"Mahindra Logistics" appoints Mr. V. S. Parthasarathy as Non-Executive Director and Chairman of the Board

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे संचालक मंडळाचे बिगर- कार्यकारी संचालक आणि अध्यक्षपदी श्री. व्ही. एस. पार्थसारथी यांची नियुक्ती
मुंबई: लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या 3पीएल सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक असलेल्या "महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल)" कंपनीने आज संचालक मंडळाचे बिगर- कार्यकारी संचालक आणि अध्यक्षपदी श्री. व्ही. एस. पार्थसारथी यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली असून ही नियुक्ती 25 मार्च 2020 पासून अमलात येणार आहे.

या नियुक्तीविषयी श्री. एम. व्ही. पार्थसारथी म्हणाले, ‘अध्यक्ष या नात्याने महिंद्रा लॉजिस्टिकच्या संचालक मंडळावर रूजू होताना मला आनंद होत आहे. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे ध्येय साकार करण्यात लॉजिस्टिक क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा माझा ठाम विश्वास आहे. सध्या महिंद्रा कार्गो आणि नागरिक वाहतूक व्यवसायातील आघाडीची कंपनी आहे यापुढेही महिंद्रा समूहाबरोबर काम करत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लॉजिस्टिक क्षेत्रात नवी समीकरणे प्रस्थापित करेल.’

श्री. पार्थसारथी सध्या समूहाचे मुख्य वित्त अधिकारी आणि 31 मार्च 2020 पर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा लि. चे समूह सीआयओ आहेत. 1 एप्रिल 2020 पासून ते महिंद्रा समूहाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या मोबिलिटी सेवा विभागाचा ताबा घेतली. ते महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या समूह कार्यकारी संचालक मंडळाचे सदस्य असून काही महिंद्रा समूह कंपन्यांच्या संचालक मंडळावरही नियुक्त आहेत. श्री. पार्थसारथी स्मार्टशिफ्ट लॉजिस्टिक सोल्यूशन्ससारख्या इतर कंपन्यांमध्येही कार्यरत असून तिथे ते अध्यक्ष आहेत.

मोदी झेरॉक्स कंपनीत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली. 2020 मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत रूजू होण्यापूर्वी ते झेरॉक्समध्ये सहकारी संचालक होते. त्यांच्याकडे वाणिज्य शाखेची पदवी असून ते चार्टर्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे फेलो सदस्य आणि चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंग्लंड अँड वेल्सचे सदस्य आहेत. ते हार्वर्डच्या अडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅमचे (2011) माजी विद्यार्थी आहेत.

"एमएलएल" संचालक मंडळाच्या नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन समितीचे अध्यक्ष श्री. डॅरियस पंडोले म्हणाले, ‘श्री. एम. व्ही. पार्थसारथी यांचे महिंद्रा समूहातील प्रदीर्घ करियर आणि व्यावसायिक अनुभव लक्षात घेता मंडळाचे संचालक आणि अध्यक्ष पदी झालेली त्यांची निवड कंपनीला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी मौल्यवान अनुभव आणि योग्य दिशा देणारी आहे. आम्ही त्यांच्या नियुक्तीची शिफारस करतो आणि त्यांचे मंडळात स्वागत करतो. या निमित्ताने मी श्री. झुबेन भिवंडीवाला यांनी कंपनीचे संचालक आणि अध्यक्ष पदावर राहून गेली इतकी वर्ष दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो.’

Comments