Movie Review: "Ahaan" - the story of a simple but unusual young man

 "अहान" - एक साधारण पण असामान्य तरुणाची कथा

"अहान" - एक साधारण पण असामान्य तरुणाची कथा, जन्मतः मिळालेल्या मतिमंदत्तवामुळे सामान्य लोकांकडून नेहमी हेटाळणी सहन करणारा, पण नेहमी लोकांना मदत करणारा आणि स्वतःच्या आजाराशी लढत स्वतःला सिद्ध करणारा...

"डाउन सिंड्रोम" या आजाराने ग्रस्त असलेली हि विशेष मुले जगण्यासाठी किंवा स्वतःच्या अस्तित्वासाठी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला वेगळ्या प्रकारे लढा देत आहेत. समाजामध्ये ह्या विशेष मुलानां नेहमी नकारात्मक दृष्टीने बघितले जाते आणि अपंग/मतिमंद या शब्दांचा वापर करून त्यांची हेटाळणी केली जाते. डाउन सिंड्रोम रुग्णांसाठी सर्वात मोठा अडसर म्हणजे समाज त्यांना स्वीकारत नाही. डाउन सिंड्रोम रुग्ण नेहमी हसत खेळत राहणारे, संगीत गाण्यात रमणारे असतात, पण मधूनच त्यांचा स्वभाव खूप रागीट होऊन जातो. ह्या त्यांच्या आजारासहित स्वीकारून समाजाने या रुग्णांना सामान्य जीवन जगण्यास मदत केली पाहिजे.

डाऊन सिंड्रोम असलेला अहान (अबूली मामाजी) हा 25 वर्षांचा तरुण असून सामान्य जीवन जगण्याची इच्छा बाळगणारा, एक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि त्याच्या पालकांच्या सावलीच्या पलीकडे आहे. ओझी (अरिफ झकारिया) हा 40 व्या वर्षीचा मध्यमवर्गीय व्यक्ती असून तो ओसीडी ग्रस्त आहे. त्याची मानसिक क्षमता आणि मूल होण्याची इच्छा नसल्यामुळे, तो स्वतःला पत्नीपासून दूर ठेवतो. ओझी अहानशी मैत्री करून त्याच्या मदतीचा वापर अनुचे (निहारिका सिंग) मन वाळवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांची मैत्री जसजशी वाढत जाते तसतसे ते आयुष्याबद्दल नवीन दृष्टीकोन विकसित करतात. अहान नकळत ओझीची अधिक मानवी बाजू आणतो, त्यामुळे त्याचे लग्न वाचते. त्यानंतर ओझीने अहानचे स्वप्न पूर्ण करण्याचे आव्हान ठेवले. अशा प्रकारे स्वतंत्र जीवनाचा मार्ग खुला होतो.

दिग्दर्शक आणि लेखक निखिल फेरवानी यांनी डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीचा उपयोगअहानया चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र म्हणून केला आहे. या प्रकारच्या विषयावर सहसा करमणूक अपेक्षित नसते पण तो सर्वांनाच चुकीचा सिद्ध करतो कारण तो एखाद्या प्रेमाची भावना दाखविणारी, भावनाविरूद्ध कथा सांगून, आणि एक मनोरंजक चित्रपट दाखविता त्याच्यासाठी नाकारतो. अहानचे मुख्य पात्र अबुली मामाजी साकारत आहे, जो डाउन सिंड्रोमने त्रस्त आहे आणि त्याने चांगली कामगिरी केली आहे.

डाउन-सिंड्रोम असलेल्या व्यक्तिरेखेला मध्यवर्ती स्थान देऊन लेखक-दिग्दर्शक निखिल फेरवानी यांनी एक प्रेमळ पण सामाजिक सवेंदनशीलता दाखवणारी कथा लिहिली आहे. पटकथासुद्धा उत्तम लिहिली असून त्यामध्ये बरेच हलके आणि विनोदी संवाद गुंफलेले आहेत. अबूली मामाजी स्वतः डाउन सिंड्रोम आजाराने ग्रस्त असूनसुद्धा अहान हे पात्र चांगल्या प्रकारे साकारले आहे, त्याच बरोबर अरिफ झकारिया, निहारिका सिंग, प्लाबिता बोर्थाकुर, रजित कपूर ह्यांचाही उत्तम अभिनय झाला आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाच्या या विषयाला जास्त गंभीर करता हलके फुलके पणाने सादर केले आहे. उत्तम संवाद अचूक टायमिंग यामुळे चित्रपट मनोरंजक बनवण्यात दिग्दर्शक यशश्वी झाला आहे.

रेटिंग: ***१/२


 

Comments