मुंबई: निर्माते, दिग्दर्शक राजू भोसले यांनी त्यांचा आगामी मराठी चित्रपट "बेरीज वजाबाकी" चा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित केला. या वेळी निर्माते-दिग्दर्शक राजू भोसले म्हणाले की, “हा चित्रपट मनोरंजक पद्धतीने एक सामाजिक संदेशही देतो. त्याची कथा आणि संकल्पना रुचकर आहे आणि मी आशा करतो की माझा संदेश जसा मी विचार केला तसाच प्रेक्षकांपर्यंत पोहचेल.” या सोहळ्याला नंदू माधव, रोहनदीप सिंग आणि इतर बाल कलाकारांची उपस्थिती होती.
‘प्रत्येक मुलाने आपल्या आई बाबांना दाखवावा असा...’ हे सांगणारा हा कौटुंबिक चित्रपट 'पीएमआरवाय प्रॉडक्शन्स' या बॅनर अंतर्गत निर्मित झालेला असून 'जंपिंग टोमाटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड' हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. विशाल हनुमंते, दत्तात्रय बाठे आणि प्रदीप मठपती हे या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते असून जम्पिंग टोमाटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे रोहनदीप सिंग यांनी हा चित्रपट सादर केला आहे.
चित्रपटाचे लेखन प्रताप देशमुख आणि राजू भोसले यांचे आहे. अभिजित नार्वेकर यांनी चित्रपटाला संगीत दिलेले असून गाणी अंबरीश देशपांडे यांनी लिहिली आहेत तसेच आनंदी जोशी आणि सोनू निगम यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. स्वप्निल वेंगुर्लेकर चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून चंद्रशेखर अय्यर यांनी छायाचित्रण केलेले आहे. राजेश राव यांनी या चित्रपटाचे संकलन केलेले आहे.
या चित्रपटात मुख्य कलाकार उपेंद्र लिमये, नंदू माधव, मोहन जोशी, देविका दफ्तरदार, प्रवीण तरडे, मिलिंद गवळी, गिरीश परदेशी, रमेश परदेशी, जयेश संघवी, गायत्री देशमुख, भक्ती चव्हाण आणि स्मिता शेवाळे आहेत. या चित्रपटात बाल कलाकार नील बक्षी, जुई रहाळकर, अमेय परदेशी, आदिश्री देशमुख, यश भालेराव, आर्य काकडे, शर्व कुलकर्णी, तन्वी सावरगावकर, रामदास अंधारे, सोहम महाजन आहेत.
पालकांच्या घरातील वागणुकीचा परिणाम नकळतपणे त्यांच्या मुलांच्या स्वभावात होतो आणि ते त्याच प्रमाणे समाजात वावरतात आणि नकळतपणे पालक आपल्या रोजच्या धावपळीमध्ये आपल्या मुलांना खरोखरच काय हवे आहे हे विसरून जातात. असा हा पालक आणि मुलांच्या संबंधांवर आधारित अतिशय मनोरंजक चित्रपट आहे.
या चित्रपटाचे शूटिंग जांभूळपाडा, पाली, बी.एम.सी.सी. पुणे, जैन वसतिगृह पुणे, एफ.टी.आय. पुण्यात आबा बागुल बंगला, ईशादान सोसायटी येथे झालेले आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

Comments
Post a Comment