गोएलगंगाच्या स्मार्ट क्रिएटिव्हिटीने वेधले सर्वसामान्यांचे लक्ष....!

आपल्या प्रोडक्ट्चं प्रमोशन करणं प्रत्येकालाच जमतं असे नाही. मात्र आपल्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर आपल्या प्रोडक्ट्सचं प्रमोशन इतरांकडून करवून घेण्याचं कसब काहींनाच अवगत असतं आणि हे कसब अवगत असल्याचं ताजं उदाहरण दिलं आहे पुण्याच्या गोएलगंगा डेव्हलपमेंट्सने. Iphone11 pro च्या ट्रिपल कॅमेराची लोकप्रियता पाहता, रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत गोएलगंगा डेव्हलपमेंट्सनी आपल्या एका पोस्टमध्ये खिडक्यांच्या जागी याच ट्रिपल कॅमेराचा वापर केला आहे. याने सर्वसामान्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहेच. शिवाय त्यांच्या या स्मार्टनेसने त्यांचं हे क्रिएटिव्ह शेअर करण्यास प्रत्येकाला भाग पाडलं आहे.

स्मार्टफोनच्या या स्मार्ट जगात गोएलगंगा ने वापरलेला हा स्मार्टनेस खरोखरीच कौतुकास्पद आहे.

Comments