Godrej Appliance launches 3 new products through Live Virtual

गोदरेज अप्लायन्सने लाइव्ह व्हर्च्युअलच्या माध्यमातून ३ नवीन उत्पादनाचे केले सादरीकरण..

मुंबई: सुमारे 62 वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या, होम अप्लायन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या "गोदरेज अप्लायन्सेस"ने ग्राहकांच्या दृष्टीने योग्य आणि नाविन्य व शाश्वततेचे आधारस्तंभ असलेली उत्पादने नेहमीच निर्माण केली आहेत. 'विचारपूर्वक बनवलेल्या गोष्टी' या ब्रँड तत्वज्ञानानुसार, ‘गोदरेज अप्लायन्सेस’ने 3 नवीन मॉडेल्स नुकतीच सादर केली – "गोदरेज एज रिओ रेफ्रिजरेटर", "गोदरेज एज निओ रेफ्रिजरेटर" आणि "गोदरेज एज अल्टिमा सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन". ग्राहकांना उज्ज्वल राहणीमान मिळवून देण्यासाठी या ब्रँडची नेहमीची कटिबद्धता या तिन्ही मॉडेल्समधून प्रतीत होते.

सर्व भारतात एकाच वेळी ही उत्पादने सादर करण्यासाठी या ब्रॅंडने आभासी माध्यमाची निवड केली, आपले संपूर्ण व्यावसायिक नेटवर्क यात गुंतवले व एक नावीन्यपूर्ण सुरुवात केली. आपल्या व्यापारी भागीदारांना एकत्र पुढे नेणे व टाळेबंदीच्या अडथळ्यांवर मात करणे यासाठीचा हा कंपनीचा आणखी एक प्रयत्न आहे.

"गोदरेज एज रिओ" आणि "एज निओ":
‘रेफ्रिजरेटर’मध्ये अन्नपदार्थ जास्त साठवता यावेत, या भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेच्या अनुषंगाने "गोदरेज एज रिओ" आणि "एज निओ" या रेफ्रिजरेटर्सची रचना करण्यात आली आहे. टाळेबंदी व सामाजिक अंतर ठेवण्याच्या सध्याच्या काळात, ‘रेफ्रिजरेटर’मध्ये जास्त पदार्थ, जास्त काळ साठवून ठेवण्याची सर्वांनाच गरज भासत आहे. त्या दृष्टीने ‘गोदरेज अप्लायन्सेस’ने ‘गोदरेज एज रिओ’ व ‘गोदरेज एज निओ’ हे 192 लिटर, ‘सिंगल डोअर’ श्रेणीतले सर्वात उंच असे रेफ्रिजरेटर आणले आहेत. त्यांची उंची 1192 मिमी इतकी असून त्यांत कमाल स्वरुपात जागा मिळू शकते. यांतील फ्रीझर सर्वात मोठ्या आकाराचा, म्हणजे 16.3 लिटर क्षमतेचा असून बाटल्या ठेवण्याची जागाही सर्वात मोठी, म्हणजे 13.5 लिटर इतकी आहे. तीव्र उन्हाळ्यात या जागेचा चांगला वापर ग्राहकांना करता येणार आहे. भाजीपाला ठेवण्यासाठीदेखील यात 16.4 लिटरची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सर्व भाज्या एकत्र आणि प्रदीर्घ कालावधीसाठी ताज्या ठेवणे शक्य होणार आहे.

प्रगत इनव्हर्टर तंत्रज्ञानाने युक्त असलेले आणि 2020च्या ऊर्जा मापदंडाच्या निकषांनुसार ‘5-स्टार’ रेटिंग असलेले ‘गोदरेज एज रिओ’ आणि ‘एज निओ’ हे दोन्ही रेफ्रिजरेटर अत्यंत ऊर्जा-कार्यक्षम, ऊर्जेची बचत करणारे आहेत. यातील ‘पीयूएफ’ची जाडी 54 मिमी इतकी असल्याने रेफ्रिजरेटरची ही मॉडेल्स अगदी वीजकपातीच्या काळातदेखील थंडावा उत्तम प्रकारे धारण करतात.

हे रेफ्रिजरेटर ‘टर्बो कूलिंग टेक्नॉलॉजी’ने सुसज्ज आहेत. यामध्ये बर्फ बनविण्याची व पाण्याच्या बाटल्या थंड करण्याची क्रिया 20 टक्के जलद होते. यातील ‘हायजीन + इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी’ ‘डीफ्रॉस्ट’च्या काळात पाणी सांडू देत नाही, तसेच फ्रीज स्वच्छ करण्यात ती सोयीची ठरते. तिच्यामुळे ‘फ्रीज’मध्ये जंतू आणि कीटक यांची उत्पत्ती होत नाही. पर्यावरण आणि शाश्वत तंत्रज्ञान यांच्याप्रति गोदरेज कटिबद्ध असल्याने, त्या अनुषंगाने या ‘रेफ्रिजरेटर’मध्ये ‘आर600ए’ हे सर्वात पर्यावरणस्नेही असे ‘रेफ्रिजरेंट’ वापरण्यात आले आहे. ओझोन वायू कमी करण्याची शून्य शक्यता या ‘रेफ्रिजरेंट’मध्ये असल्याने कार्बनचे उत्सर्जनही यात कमी होते.

