The biggest wedding ceremony of Raja - Rani

राजा रानीच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा !
मुंबई: असे म्हणतात, लग्न म्हणजे सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध… ज्या व्यक्तिच्या आपण शोधात असतो देव त्या व्यक्तिची भेट अजाणतेपणी घडवून आणतोच आणि मग सुरू होतो सहजीवनाचा साता जन्माचा प्रवास... जन्मभराच्या या गाठी बहुतांशी परस्परविरोधी स्वभावाच्या माणसांमध्ये जोडल्या जातात. असेच काहीसे संजीवनी आणि रणजीतच्या बाबतीत घडले आहे... संजीवनीला रणजीत बघता क्षणीच आवडला आणि दुसर्‍याच क्षणी कळलं रणजीत आपला होणारा दाजी आहे... आणि हा संजीवनीसाठी खूप मोठा धक्का होता... पण, नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हते, संजीवनीच्या बहिणीचे म्हणजेच स्वरांगीचे प्रेम कोणा दुसर्‍यावर असल्याकारणाने ती घर सोडून जाते... यासगळ्या घटनेनंतर संजीवनीला रणजीत रीतसर लग्नाची मागणी घालतो. संजीवनी रणजीतशी लग्न करण्यास होकार देखील देते... पण कोणत्या कारणामुळे ती होकार देते ? संजीवनी खुश आहे का ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. अनेक चढउतार, अडचणी आल्यानंतर संजीवनी – रणजीतचे ऋणानुबंध जोडले जाणार आहेत. ह्या राजा रानीचा लग्न सोहळा आनंदात, धुमधडाक्यात पार पडणार आहे. तेंव्हा राजा रानीच्या लग्न सोहळ्यास आपण सगळ्यांनी नक्की यायचं ! संजीवनी आणि रणजीतचा लग्नानंतरचा प्रवास कसा असेल ? आलेल्या अडचणींना पार करत रणजीत आणि संजीवनी कसा करतील राजा रानीचा संसार ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये कुतूहल आहे.  तेंव्हा नक्की बघा "राजा रानीची गं जोडी" मालिकेमध्ये लग्नाचा महासप्ताह २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील नुकतीच सुरु झालेली "राजा रानीची गं जोडी" ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचे सौंदर्य, कथेची मांडणी, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे ही मालिका प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलीशी वाटते आहे. संजीवनी म्हणजे शिवानी सोनार आणि रणजीत म्हणजेच मनीराज पवार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

Comments