मुंबई: आजवर रोमियो-ज्युलिएट... हिर-रांझा... लैला-मजनूच्या प्रेमकहाणीची खूप पारायणं झाली पण 'मल्हार-मायडी'ची प्रेमकथा कुणी ऐकलीये का..? अहो, मग नक्की पहा आपलं मराठमोळं - रांगडं प्रेम "इभ्रत" या आगामी मराठी चित्रपटाद्वारा. रांगडा पण हळव्या मनाचा कुस्तीपटू 'मल्हार' म्हणजेच संजय शेजवळ आणि आपल्या सौंदर्याचा तसूभरही गर्व नसलेल्या 'मायडी'ची म्हणजेच शिल्पा ठाकरेची ही प्रेमकथा 'आवडी' या साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारलेली आहे. संजय शेजवळ आणि शिल्पा ठाकरेची केमिस्ट्री "इभ्रत" मध्ये चांगलीच रंगली असून नेटकऱ्यांना आपल्या नजरेने घायाळ करणारी एक्स्प्रेशन क्वीन शिल्पा ठाकरे संजय शेजवळ सारख्या हँडसम हंकला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात कशी अडकवते हे चित्रपटात पाहणं रंजक ठरेल. डॉल्फिन सिनेक्राफ्ट प्रस्तुत श्रुती वसंत दांडेकर निर्मित आणि प्रवीण रमेश क्षीरसागर दिग्दर्शित "इभ्रत" चित्रपटाची पहिली झलक लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मराठी-हिंदी-गुजराती चित्रपट-मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला एक गोड चेहेरा म्हणजेच संजय शेजवळ.आपल्या लक्षवेधी पर्सनॅलिटीने तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला संजय पुन्हा एकदा लव्हरबॉयची भूमिका निभावणार असला तरीही, ''इभ्रत मधील मल्हार ही व्यक्तिरेखा तितकी गुडी-गुडी नाही तर या मल्हारच्या भूमिकेत अनेक कंगोरे लपले आहेत शिवाय एक कुस्तीपटू साकारण्यासाठी मी सिक्स पॅक अॅब्स ही केलेत की जेणेकरून मल्हारच्या व्यक्तिरेखेला न्याय मिळेल.'' असं आपलं मत संजयने व्यक्त केलं. तर शिल्पाने आजवर आपल्या एक्स्प्रेशनच्या जोरावर युट्युब चॅनेलवर धुमाकूळ घातलाच होता आता तिच्या अभिनयाचे अनेकविध रंग 'इभ्रत'मधून अधिक खुलून येणार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
मल्हार आणि मायडीची प्रेमकहाणी रंगते की उध्वस्त होते हे पाहण्यासाठी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत जाऊन "इभ्रत" पाहायलाच हवा. संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, डॉ.सुधीर निकम, अनिकेत केळकर, वृषाली हटळकर, राहुल बेलापूरकर आदींनी 'इभ्रत'मध्ये आपापली भूमिका प्रामाणिकपणे पार पडली असून "इभ्रत" हा चित्रपट प्रेमाची अनोखी परिभाषा मांडेल. "इभ्रत" हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२०ला आपल्या भेटिस येणार आहे.

Comments
Post a Comment