एक वक्र स्वरुपाचा दरवाजा असलेले फ्रीजचे डिझाइन, आतील बाजूची पारदर्शक सुंदर रचना आणि आकर्षक व ताज्या फुलांचा ‘फॅसिआ’ / ‘प्री-कोट’ असे हे रेफ्रिजरेटर्स अतिशय देखणे आहेत. 192 लिटरची क्षमता असलेले हे फ्रीज 5-स्टार, 4-स्टार, 3-स्टार व 2-स्टार या मॉडेल्समध्ये मिळतात. नवीन ‘गोदरेज एज रिओ’ आणि ‘एज निओ’ रेफ्रिजरेटर्सची किंमत 14,000 रुपयांपासून सुरू होते.

‘सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्स’मधील 50 टक्के फ्रीज हे 190 ते 195 लिटर क्षमतेचे असतात. एकूणात या सिंगल डोअर मॉडेल्सचा हिस्सा रेफ्रिजरेटर उद्योगात 77 टक्के इतका आहे.

"गोदरेज एज अल्टिमा" - नवीन काळातील सेमी-ऑटोमॅटिक:
‘गोदरेज एज अल्टिमा’ हे आधुनिक काळातील उच्च कार्यक्षमता असलेले ‘सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन’ आहे. ‘बॉर्डरलेस डिझाईन’मुळे ते अतिशय आकर्षक दिसते. हे 5-स्टार मानांकीत वॉशिंग मशीन विजेचा अगदी कमीतकमी वापर करते व पैसे वाचवते.

कपडे धुण्याच्या संकल्पनेची नव्याने व्याख्या करताना, ‘गोदरेज’ने ‘एज अल्टिमा सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन’च्या श्रेणीमध्ये 460 वॅटची ‘पॉवर मॅक्स’ मोटर वापरली आहे. त्यामुळे दररोजचे आणि खूप व जड कपडे धुणे सोपे जाते, तसेच त्यातील 1440 ‘आरपीएम स्पिन’ मोटरमुळे कपडे पटकन कोरडे होतात. विशेषत: पावसाळ्यात ही आपल्या घरासाठी आवश्यक बाब आहे.

या मशीनमध्ये असलेल्या अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांमुळे कपडे धुण्याचा एक अनोखा अनुभव मिळतो.

·   अ‍ॅक्टिव्ह सोक या अनोख्या वैशिष्ट्यामुळे, ‘सोकिंग’च्या काळातही ड्रम थरथरत असतो. त्यामुळे कपड्यांवरील चिवट डाग सैल होण्यास मदत होते.

·   स्पिन शॉवर प्रोग्रॅममुळे कपड्यांवरील डिटर्जंट काढण्यासाठी त्यांवर पावसाप्रमाणे पाण्याचा वर्षाव होतो.

·   ट्राय-रोटो स्क्रब पल्सेटरमधील 3 रिज व 3 मिनि-पल्सेटर यांच्या सहाय्याने कपडे खळबळण्याचे व घासण्याचे काम चांगल्या रितीने होते.

·   यातील कार्ट्रिज लिंट फिल्टरमध्ये कपड्यांचा मळ, त्यांवरील धागे व अन्य कण पाण्याची पातळी अगदी कमी असतानाही वेगळे निघून येतात व त्यामुळे प्रत्येक धुण्यानंतर कपडे स्वच्छ, चमकदार होऊन बाहेर येतात.

·   ‘एज अल्टिमा’ मशीनचे झाकण अतिशय हळूवारपणे उघडले जाते व बंद होते. त्यामुळे मशीन वापरणाऱ्या व्यक्तीला झाकणापासून कसलीही इजा होत नाही.

·   या मशीनची शंभर टक्के गंज-रोधक पॉलिप्रॉपिलीन बॉडी अगदी मजबूत आहे, तसेच टफन्ड ग्लासचे झाकणही टिकाऊ आहे.

