“गोदरेज”ने हिवाळा अधिक ऊबदार करण्यासाठी लाँच केले 5-स्टार रेटेड, गरम पाणी करण्यात सक्षम वॉशिंग मशीन्स
मुंबई: कोविड-19 मुळे स्वयंपाक, स्वच्छता, धुणे अशा अनेक क्षेत्रांमध्ये ग्राहकांचे वर्तन बदलले आहे. ग्राहकांना बाहेरून घरी आल्यावर प्रत्येक वेळी कपडे धुवावे लागत असल्याने त्यांची कपडे धुण्याची आवश्यकता निश्चितच वाढली आहे. ग्राहक प्रतिबंधात्मक उपाय करण्याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत आणि ते योग्यही आहे. वाढत्या मागणीच्या अनुषंगाने ब्रँडने 5-स्टार ऊर्जाक्षम गोदरेज वॉशिंग मशीन्स - फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड सेग्मेंटमधील ‘इऑन अॅल्युअर’, ‘इऑन अॅल्युअर क्लासिक’ व ‘इऑन ऑड्रा’ आणि सेमी-ऑटोमॅटिक सेग्मेंटमधील ‘एज डिजि’ व ‘एज अल्टिमा स्टीलनॉक्स’ यासह 12 नवीन एसकेयू दाखल केली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या मागण्या पूर्ण होणार आहेत. ग्राहकांच्या दृष्टीने आरोग्य व स्वच्छता अत्यंत महत्त्वाचे आहे आणि नवीन उत्पादने दाखल करण्यासाठी डिझाइन व विकास करताना हेच मार्गदर्शक तत्त्व अवलंबण्यात आले आहे. जर्म शिल्ड तंत्रज्ञानाचे पाठबळ असणारी नवी गोदरेज इऑन अॅल्युअर वॉशिंग मशीन्स आजारांना कारणीभूत असणारे अॅलर्जन्स व जीवाणू 99.99% घालवण्यासाठी स्मार्ट वॉशिंग अल्गोरिदम व इन-बिल्ट हीटर टेक्नालॉजी याद्वारे दर्जेदार सॅनिटाइज्ड वॉश उपलब्ध करतात. एकात्मिक दर्जेदार जर्म शिल्ड तंत्रज्ञान ही नवी गोदरेज इऑन अॅल्युअर उत्पादने आजारांना कारणीभूत असणारे 5 प्रकारचे जीवाणू (ई. कोली, स्टेफीलोकोकस ऑरस, सॅलमनेला एंटेरिका, सॅलमनेला टायफिमरिअम, क्लेबसिला एअरोजेनस) आणि 12 प्रमुख अॅलर्जन्स ग्रुप (माइट ग्रुप 2, Der f1, Der p1, S.ट्रॉपोमायोसिन, Fel d1, Can f1, Mus m1, Rat n1, Bla g2, Alt a1, Asp f1, Phl p5) नाहीसे करण्यासाठी एनसीएल एम्पॅनल्ड लॅब प्रमाणित आहेत. या जीवाणूंमुळे अन्नातून विषबाधा यासारखे आजार होऊ शकतात, बॉइल्स, सेल्युलायटिस, जखमांतून संसर्ग, टॉक्सिक शॉक सिंड्रोम, न्युमोनिया असे शरीरात निरनिराळे संसर्ग होऊ शकतात, तर अॅलर्जन्समुळे डस्ट अॅलर्जी, ऱ्हिनायटिस व ब्राँकिअल अस्थमा असे त्रास होतात. अशा आजारांपासून, विशेषतः सध्याच्या आजारांसाठी संवेदनशील वातावारणापासून स्वतःला व जवळच्या व्यक्तींना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
प्रीमिअम गोदरेज इऑन अॅल्युअर मॉडेल्समध्ये 3 टेम्परेचर मोड असून त्यामुळे ग्राहकांना त्यांना हवे तसे तापमान निश्चित करता येते.
• जर्म शिल्ड
मोड - 99.99% अॅलर्जन्स व जीवाणू
नाहीसे केले जातात,
पाणी 60°C पर्यंत तापवले जाते
आणि स्मार्ट वॉश
अल्गोरिदमसह काम करते.
• हॉट मोड
– पाणी 55°C पर्यंत तापवले जात
असल्याने अतिशय मळलेल्या कपड्यांसाठी
साजेसे
• वॉर्म मोड – मध्यम
प्रमाणात मळलेल्या कपड्यांसाठी साजेसे
आणि पाणी 40°C पर्यंत
तापवते.
गोदरेज अप्लायन्सेसने पर्यावरणासाठी केलेल्या बांधिलकीच्या अनुषंगाने,
या वॉशिंग मशीनमध्ये
ईको मोड असून
त्यामुळे अन्य सर्वसाधारण
वॉश सायकलच्या तुलनेत
पाण्याचा वापर अंदाजे
44 लिटरनी कमी केला
जातो. भूजलाची पातळी
दिवसेंदिवस घटत चालली
असल्याने पाण्याचे मूल्य कमालीचे
वाढत असल्याने पाण्याची
बचत हा वॉशिंगचा
गाभा असणे गरजेचे
आहे.
