One step further by Godrej Protekt to fight the Corona Virus (Covid-19)

कोरोना व्हायरस (कोविड-19)शी लढण्यासाठी गोदरेज प्रोटेक्टचे एक पाऊल पुढे
मुंबई: कोरोना व्हायरस (कोविड-19) हा भारतात व जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, "गोदरेज प्रोटेक्ट" या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (जीसीपीएल) हँड हायजिन उत्पादनांच्या रेंजने 'प्रोटेक्ट इंडिया मूव्हमेंट' हा उपक्रम दाखल केला आहे. #प्रोटेक्टइंडियामूव्हमेंट या उपक्रमाद्वारे गोदरेज प्रोटेक्टने कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबद्दल लोकांना माहिती देऊन लोकांमध्ये जागृती करायचे उद्दिष्ट आखले आहे.

#प्रोटेक्टइंडियामूव्हमेंट अंतर्गत, गोदरेज प्रोटेक्टने कोरोना व्हायरसच्या सर्वाधिक केसेस आढळलेल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये मि. मॅजिक या पावडर-टू-लिक्विड हँडवॉशची 1 दशलक्ष पाकिटे मोफत वितरित करण्यास सुरुवात केली आहे. या ब्रँडने बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी), ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन (टीएमसी) यांच्याशी भागीदारी केली आहे आणि त्यांना मि. मॅजिक पाकिटे दिली आहेत. मि. मॅजिक पावडर-टू-लिक्विड हँडवॉश हे सर्वात किफायतशीर लिक्विड हँडवॉश उत्पादन असून, त्याची किंमत 15 रुपये आहे. ही किंमत देशातील अन्य प्रमुख लिक्विड हँडवॉश उत्पादनांच्या तुलनात्मक किंमत निर्देशांकाच्या 0.4X आहे. ही पाकिटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि विविध नागरी विभागांच्या कामगारांमध्ये वाटली जाणार आहेत. या व्यक्ती सध्याच्या संकटामध्ये लोकांना सेवा देत असल्याने, त्यांच्या हाताच्या अधिकाधिक स्वच्छतेच्या दृष्टीने ही पाकिटे दिली जाणार आहेत.
निसाबा गोदरेज, कार्यकारी अध्यक्ष, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल)
योजलेल्या उपायांबद्दल बोलताना, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि.चे (जीसीपीएल) कार्यकारी अध्यक्ष निसाबा गोदरेज यांनी सांगितले, “जीसीपीएल कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत असलेले सर्व लोक, आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी व अथक प्रयत्न करणारा प्रत्येक जण यांच्या सोबत आहे. आपले कर्मचारी व कामगार यांना हँडवॉश वाटण्यासाठी आमच्याशी भागीदारी केल्याबद्दल बीएमसी व टीएमसी यांचे आभार. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या या कामगारांना व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मि. मॅजिक हँडवॉश देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या काही दिवसांत, मि. मॅजिक हँडवॉशची 1 दशलक्षहून अधिक पाकिटे वाटण्यासाठी आम्ही निरनिराळ्या सरकारी संस्थांबरोबर व सामाजिक संस्थांबरोबर काम करणार आहोत. नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न व सामर्थ्य केंद्रित करत आहोत. त्यामुळे, लोकांच्या हितासाठी व सरकारी नियमांच्या अनुषंगाने, आमच्या हँड सॅनिटायझर्सची किंमत आम्ही 66% कमी केली आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये, सर्व भारतीयांना सुरक्षित राहण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी मदत करण्याचा निश्चय आम्ही केला आहे.”
भारत आणि सार्कचे सीईओ सुनील कटारिया, जी.सी.पी.एल. श्री. मॅजिक हँडवॉश पाकिटे बीएमसीचे सह महानगरपालिका आयुक्त (एसडब्ल्यूडी), अशोक खैरे यांना देताना
या सहयोगाविषयी व मि. मॅजिक पॅकेटच्या वितरणाविषयी बोलताना, बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे (बीएमसी) संयुक्त पालिका आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) अशोक खैरे यांनी नमूद केले, “या परीक्षेच्या कालावधीमध्ये वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोदरेज प्रोटेक्टने 2 लाख मि. मॅजिक हँडवॉश पाकिटे देण्याचे आश्वासन दिले आहे. ही पाकिटे मुंबईतील आमच्या सर्व आउटपोस्टमध्ये वितरित केली जाणार आहेत. संपूर्ण कर्मचारीवर्ग, कामगार व कंत्राटी कामगार यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची तरतूद करण्यासाठी त्यांना पॉकेट मि. मॅजिक हँडवॉश दिला जाणार आहे. मि. मॅजिक पावडरचे एक पाकिट पाण्यामध्ये मिसळले तर हात धुण्यासाठी 200 मिली हँडवॉश तयार करता येऊ शकतो. या उपक्रमाचा फायदा संपूर्ण कर्मचारीवर्ग, कामगार व कंत्राटी कामगार यांनी घ्यावा आणि नियमितपणे तुमचे हात धुवून सुरक्षित राहावे, असे माझे आवाहन आहे.”
नरेश म्हस्के, महापौर, ठाणे महानगरपालिका (टीएमसी) श्री. मॅजिक हॅन्डवॉश पाकिटे नागरी संस्था आणि कर्मचारी यांच्यात वाटप करताना
ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे (टीएमसी) महापौर नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त करत नमूद केले, “गोदरेज प्रोटेक्टने लोकांना हात धुण्याचे महत्त्व सांगण्यासाठी #प्रोटेक्टइंडियामूव्हमेंट हा उपक्रम सुरू केला आहे. कोरोना व्हायरस हातातून शरीरात सहजपणे संक्रमित होऊ शकतो व त्यामुळे व्यक्ती आजारी पडू शकते. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर नियमितपणे हात धुणे, हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. आम्हाला 1 लाख मि. मॅजिक पाकिटे दिल्याबद्दल आम्ही गोदरेज प्रोटेक्टचे आभारी आहोत. आम्ही मि. मॅजिकची पाकिटे आमचे कर्मचारी, कामगार, ठाणे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (टीएमटी) बस कंडक्टर व टीएमसी चालवत असलेल्या शाळांतील शिक्षक यांच्यामध्ये वाटणार आहोत. या व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येत असतात. कोरोना व्हायरसविरोधाचा लढा जिंकण्यासठी आम्हाला हात धुण्याबद्दलचा संदेश योग्य पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे.”

