अधम"मध्ये संतोष जुवेकर 'मराठी अँग्री यंग मॅन' या नात्याने भूमिका साकारत असल्यामुळे, 'अधम'च्या पोस्टर आणि ट्रेलर रिलीज नंतर लक्षावधी रसिकांनी संतोष, गौरी नलावडे आणि अन्य कलावंतांना दाद दिली. या चित्रपटाचे संगीत रोहित नागभिडे यांचे असून वैभव जोशी व वैभव देशमुख यांनी गीतकार म्हणून बाजू सांभाळली आहे.

"अधम" चित्रपटाचे छायाचित्रण पुणे शहर व लगतच्या परिसरातील असून सर्व अभिनय संपन्न कलावंतांनी जीव ओतून काम केले आहे. "अधम"चे छायाचित्रण धनेश पोतदार यांचे असून, अधम चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्टशनचे काम पुणे येथील "वॉट स्टुडिओज" मध्ये पूर्ण करण्यात आले असून, व्ही. एफ. एक्स. चे दायित्व "वॉट स्टुडिओज" चे जयेश मलकापुरे व टीमने सांभाळले आहे.

"वास्तवाचे भान ठेऊन जगा!" असा संदेश देणारा हा चित्रपट तरुणाईच्या हृदयात जागा मिळवेल अशी अधम टीमला आशा आहे.

कुटुंबातील सर्वानी एकत्रित बघावा असा हा चित्रपट असून, महाराष्ट्रातील तमाम रसिक ह्या चित्रपटाला भरभरून आशीर्वाद देतील या बद्दल शंका नाही, असे अधम टीमला वाटते.

Comments