High demand for comfortable travel in Maharashtra

 

मुंबई: राज्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यामुळे आणि लसीकरण मोहीमेने वेग पकडल्यामुळे अलिबाग, महाबळेश्वर आणि हतगड या महाराष्ट्रातील सगळ्या 'क्लब महिंद्रा'च्या रिसॉर्ट्समध्ये बुकिंगमध्ये वाढ होऊन ९०% क्षमतेने ती भरली. महाराष्ट्रातील सदस्यांनी महाराष्ट्राच्या जोडीलाच गोवा आणि गुजरातमधील ड्राईव्ह करत जाण्याच्या अंतरावर असणाऱ्या पर्यटनस्थळीही सुट्टीचा आनंद घेतला.

नव्यानेच सुरु झालेले क्लब महिंद्राचे ट्रॉपिकाना रिसॉर्ट आणि स्पा अलिबाग यांना जोरदार प्रतिसाद मिळून ऑगस्ट २०२१ मध्ये १००% क्षमतेने भरण्याचा अनुभव घेतला. किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे रिसॉर्ट चहुबाजूने निसर्गसौंदर्याने वेढलेले असून कुटुंबासह समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठीचे हे परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे.

याबद्दल आपले विचार मांडताना महिंद्रा हॉलीडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक खन्ना म्हणाले, “महाराष्ट्र ही आमच्यासाठी आत्यंतिक महत्वाची बाजारपेठ आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील रिसॉर्ट्सना सर्वोत्तम मागणी दिसून आली आणि  सप्टेंबर-नोव्हेंबर २०२१ साठीची नोंदणीही खूपच उत्साहवर्धक आहे. आमची मोठी, विस्तृत प्रदेशांत वसलेल्या रिसॉर्टस मध्ये मोठ्या स्टुडीओ रूम्स आणि अपार्टमेंटचा समावेश आहे. त्यामुळे लोक आत आणि बाहेर दोन्हीकडे सुरक्षितपणे राहू शकतात.”

'क्लब महिंद्रा'सुद्धा काही नवीन आणि नाविन्यपूर्ण गोष्टी सादर करत आहे जसे की जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळले जाण्यासाठी खुल्या आकाशाखाली आणि अधिक विस्तृत जागेत बुफे, पूल साईड कँडललाईट डिनर तसेच थीम नाईट्स. असे असले तरी आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी सर्वाधिक महत्वपूर्ण असल्यामुळे क्लब महिंद्रा 'सेफ स्टे' कार्यक्रम आणि 'ट्रॅव्हल विथ कॉन्फिडन्स' यासारख्या आमच्या उपक्रमातून आमच्या रिसॉर्ट्समध्ये अत्युच्च दर्जाची सुरक्षितता आणि आरोग्य यांची खात्री दिली जाते आणि त्यायोगे आमच्या सदस्य आणि अतिथींच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला जातो.

Comments