Madhav Devchake fan follower arrives from Kuwait

अभिनेता माधव देवचकेची फॅन आली कुवैतवरून भेटायला
पुणे: बिगबॉस फेम अभिनेता माधव देवचकेने नुकतीच आपल्या चाहत्यांची भेट घेतली. माधव देवचकेला भेटायला त्याचे फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातून फॅन आले होते. एक फॅन तर चक्क देशाबाहेरून आली होती. माधवने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर गेली काही वर्ष कसं अधिराज्य केलं त्याचीच ही प्रचिती होती.

सूत्रांच्यानूसार, माधव आणि त्याच्या टीमने जेव्हा सोशल मीडियावरून माधवला भेटण्याची संधी त्याच्या फॅन्सना मिळत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर अनेक फॅन्सनी माधवला भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली. बिग बॉस संपल्याच्या पाच महिन्याने झालेल्या ह्या फॅनमीटवरून स्पष्ट दिसून येत होते की, बिग बॉसमध्ये माधवने आपल्या फॅन्सवर कशी अमीट छाप सोडली आहे.

अभिनेता माधव देवचके ह्याविषयी म्हणाला, “मी गेली 15 वर्ष सिनेमा, नाट्य, मालिका अशा विविध मीडियममध्ये काम करतोय. मराठी-हिंदी दोन्ही भाषांमध्ये काम केले. अनेकदा चाहत्यांनी भेटून मला शुभेच्छा दिल्या. पण पहिल्यांदाच अशापध्दतीने फॅनमीटमध्ये चाहत्यांना भेटलो. हे माझे कट्टर चाहते असल्याचा प्रत्यय आला. माझा सिनेसृष्टीतला प्रवास ते बारकाईने फॉलो करत असल्याचे उमगले. त्यांचे प्रेम. जिव्हाळा ह्याने मी भारावून गेलो. ते मला प्रेमाने ‘आपला माधव’ कसं का संबोधतात ते समजलं.”

कुवेतच्या चाहतीबद्दल विचारल्यावर माधव म्हणाला, “कुवैतला राहणारी प्रियंका जोशी माझी खूप वर्षांपासूनची चाहती आहे. हमारी देवरानी ह्या हिंदी मालिकेपासून तिने माझा अभिनयप्रवास पाहिला आहे. तिने फॅनमीटला येणं हे खरं तर माझ्यासाठी प्लेझंट सरप्राइज होतं. हा जिव्हाळा भारावून टाकणारा आहे. तसेच आता आणखीन जबाबदारीने काम केले पाहिजे, ह्याची जाणीव करून देणारा आहे.”

Comments