गोदरेजने
प्रीमिअम अॅल्युअर वॉशिंग मशीन्स
व्यतिरिक्तही अन्य उत्पादने
दाखल केली आहेत:
यंदाच्या सणासुदीदरम्यान ग्राहकांना वैविध्य व
पर्याय देण्याच्या हेतूने, हॉट
वॉश पर्याय, तसेच
100% वॉश-रेझिस्टंट डिजिटल पॅनल,
इन-बिल्ट सोक,
कठीण डाग घालवणे,
कस्टमायजेबल वॉश प्रोग्रॅम
इ. विविध वैशिष्ट्यांची
सांगड घातलेले इऑन
अॅल्युअर क्लासिक आणि इऑन
ऑड्रा.
अंदाजे
55% सेमी-ऑटोमॅटिक युजर असल्याने
गोदरेजने एज डिजि
या 60 अंश हॉट
वॉश, डिजिटल कंट्रोल
व एलईडी डिस्प्ले
असणारे भारतातील पहिले सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन
या वॉशिंग मशीनद्वारे
60 अंश हॉट वॉश
टेक्नालॉजी ते सेमी-ऑटोमॅटिक्स उत्पादन दाखल
केले आहे.
सेमी-ऑटोमॅटिक श्रेणीमध्ये स्टील
ड्रम सर्वप्रथम गोदरेजने
सादर केले. एज
अल्टिमा स्टीलनॉक्स सीरिजच्या निमित्ताने,
कंपनीने ही श्रेणी
आणखी विस्तारली आहे.
दर्जेदार वॉश मोटर
व स्पिन मोटर
यामुळे वॉशद्वारे स्वच्छता व
जलद ड्राइंग ही
खात्री दिली आहे.
याविषयी
बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस
हेड व कार्यकारी
उपाध्यक्ष कमल नंदी
म्हणाले, “भारतातील लक्षणीय संख्येने
लोकसंख्या ‘वर्क फ्रॉम
होम’ करत आहे.
तसेच, मोठ्या शहरांत
घरात कामासाठी कोणीतरी
ठेवण्याची अजून अनेकांची
तयारी नसल्याने सोय
व आराम देणाऱ्या
वॉशिंग मशीन्ससारख्या अप्लायन्सेसना या शहरांत
मागणी वाढण्याची अपेक्षा
आहे. लहान शहरांसह
भारतात सर्वत्र स्वच्छता व
प्रतिबंधात्मक उपाय याविषयी
जागरुकता वाढली असल्याने कपडे
धुण्यासाठीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
भारतातील घराघरांमध्ये महामारीचा सामना केला
जात असल्याने, त्यांचा
ताण कमी करण्यासाठी
होम अप्लायन्सेस अतिशय
उपयुक्त ठरू शकतात.
नव्याने दाखल केलेली
टॉप लोड व
सेमी-ऑटोमॅटिक या
दोन्ही श्रेणींमध्ये जर्म शिल्ड
तंत्रज्ञान व इन-बिल्ट हीटर्स असलेली
5-स्टार रेटेड वॉशिंग मशीन्स
तयार करताना आरोग्य
व स्वच्छता यांना
सर्वाधिक महत्त्व देण्यात आले
आहे. ‘सोच के
बनाया है’ तत्त्वज्ञानाने
प्रेरित असणाऱ्या या उत्पादनांची
निर्मिती भारतातील आमच्या अद्ययावत
कारखान्यांमध्ये केली जाते.
‘आत्मनिर्भर भारत’ला
पाठिंबा देण्याच्या दिशेने हे
आणखी एक महत्त्वाचे
पाऊल आहे.”
वॉशिंग मशीन्सबद्दल गोदरेज अप्लायन्सेसचे प्रोडक्ट ग्रुप हेड
रजिंदर कौल यांनी
पुढे सांगितले, “गोदरेजमध्ये
आम्ही ग्राहकांकडून मिळालेल्या
माहितीच्या आधारे त्यांना उत्तमोत्तम
सेवा देण्यासाठी उपयुक्त
तंत्रज्ञान व नावीन्य
समाविष्ट करत असतो.
जर्म शिल्ड तंत्रज्ञान
व 60°C हॉट वॉश
टेक्नालॉजी यांचे पाठबळ असलेली
आम्ही नुकतीच दाखल
केलेली गोदरेज वॉशिंग मशीन्स
ग्राहकांना कपडे दर्जेदार
व स्वच्छ धुण्याची
सेवा देतात. ऐटदार
व स्लीक असणारी
ही उत्पादने जर्म्स
व अॅलर्जन्स यांच्यापासून संरक्षण देतील, अशा
प्रकारे तयार केली
आहेत. 5-स्टार एनर्जी रेटिंग
असणारी ही नवी
मशीन या वर्षी
135 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावतील
आणि या श्रेणीमध्ये
आमचे स्थान सक्षम
करण्यासाठी मदत करतील,
अशी अपेक्षा आहे.
यामार्फत आम्ही या श्रेणीतील
10% बाजारहिस्सा साध्य करायचे उद्दिष्ट
ठेवले आहे.”
विविध क्षमतांमध्ये उपलब्ध असणारी ही
5 स्टार रेटेड वॉशिंग मशीन्स
विजेचा वापर कमीत
कमी करतात आणि
मोठी बचत करतात.
माफक दर असलेली
नवी गोदरेज वॉशिंग
मशीन वॉश मोटरवर
10 वर्षांपर्यंत वॉरंटी देत असल्याने
ग्राहकांना चिंतामुक्त राहता येते.
भारतात वॉशिंग मशीन्सची बाजारपेठ
7.2 दशलक्ष युनिटची आहे, असा
अंदाज आहे. त्यांचे
प्रमाण 14% इतके कमी
आहे.
Comments
Post a Comment