मुंबई: "पालो आल्टो" आणि मुंबईस्थित फिनटेक फर्म "ड्रिप कॅपिटल"ने भांडवलउभारणीच्या दुस-या फेरीमध्ये (सीरीज बी फंडिंग) 25 मिलियन डॉलर्स उभारले आहे. एक्सेल या भांडवलपुरवठादार कंपनीच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दुस-या फेरीमध्ये सिकोईया इंडिया, विंग व्हीसी आणि वाय कोंबिनेटर या विद्यमान गुंतवणूकदार कंपन्यांचाही समावेश होता. या फेरीत सहभागी झालेल्या नव्या गुंतवणूकदारांमध्ये जीसी1 व्हेंचर्स आणि ट्रस्टेड इन्साइट या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा समावेश होता. कंपनीने आजपर्यंत 45 मिलियन डॉलर्सहून अधिक समभाग उभारले आहे आणि 55 मिलियन डॉलर्सचे कर्ज असे एकूण 100 मिलियन डॉलर्सचे फंडिंग उभे केले आहे.
जागतिक व्यापाराला गती देण्यासाठी तसेच उदयोन्मुख बाजारपेठांतील लहान कंपन्या व उद्योजकांना सक्षम बनविण्यासाठी 'ड्रिप कॅपिटल' तंत्रज्ञानाचा वापर करतो. केवळ एका क्लिकसरशी ड्रिपच्या उपाययोजना छोटा निर्यातदारांना त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी गरज असलेले खेळते भांडवल पुरवते. सध्या जागतिक स्तरावरील व्यापारी भांडवलपुरवठ्यातील तुटीचे प्रमाण 1.5 ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. भांडवलाची गरज आणि पुरवठा यांमधली ही दरी प्रामुख्याने उदयोन्मुख बाजारपेठांतील छोट्या निर्यातदारांमध्ये अधिक जाणवत आहे. दुस-या शब्दांत सांगायचे तर खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे 1.5 ट्रिलियन डॉलर्सचा व्यापार होऊ शकत नाहीये. 2016 साली भारतातील पहिला वित्तपुरवठा करणा-या ड्रिप कॅपिटल कंपनीने हाच प्रश्न सोडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
''ट्रेड फायनान्स हे बँकांचे वर्चस्व असणारे एक अत्यंत जुने, कागदपत्रांवर चालणारे उद्योगक्षेत्र आहे, जे प्रामुख्याने विशाल आकाराच्या, प्रस्थापित कॉर्पोरेट ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते. म्हणूनच भारतातून होणा-या निर्यातीमध्ये 50% वाटा असूनही छोटे उद्योग मोठ्या प्रमाणात दुर्लक्षितच राहतात. या सर्व छोट्या व्यापारी निर्यातदारांसाठी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील उदयोन्मुख बाजारपेठेतमध्ये समान संधी देणारे क्षेत्र लाभावे हे आमचे ध्येय आहे'', असे ड्रिप कॅपिटलचे सह-संस्थापक आणि को-सीईओ पुष्कर मुकेवार म्हणाले.
ड्रिप आंतरराष्ट्रीय ट्रेड फायनान्सच्या पायाभूत यंत्रणांच्या मुख्य भागांची पुनर्उभारणी करत आहे. सीमापार होणा-या बीटूबी व्यवहारांची हमीपत्रे वेगाने तयार करण्यासाठी व त्यांना वित्तपुरवठा कऱण्यासाठी कंपनी इलेक्ट्रॉनिक डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करते.''स्वयंचलित यंत्रणेच्या सहाय्याने ड्रिप विनाखंड ग्राहक अनुभव पुरवते व केवळ एका क्लिकसरशी एखाद्या शिपमेंटला वित्तपुरवठा करू शकते. यासाठी ड्रिप अनेक इलेक्ट्रॉनिक डेटा स्त्रोतांचे एकत्रीकरण करून प्रत्येक शिपमेंटची हमी घेण्यासाठी प्रोप्रायटरी अल्गोरिदम्स तयार केले आहेत,'' असे ड्रिप कॅपिटलचे सह-संस्थापक आणि को-सीईओ नील कोठारी म्हणाले.
मुंबईस्थित स्टील उत्पादनांच्या निर्यातदार व 2017 पासून ड्रिप कॅपिटलचे ग्राहक असलेले इझिनॉक्स लिमिटेड या कंपनीचे संचालक सिद्धार्थ गुप्ता म्हणाले, ''मध्यम आकाराचे निर्यातदार असल्याने आम्हाला बँकांच्या सेवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत्या. यामुळे आमचा व्यापार खुटू लागला. मात्र आपल्या तारणाची मागणी न करणा-या व ऑनलाइन ट्रेड फायनान्सची प्रक्रिया पार पाडणा-या ड्रिपमुळे आम्हाला अधिक ऑर्डर्स पूर्ण करण्याइतकी फ्लेक्सिबिलिटी मिळाली व त्यामुळे आमच्या महसुलात खूप भर पडली.''
भारतामध्ये आगमन केल्यापासून ड्रिपच्या बिझनेस प्रणालीने गेल्या दोन वर्षांत दहा पट वाढीचा दर गाठून आपल्या प्रचंड क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. 400 हून अधिक निर्यातदारांसाठी कंपनीने 500 मिलियन डॉलर्स किंमतीच्या व्यापाराला वित्तपुरवठा केला आहे. ''आर्थिक वर्ष 2020 पर्यंत भारतात स्त्रोत असलेल्या 1 बिलियन डॉलर्सच्या व्यापाराला वित्तपुरवठा करण्याचे ड्रिपचे लक्ष्य आहे. फंडिंगच्या नव्या फेरीमुळे आणि यशस्वी सिद्ध झालेल्या मॉडेलमुळे कंपनी जागतिक स्तरावर आपल्या पाऊलखुणा उमटवण्याची योजना आखत आहे व त्यानुसार 2019 मध्ये कंपनीने युनायटेड अरब एमिरेट्स आणि मेक्सिको येथे आपल्या व्यापाराचा विस्तार केला आहे,'' असे मुकेवार पुढे म्हणाले.
भांडवलउभारणीबद्दल अधिक विस्ताराने सांगताना एक्सेलचे अभिनव चतुर्वेदी म्हणाले, ''आम्ही ड्रिपच्या अगदी स्थापनेपासून तिच्या भांडवलउभारणीच्या प्रत्येक फेरीमध्ये या कंपनीच्या बरोबर आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपनीने केलेली प्रगती प्रेरणादायी आहे. या कंपनीकडून वाढीचा पुढला टप्पा गाठला जात असताना व ही कंपनी आपले बिझनेस मॉडेल जागतिक स्तरावर घेऊन जात असताना त्यांना आपले पाठबळ देण्याबाबत आम्ही अतिशय उत्साही आहोत.''
छोटे उद्योग हे जगभरातील आर्थिक विकासाचे आणि रोजगारनिर्मितीचे प्रमुख सूत्रधार असतात. ड्रिप आपले कार्यक्षेत्र नव्या भौगोलिक प्रदेशांमध्ये विस्तारत असताना तेथील बाजारपेठांच्या विकासाला वेग देण्याची संधी कंपनीसमोर आहे. ताजे फंडिंग आणि अत्यंत कणखर ग्लोबल टीम यांच्या साथीने ड्रिप कॅपिटल प्रत्येक देशातील प्रत्येक आकाराच्या निर्यातदारांना समान संधीचे क्षेत्र तयार करून देण्यासाठी सज्ज आहे.

Comments
Post a Comment