‘एज अल्टिमा मशीन’च्या ‘वॉश मोटर’वर 5 वर्षाची वॉरंटी आणि संपूर्ण वॉशिंग मशीनवर 2 वर्षाची वॉरंटी असल्याने ग्राहक चिंतामुक्त होतो. ‘गोदरेज एज अल्टिमा वॉशिंग मशिन’च्या विशिष्ट डिझाईनमुळे ते वापरण्यास अतिशय सुलभ आहे आणि इतर मशीन्सच्या तुलनेत ते उठून दिसते. क्रिस्टल रेड, क्रिस्टल ब्लॅक आणि क्रिस्टल ब्लू या आकर्षक रंगांमध्ये 8 किलो व 8.5 किलो या क्षमतांमध्ये उपलब्ध असलेल्या या ‘वॉशिंग मशीन’ची किंमत 16,400 रुपयांपासून पुढे आहे. ‘सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन सेगमेंट’मध्ये सध्या 8 ते 8.5 किलो क्षमतांचे 23 टक्के योगदान आहे आणि हा विभाग या उद्योगामध्ये 11 टक्के दराने वाढत आहे.

या उपकरणांच्या सादरीकरणाविषयी गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “गोदरेज अप्लायन्सेस ही कंपनी नेहमीच उच्च प्रतीची घरगुती उपकरणे पुरविण्यासाठी ओळखली जाते. भारतातील नागरिक ‘कोविड-19’च्या उद्रेकाविरुद्ध लढा देत असताना, त्यांच्यावरील कामाचे ओझे व तणाव कमी करण्यात ही घरगुती उपकरणे सहाय्यभूत ठरू शकतात. आमची नुकतीच सादर झालेली – ‘गोदरेज एज रिओ’, ‘गोदरेज एज निओ’ आणि ‘गोदरेज एज अल्टिमा’ - ही उपकरणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेल्या विभागांमध्ये देशभरात उपलब्ध आहेत. या उपकरणांच्या विशिष्ट डिझाइन्समुळे ती वापरण्यास सोयीची आणि कार्यक्षम आहेत. ‘गोदरेज’च्या कठोर गुणवत्तेची आणि रचनांची ती मूर्त रूपे आहेत. ‘सोच के बनाया है’ या तत्वज्ञानाच्या आधारे त्यांची उच्च दर्जाची बांधणी करण्यात आली आहे. आमच्या अत्याधुनिक कारखान्यांमध्ये त्यांचे उत्पादन करण्यात येत असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या निर्मितीसाठीचे हे आणखी एक पाऊल आहे.’’

‘कोविड-19’मुळे देशभरात जमावबंदी लागू आहे. त्यामुळे एकत्र येऊन मेळावे भरविता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘व्हर्च्युअल’ स्वरुपात उत्पादनांचे सादरीकरण करणारी गोदरेज अप्लायन्सेस ही या उद्योगातील पहिली कंपनी ठरली आहे. देशभरातील 5 हजारांहून अधिक व्यवसाय भागीदारांना त्यांच्या घरांतूनच या कार्यक्रमात भाग घेता यावा, यासाठी कंपनीने विभागनिहाय सादरीकरणाची कल्पना लढवली. या भागीदारांना सोहळ्यात व्यक्त होण्यासाठी ‘लाइव्ह चॅट विंडो’ची सुविधा देण्यात आली. तीमधून ते त्यांची मते मांडत होते. या कार्यक्रमास या भागीदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

‘गोदरेज अप्लायन्सेस’चे राष्ट्रीय विक्री प्रमुख संजीव जैन म्हणाले, ’’टाळेबंदी सुरू झाल्यावर आम्ही आमच्या व्यापारी भागीदारांचे जाळे ग्राहकांपर्यंत डिजिटल पद्धतीने पोहोचवण्याचे अतिशय किचकट काम नेटाने केले. उत्पादनांचे कॅटलॉग तयार करणे आणि त्यांचे प्रदर्शन मांडणे, कॅशलेस ऑनलाइन पेमेंटच्या अनेक सुविधा सुरू करणे इथपासून व्हिडिओ-सहाय्यित दूरस्थ विक्री उपक्रम सुरू करण्यापर्यंत सर्व आघाड्यांवर आम्ही अडथळ्यांवर मात करीत आलो. संज्ञापनाचे आणि एकमेकांशी जोडले जाण्याचे पर्यायी मार्ग शोधून काढून आम्ही आमच्या व्यापारी भागीदारांना विलक्षण संधी देऊ शकलो. ‘गोदरेज एज रिओ’, ‘गोदरेज एज निओ’ आणि ‘गोदरेज एज अल्टिमा’ या आमच्या नवीन मॉडेल्सचे सादरीकरण  हे नाविन्यपूर्ण माध्यमातून अडथळे दूर करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आम्ही विविध विभागांमध्ये वर्षभर नवीन उत्पादने बाजारात आणण्याची योजना आखत आहोत. धोरणात्मक व नाविन्यपूर्ण विचार करण्याच्या आमच्या कार्यसंस्कृतीला या सादरीकरणांतून बळ मिळते. त्यातून आम्हाला ‘सोचके बनाया है’ या ब्रँड आश्वासनाचे पालन करता येते.’’

Comments