"महिंद्रा लॉजिस्टिक्स"तर्फे कोव्हिड- 19 विरोधातील लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी मोफत आपत्कालीन कॅब सेवा
मुंबई: या मोफत सेवा सात दिवसांत पाच शहरांत यशस्वीपणे लाँच केल्यानंतर "महिंद्रा लॉजिस्टिक्स (एमएलएल)" या भारतातील आघाडीच्या 3 पीएल सेवा पुरवठादार कंपनीने "अल्याते" या आपल्या औद्योगिक वाहतूक व्यवसायाद्वारे कोव्हिड- 19 चा फटका बसलेल्यांसाठी आपत्कालीन कॅब सेवा लाँच केल्याचे जाहीर केले.
अल्यातेतर्फे ही सेवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांना गृहोपयोगी वस्तू, औषधे, बँक, पोस्ट ऑफिसला भेट देणे अशा अत्यावश्यक सेवांशी संबंधित कामांसाठी पुरवली जाणार आहे. कंपनीद्वारे ही सेवा डॉक्टर्स, नर्सेस आणि अत्यावश्यक वस्तू पुरवठ्याशी संबंधित इतरांनाही दिली जाणार आहे. इच्छुक समूहांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा.

ही सेवा पोलिस आयुक्तांच्या (उत्तर आणि पश्चिम) सहकार्याने मुंबई शहरात दिली जाणार आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘आपल्या समाजासाठी हा अतिशय अवघड आणि अनपेक्षित काळ आहे. या संकटाशी लढण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. या परिस्थितीशी लढण्यासाठी सरकार कौतुकास्पद पावले अचलत आहे आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने आम्ही शक्य त्या सर्व मार्गांनी पाठिंबा देत राहू. या काळात लोकांना संकटप्रसंगी वाहतूक सेवा मिळवण्यात खूप अडचणी येत आहेत. आमची सेवा गाड्यांच्या माध्यमातून लोकांची मदत करेल. या गाड्यांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुकीकरणाच्या सर्व नियमांचे पालन केले जाते. आम्ही सदस्यांना आवाहन करतो, की त्यांनी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करावे आणि खूप गरज असेल, तरच घराबाहेर पडावे.’

Comments
Post a Comment