पुण्यात स्थिरस्थावर होण्याची 'महिंद्रा लाईफस्पेस®'ची योजना
मुंबई: पुण्यातील पिंपरी येथील
3.2 एकर जमीन
"महिंद्रा अँड
महिंद्रा लि."कडून खरेदी
करण्याबाबतच्या अटींना अंतिम स्वरूप देण्यात आले
आहे, अशी माहिती ‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.’तर्फे आज देण्यात आली. खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनीही मान्य केलेल्या अटींच्या पूर्ततेच्या अधीन असलेला हा खरेदीचा व्यवहार सहा
महिन्यांत पूर्ण
होईल, अशी अपेक्षा आहे.
ही जमीन
नेहरू नगरच्या निवासी भागात
आहे. या नवीन प्रकल्पात अंदाजे 3.25 लाख चौरस फूट
चटईक्षेत्र उपलब्ध होईल. हा प्रकल्प पूर्ण
झाल्यावर तो
सूक्ष्म बाजारपेठेतील महिंद्रा लाइफस्पेसचा चौथा प्रकल्प असेल. या बाजारपेठेतील कंपनीचा यापूर्वीचा प्रकल्प, 'महिंद्रा सेंट्रलिस', 2019 मध्ये सादर
होतानाच विकला
गेला.
'महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.'चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यन म्हणाले, "पिंपरी-चिंचवड हा पुण्यातील धोरणात्मकदृष्ट्या विकसीत आणि भरभराट असलेला निवासी भाग आहे. येथे सामाजिक व नागरी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. प्रस्तावित जमिनीच्या अधिग्रहणामुळे आम्हाला या उच्च-कार्यक्षम अशा सूक्ष्म बाजारपेठेत आमचे अस्तित्व उभे करण्यात मदत होईल. निवासी प्रकल्पांच्या विस्ताराच्या आमच्या धोरणानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे.”
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यालयासमोरील मेट्रो स्थानकापासून ही जमीन सुमारे 1 किमी अंतरावर आहे.
Comments
Post a Comment