ज्येष्ठ नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने, गोदरेज प्रोटेक्ट मि. मॅजिक पाकिटे वाटण्यासठी आणि हात धुण्याबद्दल जागृती करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या प्रमुख एनजीओंबरोबर भागीदारी करणार आहे. आपल्या हँडवॉश पाकिटांचे वितरण करण्याच्या हेतूने गोदरेज प्रोटेक्ट विविध सरकारी संस्थांशी संपर्क करणार आहे. या विषाणूचा सामना करण्याच्या हेतूने अखंडितपणे पुरवठा करण्याची तरतूद करण्यासाठी, हँडवॉश व सॅनिटायझर यांची पॉकेट उत्पादने आणि विशेषतः मि. मॅजिक पावडर-टू-लिक्विड हँडवॉश यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने ब्रँडने उत्पादनामध्ये वाढ केली आहे. अशा उत्पादनांसाठी मागणी वाढत असल्याने, भारतातील सर्व विक्री माध्यमांमध्ये पुरेसा साठा करण्यासठी ऑन-ग्राउंड टीम अथकपणे कार्यरत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, गोदरेज प्रोटेक्टने नियमितपणे व योग्य प्रकारे हात धुण्याचा संदेश प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने #प्रोटेक्टइंडियामूव्हमेंट ही मल्टिमीडिया व मल्टि-चॅनेल कॅम्पेन दाखल केली. या अनुषंगाने, कंपनीने #प्रोटेक्टइंडिया गीत सादर केले. हे गीत हात धुण्याबद्दल व सध्याचे संकट आटोक्यात आणण्याबद्दल जागृती करण्यावर भर देते. अनेक लोक, सेलिब्रेटी व 100 हून अधिक प्रभावशाली व्यक्ती यांनी या चळवळीत सहभाग घेतला आणि छोटासा, पण अत्यंत परिणामकारक संदेश देत #प्रोटेक्टइंडिया गीत गायले. हा संदेश होता – कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी व केल्यानंतर नियमितपणे हात धुवा. गोदरेज प्रोटेक्टने हात धुण्याबाबत सूचना देणारा व्हीडिओही जाहीर केला आहे आणि हा व्हीडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने प्रसारित करण्यासाठी न्यूज चॅनेलशी भागीदारी केली जात आहे.

Comments