विद्यार्थिनींच्या हस्ते केले ‘शिष्यवृत्ती’ चित्रपटाचे टीझर प्रदर्शित...
समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या, भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्यध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" यांच्या जयंती निमित्ताने साज एटरटेनमेंट प्रस्तुत आणि अखिल देसाई निर्मित आणि दिग्दर्शित "शिष्यवृत्ती" ह्या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले. कमलाबाई एज्युकेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या अग्रसेन हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या हस्ते ह्या चित्रपटाचा ३ जानेवारी रोजी टीझर प्रदर्शित करण्यात आला.
आयुष्यात प्रत्येक प्रगतीच्या वाटेवर आपल्याला शिक्षक हे असे गुरु भेटतात जे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देत असतात. त्यांनीच दर्शविलेल्या त्या मार्गावर चालत आपण यशाचे शिखर गाठत असतो. असेच काहीसे भावविश्व "शिष्यवृत्ती" ह्या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे ह्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक अखिल देसाई ह्यांनी टीझर लॉंचच्या वेळी सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचे एक वेगळेच अतूट नाते असते. आपल्याला समजायला लागल्यापासून ते जीवनाच्या शेवटपर्यंत हे नाते जुळलेले असते. शिक्षकांनी दिलेली चांगली शिकवण घेऊन आपण आपल्या आयुष्यात अनेक यशस्वी गोष्टी करत असतो. अशाच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारित "शिष्यवृत्ती" सिनेमा असल्याचे अखिल देसाई म्हणाले. चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मॅनेजमेंट गुरु तसेच मुंबईच्या डब्बेवाल्यांवर पीएचडी केलेले डॉ. पवन जी. अग्रवाल उपस्थित होते तसेच सिनेमातील प्रमुख पात्र साकारणारे दुष्यंत वाघ आणि सोबतच चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक अखिल देसाई ह्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
ह्या चित्रपटात '३ इडियट' ह्या हिंदी चित्रपटात सेंटीमीटरची भूमिका साकारणारा दुष्यंत वाघ हा प्रमुख कलाकार म्हणून आपल्या भेटीला येणार असून सोबत रुद्र ढोरे, अंशुमन विचारे, झील पाटील, प्रशांत नगरे, कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस आदी कलाकार आपल्याला दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती अखिल देसाई ह्यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी ही अखिल देसाई ह्यांनी पार पाडली आहे. ह्या चित्रपटातील गाणी प्रसंन्नजीत कोसंबी, जयदीप बागवडकर आणि मिथीला माळी ह्यांच्या सुरात सजली असून भरतसिंग ह्याचे संगीत ह्या चित्रपटाला लाभले आहे. शिक्षक- विद्यार्थ्यातील अतूट नाते, त्याचे महत्त्व आणि त्या नात्याचा आदर करणारा "शिष्यवृत्ती" सिनेमा २१ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात येत आहे.

Comments
Post a Comment