MLA Dr. Parinay Phuke called on Governor Bhagat Singh Koshyari

 आमदार डॉ.परिणय फुके यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई- धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारागोंदिया जिल्ह्यामध्ये धान्य विक्री करतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामधे धान्य खरेदी केंद्रामध्ये बरीच अनियमितता आढळुन येतेबारदाण्याअभावी शेतकऱ्यांच्या धान्याची उचल होत नाही. धान्य साठवण्यासाठी कोठारांची व्यवस्था नसल्याने धान्य उघड्यावर ठेवण्याची वेळ येते. अजूनही पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. मध्यप्रदेश मधील सी ग्रेडचे धान्य ग्रेडचे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली जात आहे याची माहिती आमदार डॉ. परिणय फुके यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिली.

भंडारागोंदिया नागपूर जिल्ह्यात रेती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. याबाबत आपण स्थानिक प्रशासनमंत्रालयीन स्तरावर तसेच विधी मंडळामध्ये प्रश्न उपस्थिती करून कारवाई करण्याची मागणी केली होती. पण अद्याप कोणतीही कारवाई  झाल्याने आपण यावर लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली. 

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे राजकीयशैक्षणिकसांस्कृतिक प्रगतीमध्ये समाजाचे नुकसान झाले असून राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाचा कायदा तातडीने मंजूर करावा यासाठी राज्य सरकारने ओबीसी आयोग तयार करून जिल्हा गावनिहाय माहिती अद्ययावत करावी. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावीयाकरिता आपण राज्य सरकारला याबाबत सूचना कराव्यात अशी विनंती . फुके यांनी चर्चेदरम्यान राज्यपाल यांच्याकडे केली. या सर्व प्रश्नांवर आपण स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करू असे आश्वासन मा.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी . परिणय फुके यांना दिले.

Comments