Evergreen Group's Sameer San & veteran journalist Veer Sanghvi started the "Culinari Culture"

एव्हरस्टोन ग्रुपचे समीर सैन आणि अनुभवी पत्रकार वीर संघवी यांनी सुरु केले "कलिनरी कल्चर"
मुंबई: आज सुरु करण्यात आलेल्या "कलिनरी कल्चर"सोबत भारतातील खाद्य उद्योगक्षेत्र एका मोठ्या परिवर्तनासाठी सज्ज झाले आहे.  "कलिनरी कल्चर" हा प्लॅटफॉर्म 'द मिचेलिन गाईड'च्या लाइक्सनुसार तयार करण्यात आला आहे. खाद्य उद्योगक्षेत्रात भारताचा सर्वात मोठा आणि सर्वात निर्णायक आवाज बनणे हे यामागचे उद्धिष्ट आहे. कलिनरी कल्चरमध्ये रेस्टॉरंट्सना वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष पद्धतीने रेटिंग्स दिले जातील, या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्यांना सन्मानित केले जाईल आणि जागतिक स्तरावरील शेफ्ससोबत नॉलेज एक्सचेंज सेशन्सचे आयोजन केले जाईल. फोर सीजन्स मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात याची घोषणा करण्यात आली, यावेळी भारतातील खाद्य व पेय उद्योग जगतातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या. बँकॉकहुन शेफ गगन आनंद जे कलिनरी कल्चरचे मार्गदर्शक देखील आहेत, आणि कलिनरी कल्चरचे सीईओ श्री. राज संघवी यावेळी उपस्थित होते.

भारतातील एकमेव अधिकृत आणि स्वतंत्र रेटिंग संस्था या नात्याने रेस्टॉरंट्सना फ़ूड्स्टार्स देऊन या उद्योगक्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणे हे कलिनरी कल्चरचे उद्धिष्ट आहे. यासाठी एक काटेकोर, स्वतंत्र आणि मल्टी-चॅनेल प्रक्रिया राबविली जाईल. ५० पाककला तज्ञांची टीम द अकॅडेमी, १५ पेक्षा जास्त शहरांमधील नामवंत खाद्य समीक्षक आणि लेखक, पूर्णकालीन काम करणारे आणि नावाचा उल्लेख नसलेले फूड रेफरीज आणि भारतातील खाद्य क्षेत्रातील सर्वाधिक नावाजलेल्या लोकांचा समावेश असलेले ज्युरी हे या प्रक्रियेत सहभागी होतील. "कलिनरी कल्चर"मध्ये ग्लोबल कलिनरी एक्सचेंजेसचे देखील आयोजन केले जाईल, यामध्ये माहिती, कौशल्ये यांची देवाणघेवाण घडून येईल. जगभरातील सर्वोत्तम शेफ्सना भारतात आमंत्रित केले जाईल आणि भारतातील शेफ्सना जगातील उत्तमोत्तम रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आपली कला दाखवण्याची संधी दिली जाईल. या कंपनीने 'स्ट्रीट फूड सुपरस्टार्स' ची देखील सुरुवात केली आहे. हा पहिला असा अवॉर्ड प्लॅटफॉर्म आहे जो भारतातील स्ट्रीट फूड वेंडर्ससाठी बनवला गेला आहे. भारतातील शेफ्सना सन्मानित करण्यासाठी एक विशेष पुरस्कार देखील लवकरच सुरु केला जाईल.

* सर्वाधिक नामांकित आणि सर्वात योग्य मूल्यांकन.
  कलिनरी कल्चरचे फ़ूड्स्टार्स म्हणजे रेस्टॉरंट्ससाठी एक सर्वोत्तम सन्मान आहे. 

* ३ स्टार्स - आय मस्ट ट्राय: जर तुम्ही या शहरात असाल तर याठिकाणी जेवले पाहिजे असे अतिशय चांगले रेस्टॉरंट. 
* ४ स्टार्स - आय मेक या स्पेशल ट्रिप: असे रेस्टॉरंट जे पाककलेचे नवनवीन मापदंड निर्माण करते. याठिकाणी येण्यासाठी जरा वेगळ्या रस्त्यावर जरी यावे लागत असेल तरी नक्की या असे रेस्टॉरंट.
* ५ स्टार्स - आय द व्हेरी बेस्ट: भारतातही सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट्सपैकी एक! सर्वोत्तम!

