Sonu Sood's family bonds with Godrej interiors even more tightly

सोनू सूद यांच्या कुटुंबाचे बंध झाले आणखी घट्ट गोदरेज इंटिरिओ बरोबर...
मुंबई: "गोदरेज इंटेरिओ" या भारतातील आघाडीच्या फर्निचर व इंटिरिअर सोल्यूशन्स ब्रँडने "मेक स्पेस फॉर लाइफ" या नव्या कॅम्पेअंतर्गत, लोकप्रिय अभिनेते सोनू सूद यांच्या बहिणीच्या घरामध्ये परिवर्तन घडवले आहे. प्रोफेशनल जीवनातील उद्दिष्ट्ये साध्य करत असताना, कुटुंबीयांबरोबरचे बंध घट्ट करणे किंवा कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्याबरोबर वेळ घालवणे शक्य होत नसल्याचे अधोरेखित करणे, हे या नव्या कॅम्पेनचे उद्दिष्ट आहे.

गोदरेज इंटेरिओने चतुरस्र अभिनेते सोनू सूद यांच्या बहिणीच्या घराचे रूपांतर मोगामध्ये करून आपली बांधिलकी अधोरेखित केली. सोनू, त्यांची बहीण व बहिणीचे कुटुंब यांना एकत्र येऊन एकमेकांबरोबर वेळ व्यतित करण्यासाठी उत्तेजन देईल इतके सुंदर व आधुनिक घर बहिणीला देण्याची सोनू सूद यांची इच्छा होती. बदल घडवून आणेल आणि ताजेपणा देईल, तसेच एक कुटुंब म्हणून एकमेकाबरोबर धमाल व आनंदी वेळ घालवता येईल, असे पूर्णपणे नवे रूप घराला देण्याचा सोनू सूद यांचा मानस होता.

सोनू यांच्या बहिणीसाठी ही नक्कीच अप्रतिम भेट होती. अतिशय खूश असणारे सोनू सूद यांनी गोदरेज इंटेरिओ टीमचे आभार मानत म्हटले, “घराचे नवे रूप पाहून माझ्या बहिणीला अत्यंत आनंद झाला. माझ्या बहिणीच्या आवडीप्रमाणे तिच्या स्वप्नातले घर साकारण्यासाठी मला मदत केल्याबद्दल गोदरेज इंटेरिओ टीमचे पुन्हा एकदा आभार. टीमने घराला चैतन्य देण्यासाठी आमच्या आवडीनिवडी व व्यक्तिमत्त्व याप्रमाणे इंटिरिअर, फर्निचर डिझाइन, रंग व सुविधा यातील नवे ट्रेंड सादर केले. ती आणि तिचे कुटुंबीय एकत्रितपणे धमाल, आवडीनिवडी, हसण्याचा खळखळाट असे विविध अनुभव घेतील, असे घर मला तिला द्यायचे होते.”

गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांनी सांगितले, "मेक स्पेस फॉर लाइफ" ही कॅम्पेन भारतीयांच्या जीवनामध्ये वर्क-लाइफ समतोल साधण्याचे महत्त्व सांगते. भारतीयांसाठी मेकिंग स्पेस फॉर लाइफ या संकल्पनेचे विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व केवळ भौतिक बाबतींपुरते मर्यादित नसून, आपण दररोज सामना करत असलेल्या ताणतणाव व बंधनांचा समावेशही त्यामध्ये आहे. आजच्या वर्किंग प्रोफेशनलना कामाच्या प्रचंड ताणामुळे कुटुंबीयांबरोबरचे बंध घट्ट करणे किंवा कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्याबरोबर वेळ घालवणे शक्य होत नसल्याचे दिसते. आमच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे भारतीयांना कुटुंबासाठी फार कमी वेळ मिळतो. तंत्रज्ञानामुळे या ट्रेंडला खतपाणी घातले जात आहे. अशा निष्कर्षांतूनही भारतीयांच्या जीवनातील वर्क-लाइफ समतोलाची सद्यस्थिती कळून येते. एक ब्रँड म्हणून, गोदरेज इंटेरिओ नावीन्यपूर्ण फर्निचर डिझाइनद्वारे घरामध्ये नवीन चैतन्य आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. तसेच, जीवनामध्ये निरनिराळे ताण असले तरी घरामध्ये कुटुंबासाठी व मित्रमंडळींसाठी, छंदांसाठी विशेष जागा निर्माण करण्याचे स्मरण वर्किंग प्रोफेशनलना करून देतो. सोनू सूद यांच्या बहिणीच्या कुटुंबासाठी त्यांच्या घरामध्ये आवश्यक ते परिवर्तन करण्यासाठी योगदान दिल्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.

गोदरेज इंटेरिओने नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्याबरोबर वेळ व्यतित करण्याबाबत, तीनपैकी एका (34%) भारतीय वर्किंग प्रोफेशनलला कामाच्या ताणामुळे मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. कामाच्या ताणामुळे, कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याचे 64% हून अधिक जणांनी सांगितले, तर जोडीदाराबरोबर वेळ व्यतित करणे शक्य होत नसल्याचे 28% जणांनी सांगितले. याचप्रमाणे, सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 21.2% व 16.2 % जणांनी अनुक्रमे मित्रमंडळी व पालक यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याचे नमूद केले.

Comments