याप्रसंगी कलिनरी कल्चरचे संस्थापक श्री. समीर सैन यांनी सांगितले, "भारताला जगासमोर आणणे आणि जगाला भारतात आणण्याचा आमचा संकल्प आहे. प्राचीन आणि संपन्न पाककलेचे भूमी भारताला गॅस्ट्रोनॉमीक सर्वोत्कृष्टतेच्या वरच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आमचे मिशन सुस्पष्ट आहे; भारत आणि आंतरराष्ट्रीय शेफ्स व पदार्थांच्या मधल्या भौगोलिक सीमा पुसून टाकून दोघांनाही समृद्ध बनवणे. खाण्याबद्दलच्या प्रेमातून आम्ही अशी पाक संस्कृती निर्माण करू इच्छितो ज्यामध्ये रीती, विचार आणि टेबल्स खुले असतील."

कलिनरी कल्चरच्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाबद्दल कलिनरी कल्चरचे चेअरमन श्री. वीर संघवी यांनी सांगितले, "कलिनरी कल्चरमध्ये तज्ञांच्या टीममार्फत रेटिंग देण्यात आलेल्या रेस्टॉरंट्सना स्टार्स दिले जातात. या प्रक्रियेमध्ये काटेकोरपणे परीक्षण केले जाते आणि यावर व्यापारी तसेच जाहिरातीचा प्रभाव जराही नसतो. हे सर्वाधिक नामांकित आणि सर्वात योग्य मूल्यांकन आहे. कलिनरी कल्चरचे फ़ूड्स्टार्स रेस्टॉरंट्ससाठी सर्वोच्च सन्मान आहेत, हे फ़ूड्स्टार्स अशा रेस्टॉरंट्सना दिले जातात जे चव, वेळ आणि खर्च या सर्व दृष्टीने उत्तम आहेत. ज्यांना खायला आणि खाण्याबद्दल जाणून घ्यायला आवडते त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तज्ञांनी दिलेली खरी, नावाचा उल्लेख नसलेली आणि सर्वात योग्य रेटिंग्स."

कलिनरी कल्चरचे मेंटॉर शेफ गगन आनंद यांनी सांगितले, "आज माझ्या जीवनातील सर्वाधिक प्रेरणादायी दिवसांपैकी एक दिवस आहे. आता अशी वेळ येऊन ठेपली आहे की आपल्याला अशा मार्गदर्शकाची गरज आहे जे लोकप्रियतेवर नव्हे तर भारतातील खऱ्या फूडीजच्या प्रतिक्रियांवर आधारित असेल. आजवर प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या भारतातील रेस्टॉरंट्सना आम्ही संपूर्ण जगासमोर आणून अधिक चांगल्या संधी देऊ इच्छितो. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे कारण मला पाककलेसाठी भारतात यायला मिळत आहे."

कलिनरी कल्चरचे सीईओ श्री. राज संघवी यांनी सांगितले, "भारतातील पाककला संस्कृतीला जागतिक स्तरावर अधिक जास्त उंचीवर नेऊन पोहोचवणे हे आमचे उद्धिष्ट आहे. आम्ही जगातील सर्वोत्तम शेफ्सना भारतात आणणार आहोत. या आठवड्यात जगातील पहिल्या क्रमांकाचे शेफ मौरो काग्रेसो मिरजूरहुन मुंबईत येत आहेत. त्यानंतर देखील अनेक आंतरराष्ट्रीय शेफ्सची यादी आम्ही तयार केली आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये भारतातील सर्वाधिक गुणी आणि कुशल युवा शेफ्सना कलिनरी एक्सचेंजेसमार्फत परदेशात जाऊन जगातील सर्वोत्तम रेस्टॉरंट्समध्ये आपली कला दाखवण्याची संधी मिळेल. हे यापूर्वी कधीही झाले नव्हते आणि आम्ही याची सुरुवात करत आहोत."

कलिनरी कल्चरमध्ये नामांकित तीन मिचेलिन स्टार्स बहाल करण्यात आलेले, जगातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समधील वर्ल्डस बेस्ट रेस्टॉरंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या नाईस येथील मिरजूरचे इटालियन-अर्जेंटीनीयन शेफ मौरो काग्रेसो या आठवड्यात मुंबईत येत आहेत. याठिकाणी शेफ मौरो काग्रेसो आपले नामांकित रेस्टॉरंट मिरजूर रिक्रिएट करतील, यासाठी ६ आणि ७ मार्च २०२० रोजी सेंट रेगीस हॉटेलमध्ये दोन स्पेशल डिनर्सचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments